"बंजारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ४९:
नागपूर विद्यापिठातून सन 1937 साली बी.ए. ची पदवी घेतली. पुढे 1940 साली नागपूर विद्यापीठ विधी महाविद्यालयातून एल.एल.बी शिक्षण घेऊन कायद्याची पदवी मिळवली. सन 1941 साली प्रारंभी अमारावतीचे प्रख्‍यात वकील कै.बॅ. पंजाबराव देशमुख यांच्‍याबरोबर व नंतर पुसद येथे स्‍वतंत्रपणे वकीली व्‍यवसायास सुरुवात केले. सर्वांचे विरोध पत्‍करुन दि. 16 जुलै 1941 रोजी त्‍यांनी बाह्मण समाजातील वत्‍सला घाटे हिच्‍याशी आंतरजातीय विवाह केला. दोघांच्‍याही परिवारातुन आंतरजातीय विवाहास कडाडुन विरोध होता. दोघानीही समाजाची पर्वा न करता समाज परिवर्तनाचा हा मार्ग त्‍यांनी निर्माण केला. वकीली व्‍यवसायात त्‍यानी दिन-दुबळ्या, गोर-गरिबांना मदतीचा हात देऊन विविध अडचणीतून बाहेर काढण्‍याचे प्रयत्‍न केले. यात त्‍यांना मोठे यश आले.
डॉ. पंजाबराव देशमुख या नेत्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली एक धडाडीचे समाज कार्यकर्ता म्‍हणून वसंतराव नाईक यांची संपूर्ण यवतमाळ जिल्‍ह्यात ख्‍याती पसरली. या काळात शेतक-यांच्‍या फायद्याचे 74 कलम पास व्‍हावे, यासाठी शेतक-यांत मिळून प्रचार केला. सन 1943 साली पुसद कृषी मंडळाचे अध्‍यक्ष म्‍हणून त्‍यांची निवड झाली. सन 1946 मध्‍ये त्‍यांनी काँग्रेस पक्षामध्‍ये प्रवेश केला. वसंतराव नाईक यांचे राजकारण हे मूळक्षेत्र नसताना देखील जनमानसाच्‍या‍ विश्‍वासातून सन 1950 पर्यंत तालुका अध्‍यक्ष म्‍हणून निवड करण्‍यात आली. याचवर्षी पुसद हरिजन मोफत वसतीगृहाचे व दिग्रस राष्‍ट्रीय मोफत छात्रालयाचे नाईक हे अध्‍यक्ष होते. त्‍यावेळी विदर्भ प्रतिक अध्‍यक्ष बियागीकडे होते. सन 1946 मध्‍ये पुसद नगरपालिका निवडणुकीमध्‍ये काँगेसच्‍यावतीने निवडणुक लढविली त्‍यात वसंतराव नाईक विजयी होवून त्‍यांची पुसद नगरपालिकेचे नगराध्‍यक्ष म्‍हणून निवड झाली. त्‍यावेळी झालेल्‍या निवडणुकीत वसंतराव नाईक हे 12 हजार मतांनी निवडून आले. यवतमाळ जिल्‍ह्याचे प्रतिनिधी म्‍हणून मध्‍यप्रदेश विधानसभेवर निवडून आले तसेच मध्‍यप्रदेश मंत्रिमंडळात महसूल उपमंत्री झाले. सन 1951 साली ते मध्‍यप्रदेश सहकारी मध्‍यवर्ती बँकेचे संचालक होते. याचवर्षी विदर्भ प्रदेश समितीचे व कार्यकारिणीचे सदस्‍यपदी निवड झाली. सन 1956 साली भाषावार प्रांत रचना होईपर्यंत त्‍यांनी उपमंत्रीपदाची धुरा सांभाळली. त्‍यांनी महसूल खात्‍याची जबाबदारी अत्‍यंत हुशारीने पार पाडली. दि. 1 नोव्‍हेंबर 1956 रोजी द्विभाषीक मुंबई राज्‍याच्‍या मंत्रीमंडळात सहकार, कृषी, दुग्‍धव्‍यवसाय या खात्‍याचे मंत्री म्‍हणून त्‍यांचा समावेश झाला. त्‍यावेळी यशवंतराव चव्‍हाण हे मुख्‍यमंत्री होते. अखिल भारतीय काँग्रेसचे तसेच महाराष्‍ट्र विभागीय कॉग्रेस समितीचे व कार्यकारणीच्‍या सदस्‍यपदी त्‍यांची निवड झाली.
 
[[वर्ग:अन्य भाषेतील मजकूर वगळावयाची पाने]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बंजारा" पासून हुडकले