"शमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
==वर्णन==
'''शमी''' (शास्त्रीय नाव : Prosopis spcigera - प्रॉसोपिस स्पिसिगेरा) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हीहिची वनस्पतीपाने [[गणपती]]ला आवडते. हिची पाने गणपतीला वाहतात. अज्ञातवासात जाण्यापूर्वी [[पांडव|पांडवांनी]] आपली शस्त्रे कापडामध्ये गुंडाळून याशमी झाडावरीलवृक्षावरील एका ढोलीत ठेवली होती. काहीतरी अमंगळ आहे असे समजून कोणीही त्यांना हात लावला नाही. दसर्‍याच्या दिवशी लोक सीमोल्लंघनासाठी गावाबाहेर जाऊन शमी वृक्षाचे दर्शन घेतात व त्याची प्रार्थना करतात कारण 'शमी शमयते पापम्' असे संस्कृतमध्ये एक वचन आहे. त्या दिवशी शस्त्रांची पूजा करताना शस्त्रांवर शमीपत्रे वाहतात, आणि आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना देतात.(हल्ली [[आपटा|आपट्याची]] पाने मिळणे दुर्मीळ झाल्यामुळे, तशीच दिसणारी पण काहीशी मोठ्या आकाराची कांचनाची पाने द्यावी-घ्यावी लागतात.)
 
==इतर माहिती==
ओळ ९:
==उपयोग==
शमीच्या लाकडाचा उपयोग बाभळीसारखाच इंधनासाठी करतात. लाकूड कणखर असते, पण कीड लवकर लागते. शमीची लाकडे एकमेकांवर घासून अग्नी निर्माण करता येतो. म्हणून, यज्ञकर्मात शमीच्या समिधा असतात, बाभळीच्या नसतात. ’शमीच्या अंगी जसा अग्नी असतो, तसा राणीच्या पोटात गर्भ राहिला आहे असे राजाच्या ध्यानात आले’ असे कालिदासाने रघुवंशात म्हटले आहे.
 
'''शमीमिवाभ्यंतरलीनपावकां नृप: ससत्त्वां महिषीं अमन्यत ।''' .. रघुवंश(३.९)
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शमी" पासून हुडकले