"गो.ना. दातार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ ७:
२०व्या शतकाच्या पूर्वार्धात गो.ना. दातार हे नाव मराठी वाचकांत अत्यंत लोकप्रिय होते. तत्कालीन वाचकांची नाडी ओळखून वाचकांना निखळ, सकस व मनोरंजनात्मक साहित्याची मेजवानी देताना प्रणय, पराक्रम, गूढ रहस्य व वास्तववादी साहित्याचा नजराणा पेश करण्यात त्यांचा हातखंडा होता.
 
दातारांचे अगदी सुरुवातीचे लेखन हे भारतात प्रचलित असणाऱ्या आख्यांयिकांवर आधारित होते. ते लिखाण चालू असतानाच त्यांनी रेनॉल्ड्स या इंग्रजी लेखकाच्या सर्व कादंब-यांचेकादंबर्‍यांचे मराठीत भाषांतर करणे सुरू केले व मराठी साहित्यात मोलाची भर टाकण्याचे कार्य केले. या कादंबऱ्यांमध्येकादंब र्‍यांमध्ये त्यांनी भारतीय वातावरण व इतिहास यांचा अत्यंत कौशल्याने वापर केला. परिणामी वाचकांना त्यांनी या वाचनाचे वेड लावल्याने त्या काळात ते स्वत:च काही आख्यायिकांचा विषय बनले होते.
 
==कादंबर्‍या छापण्यासाठी छापखाना==
आपल्या कादंबर्‍या छापण्यासाठी दातारांनी स्वत:चा छापखाना सुरू केला होता. त्यासाठी लागणारी सर्व यंत्रसामग्री त्यांनी मुंबईतील प्रख्यात बाटलीबॉय कंपनी व निर्णयसागर यांच्याकडून मिळवली. छपाईची सर्व कामे हाताळताना अगदी लेखनापासून प्रकाशनापर्यंतची कामे ते स्वत:च करीत असत.
 
अशा प्रकारे छोटी-मोठी पुस्तके, लग्नपत्रिका, मुंजपत्रिका, दुकानांची विविध पावती पुस्तके आदी मुद्रित साहित्य राजापूरच्या घरच्या पडवीतील छापखान्यात चालत असे. एकनाथी भागवत, रंगनाथी योगवासिष्ठ, ज्ञानेश्वरांची गाथा, रामदास स्वामींचे समग्र ग्रंथ यांचे टिपांसह त्यांनी संपादन केले. या शिवाय मोरेश्वर भट्ट लिखित ‘वैद्यामृत’, ‘शिवस्वरोदय’, ‘रामगीता’, ‘आध्यात्म रामायण’, ‘मुहूर्तमरतड’, ‘गणेशपुराण’ व ‘पद्मपुराण’ यांची भाषांतरे त्यांनी अत्यंत सरळ, सोप्या भाषेत केली होती.
 
 
==गो.ना. दातार यांच्या कादंबर्‍या व अन्य पुस्तके ==
* अधःपात
* इंद्रभुवन गुहा
* एकनाथी भागवत (संपादित)
* कालिकामूर्ती
* चतुर माधवराव
Line १९ ⟶ २५:
* मानसिक यातना
* मोलकरीण
* रंगनाथी योगवासिष्ठ (संपादित)
* रहस्यभेद
* रामदास व रामदासी ग्रंथ (संपादित)
* शापविमोचन
* शालिवाहन शक
Line २६ ⟶ ३३:
* विश्वनाथ
* श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर
* ज्ञानेश्वरांची गाथा (संपादित)