"पुरी (ओडिशा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २९:
मूर्ती घडविणे : ज्येष्ठ पौर्णिमेला देवांना स्नान घालून त्यांची पूजा, नेवैद्य वगैरे झाल्यावर आधीचे देव कोणासही दर्शन देत नाहीत. यालाच ‘अणसर’ असे म्हणतात. देव अणसरात गेले की नवीन दारूंना स्नान घालून दारूशाळेत आणतात. इथेच विश्वकर्मा त्यापासून चार नव्या मूर्ती बंद दाराच्या आत घडवतात. त्या घडवताना होणारे आवाज कोणाच्याही कानावर पडू नयेत म्हणून बाहेर अखंड वाद्यांचा गजर चालू असतो. ज्येष्ठ अमावास्येच्या रात्री नवीन मूर्तीना रथात बसवून जगन्नाथाच्या देवळाला प्रदक्षिणा घालतात. [[दैतापतीं]]खेरीज ही रथयात्रा इतर कोणीही बघत नाहीत.
 
त्याच अमावास्येच्या रात्री पूर्ण अंधारात जुन्या मूर्तीच्या आत असलेला अलौकिक पदार्थ (यालाच ‘ब्रह्म’ म्हणतात.) पती महापात्र (मुख्य पुजारी) दारे बंद करून, डोळ्यांना पट्टी बांधून, हातालाही कापड गुंडाळून ‘ब्रह्म’ बाहेर काढतात व नव्या मूर्तीमध्ये त्याची स्थापना करतात. हे झाल्यावर जुन्या मूर्तीना २७ फूट मातीखाली समाधी देतात.