"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १५:
गुरुत्वाकर्षण हे [[विद्युतचुंबकत्व]] आणि नाभिकीय दृढ अंतर्प्रभाव व अदृढ अंतर्प्रभाव ह्या तिघांसोबत प्रकृतीतील चार मूलभूत अंतर्प्रभावांमधील एक आहे. गुरुत्वाकर्षणाला गणितीय सूत्रात बसवण्यात प्रथम [[आयझॅक न्यूटन]] यशस्वी ठरला. त्याने [[न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम|वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम]] मांडला. पण गुरुत्वाकर्षणाच्या न्यूटनच्या नियमांची जागा आता [[अल्बर्ट आइनस्टाइन|अल्बर्ट आइनस्टाइनच्या]] [[साधारण सापेक्षता सिद्धान्त|सर्वसाधारण सापेक्षता सिद्धान्ताने]] घेतली आहे. न्यूटनचे नियम प्रकाशापेक्षा फार कमी वेग असणाऱ्या वस्तूंसाठी पुरेसे अचूक आहेत. यासाठी ते नियम सर्वत्र बहुतेक जागी वापरले जातात.
 
विश्वनिर्मितीच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर गुरुत्वाकर्षणामुळे पसरलेले पदार्थ संगठित होऊन अखंड राहतात. त्यामुळेच ग्रह, तारे व दीर्घिकांसारख्या स्थूलमानीय वस्तू बनतात. पृथ्वी व इतर ग्रहांच्या सूर्याभोवती, चंद्राची पृथ्वीभोवती अश्या कक्षासुद्धा गुरुत्वाकर्षणामुळेच कायम असतात. संवहन (convection) व भरती-ओहोटी अशा पृथ्वीवर पाहिल्या जाणाऱ्या घटनांपासून ते तारकांच्या आंतरिक भागांमधील उष्णतेसारख्या घटनांपर्यंत भरपूर तथ्यांमध्ये गुरुत्वाकर्षणाचा वाटा आहे.