"गर्वनिर्वाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
(संपादनासाठी शोध संहीता वापरली)
छो
[[राम गणेश गडकरी]] यांनी १०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या "संगीत गर्वनिर्वाण' नाटकाचा रंगमंचावर प्रयोग होऊ शकला नाही; तो २४ फेब्रुवारी २०१४ला पुणे येथे विनोद जोशी महोत्सवात होणार आहे. नंतरचा प्रयोग ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये २५-२-२०१४ला होईल.
 
[[राम गणेश गडकरी]] यांनी इ.स. १९०८मध्ये ’गर्वनिर्वाण’ लिहायला आरंभ केला. त्यानंतर दोन वर्षांनी ते लिहून पूर्ण झाले. त्या वेळी किर्लोस्कर नाटक कंपनीने हे नाटक करण्यासही घेतले; [[गणपतराव बोडस]] हे दिग्दर्शनाबरोबरच ‘हिरण्यकश्यपू’ची, [[बालगंधर्व]] ‘कयाधू’ची म्हणजे प्रल्हादाच्या आईची, तर जोगळेकर ‘लोकपाला’ची भूमिका करणार होते. पण यात काम करणार्‍या गडकर्‍यांच्यागडकऱ्यांच्या एका हितशत्रू मित्र नटाने, त्या वेळच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये वाचकांच्या पत्रव्यवहारात निनावी लिहिले होते की, ‘‘जॅक्सनच्या खुनामुळे राजद्रोहाचा आरोप करून, पुरावा या दृष्टीने किर्लोस्कर मंडळी गर्वनिर्वाण हे राजकीय नाटक बसवत आहे.’’ ‘किर्लोस्कर’वर ब्रिटिशांची वक्रदृष्टी होतीच; पण या पत्राने आगीत तेल ओतले गेले. कलाकारांमध्येही अनेक कारणांनी सुंदोपसुंदी वाढली. अशा रीतीने १९१०मध्ये ते नाटक मंचावर येणे रद्द झाले.<ref>{{cite websantosh | url=http://divyamarathi.bhaskar.com/dainikbhaskar2010/scripts/print/print_photo_feature_article.php?printfile=http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-ram-ganesh-gadkari-garvanirwan-scrip-4122594-PHO.html?HF-27=&storyid=4910583&photoID=331880 | title=गर्वनिर्वाणाची निर्मिती | publisher=दिव्यमराठी | accessdate=८ जानेवारी २०१४ | language=मराठी}}</ref> आणि पुन्हानंतर १९१४मध्ये हे नाटक करायचे ठरले. या नाटकाची रंगीत तालीमही झाली. परंतु ब्रिटिश सत्तेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा घातल्याने आणि नाटक कंपनीतील कलहामुळे नाटक सादर होऊ शकले नाही.
 
नाटकांच्या संशोधनाच्या निमित्ताने हृषीकेश जोशींना १०० वर्षांपूर्वीचे गडकरींचे हे नाटक सापडले आणि ते रंगभूमीवर आणण्याचा त्यांनी निश्‍चय केला. भक्त प्रल्हादाच्या चरित्रावर आधारित असलेले हे मूळ पाच अंकी नाटक असून त्याची जोशी यांनी दोन अंकी रंगावृत्ती केली आहे.
भारतामध्ये १९६८ साली न्यायमूर्ती सिंघवी यांनी 'लोकपाल' हा शब्द प्रथम वापरला आणि त्या नावाचे बिल बनले. 'लोकपाल' हा शब्द नक्की कधी अस्तित्वात आला, याबद्दल काही भरवसा देता येत नाही, असे असले तरी गडकऱ्यांनी हा शब्द आधीच वापरला होता, हे यावरून दिसते. भारतात लोकपाल बिलासंदर्भात जे जे म्हणून काही झाले, त्याचे अनेक संदर्भ 'गर्वनिर्वाण' नाटकात दिसतात.
 
गडकऱ्यांनी जेव्हा 'गर्वनिर्वाण' लिहिले त्यावेळी ते २३ वर्षांचे होते. ज्या अर्थी हा 'लोकपाल' शब्द या नाटकात त्यांनी वापरला आहे, त्या अर्थी हा शब्दप्रयोग त्यांच्याआधी होत किंवा झालेला असला पाहिजे. 'लोकपाल' हा नुसता शब्दच नाही, तर ज्या अर्थी त्याची कर्तव्ये या नाटकात दिसतात, त्या अर्थी 'लोकपाल' ही 'सिस्टीम' त्यांना माहीत असली पाहिजे. तत्कालीन साहित्यात, राजकीय दस्तावेजांत, व्यवस्थेत 'लोकपाल' आधीपासूनच अस्तित्वात असला पाहिजे. आणि तसे नसेल तर 'लोकपाल' या शब्दाचे आणि या 'व्यवस्थे'चे श्रेय राम गणेश गडकऱ्यांना तरी दिले पाहिजे.
 
==लोकपाल नायक की खलनायक?==
५६,५६६

संपादने