"गो.ना. दातार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख गो. ना. दातार वरुन गो.ना. दातार ला हलविला: आद्याक्षरे
प्रस्तावना बांधणी
ओळ १:
'''गो.ना. दातार''' तथा '''गोविंद नारायण दातारशास्त्री''' ([[इ.स. १८७३]] - [[इ.स. १९४१]]) हे एक मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या सुरुवातीच्या मनोरंजक किंवा बोधपर कादंबर्‍या या आंग्ल कादंबरीकार रेनॉल्ड्स याच्या कादंबर्‍यांची रूपांतरे होती. ''चतुर माधवराव'' या कादंबरीपासून दातारांनी स्वतंत्र कादंबर्‍या लिहायला सुरुवात केली.
 
==कौटुंबिक माहिती==
==दातारांचे घराणे==
दातारांचे घराणे हे पडेल गावातून निघून राजापूरला धोपेश्वर गावात कुळ म्हणून स्थायिक झाले होते. त्यांचे आजोबा प्रथम पडेल येथे रहात. गो.ना. दारांची पत्नी पोंभुर्ले येथील करंदीकरांकडची. मॅट्रिकपर्यंत शिकलेल्या गो.ना. दातारांना एक मुलगी (काशीबाई) व ६ मुलगे अशी अपत्ये होती. काशीचे लग्न दत्तात्रय मराठें यांच्याशी झाले.
 
==दातारांचा ग्रंथसंग्रह==
दातारांचे शिक्षण जरी मॅट्रिकपर्यंत झाले असले तरी त्यांचे खगोल, भूगोल आणि गणितावरही त्यांचे तितकेच प्रभुत्व असल्याने त्यांनी संस्कृत साहित्य, वेद, खगोल व आयुर्वेद आदी क्षेत्रातील रंथांचा मोठा संग्रह केला होता. वि.का. राजवाडेंची ग्रंथसंपदा, समग्र मोरोपंत व रामायणाचे मराठी भाषांतर तसेच रेनॉल्ड्सस व आर्थर कॉनन ड्रॉईल यांची पुस्तके त्यांच्या संग्रही असून शिळाप्रेसवर छापलेली सुमारे १५० वर्षे जुनी पुस्तके त्यांनी जपून ठेवली होती.
 
ओळ १०:
गो.ना. दातार हे कादंबरीकार होण्यापूर्वी घरी औषधे बनवत. त्यासाठी त्यांनी ‘रसायनशाळा’ हा कारखाना काढला. त्यातून त्यांनी तापावरील ‘नारायणज्वरांकुश’ या आपल्या पित्याच्या नावाने स्वनिर्मित गोळय़ांची निर्मितीही केली.
 
==दातारांचे राजकीय आणि सामाजिक जीवन==
दातारांवर शालेय जीवनापासून टिळकांची विचारधारा, त्यांचा राजकीय दबदबा यांचा प्रभाव असल्याने टिळक-गांधी यांच्या विचारधारेमुळे ते काँग्रेसवासी होऊन प्रचारक म्हणून स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाले. त्यामुळे राजापूर तालुका काँग्रेसचे काही काळ अध्यक्षपदही भूषवण्याचा मान त्यांनी मिळवला. त्याचप्रमाणे त्यांच्या घराशेजारी असणार्‍या हिरण्याकेशीय वेदपाठशाळेचे विश्वस्त आणि पदाधिकारपदही त्यांनी भूषवले होते.
 
==लिखाण==
==दातारांचे निखळ सकस आणि मनोरंजक लिखाण==
२०व्या शतकाच्या पूर्वार्धात गो.ना. दातार हे नाव मराठी वाचकांत अत्यंत लोकप्रिय होते. तत्कालीन वाचकांची नाडी ओळखून वाचकांना निखळ, सकस व मनोरंजनात्मक साहित्याची मेजवानी देताना प्रणय, पराक्रम, गूढ रहस्य व वास्तववादी साहित्याचा नजराणा पेश करण्यात त्यांचा हातखंडा होता.
 
ओळ २३:
अशा प्रकारे छोटी-मोठी पुस्तके, लग्नपत्रिका, मुंजपत्रिका, दुकानांची विविध पावती पुस्तके आदी मुद्रित साहित्य राजापूरच्या घरच्या पडवीतील छापखान्यात चालत असे. एकनाथी भागवत, रंगनाथी योगवासिष्ठ, ज्ञानेश्वरांची गाथा, रामदास स्वामींचे समग्र ग्रंथ यांचे टिपांसह त्यांनी संपादन केले. या शिवाय मोरेश्वर भट्ट लिखित ‘वैद्यामृत’, ‘शिवस्वरोदय’, ‘रामगीता’, ‘अध्यात्म रामायण’, ‘मुहूर्तमार्तंड’, ‘गणेशपुराण’ व ‘पद्मपुराण’ यांची भाषांतरे त्यांनी अत्यंत सरळ, सोप्या भाषेत केली होती.
 
==गो.ना. दातार यांच्या कादंबर्‍या व अन्य पुस्तके ==
* अधःपात
* अध्यात्म रामायण (अनुवादित)
ओळ ५१:
* ज्ञानेश्वरांची गाथा (संपादित)
 
{{DEFAULTSORT:दातार, गो.ना.}}
 
[[वर्ग:इ.स. १८७३ मधील जन्म]]
 
[[वर्ग:इ.स. १९४१ मधील मृत्यू]]
[[वर्ग:मराठी लेखक]]