"मराठी नाट्यसंगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
 
[[चित्र:Anuj and Smriti Mishra.jpg|thumb|right|सवाई गंधर्व (२००८)]]
मराठी [[संगीत नाटक]] ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे, असे मानले जाते. [[विष्णुदास भावे]] यांनी मराठी रंगभूमीचा श्रीगणेशा केला तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थाने प्रारंभ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल (१८८०) या नाटकाने झाला. त्यानंतर सौभद्र, रामराज्यवियोग, द्रौपदी, विद्याहरण, शारदा, स्वयंवर, मानापमान, [[संशयकल्लोळ]], एकच प्याला ...अशा संगीत नाटकांची परंपराच निर्माण झाली. १८८० ते १९३० हा संगीत नाटकांच्या आणि पर्यायाने नाट्यसंगीताचा सर्व अर्थांनी सुवर्णकाळ होता.
 
डिसेंबर १९१६ मध्ये संगीत स्वयंवर रंगभूमीवर आले. या नाटकात ३९ रागांचा वापर करून बांधलेली ५५ नाट्यगीते होती. या कालखंडात गाणी पुढे आणि नाटक मागे अशी परिस्थिती होती. ’संगीत [[कान्होपात्रा]]’ या नाटकाद्वारे [[मास्टर कृष्णराव]] यांनी यांनी ही परिस्थिती बदलली. त्यांनी नाट्यपदांना भावगीतांच्या चाली दिल्या होत्या. इ.स. १९६० नंतर पं [[जितेंद्र अभिषेकी]] यांनी नाट्यपदांमध्ये सुगम संगीताला प्राधान्य दिले. त्यामुळे नाटकांत ताना मारून गाणारे नट सुगम संगीत गाऊ लागले.
नाट्यसंगीतामुळे वेगवेगळ्या रागांचा प्रसार झाला. अनृतचि गोपाला (सूरदासी मल्हार), आनंदे नटती (मल्हार), उगवला चंद्र पुनवेचा (मालकंस), एकला नयनाला विषय तो झाला (पहाडी), कटु योजना ही विधीची (शंकरा), कठीण कठीण किती, कृष्ण माझी माता (बागेश्री), कोण अससी तू नकळे मजला (जोगकंस), खरा तो प्रेमा (पहाडी - मांड), गुरू सुरस गोकुळी (जयजयवंती), जय गंगे भागीरथी (कलावती), जय शंकरा गंगाधरा (अहिरभैरव), जयोस्तुते उषादेवते (देसकार), झणी दे कर या (अडाणा), तळमळ अति अंतरात (सोहनी), नाथ हा माझा (यमन), पुरुष हदय बाई (यमनकल्याण), अशी कित्येक उदाहरणे सांगता येतील. याशिवाय अनेक संतरचना नाट्यसंगीत म्हणून वापरल्या गेल्या आणि विविध रागांत त्यांची अनेक रूपे रसिकांच्या मनात ठसली. अवघाची संसार सुखाचा करीन (धानी), अगा वैकुंठीच्या राया (भैरवी), अमृताहुनि गोड, देवा धरिले चरण (भीमपलास), देवा तुझा मी सोनार (जौनपुरी) या नाट्यगीतांचा उल्लेख या संदर्भात करता येईल.
 
नाट्यसंगीताचे अनेक प्रवाह विविध कालखंडांत निर्माण झाले, त्यांना रसिकाश्रय लाभला. किर्लोस्करी काळातील नाट्यसंगीतावर कीर्तन परंपरेचा प्रभाव होता. घरगुती पण वास्तववादी अशी ही नाटके होती. विषयही बहुधा पौराणिक असत. उदा. शाकुंतल, सौभद्र, द्रौपदी, सावित्री, मेनका, आशानिराशा, रामराज्यवियोग, विधिलिखित. त्यानंतर देवलांच्या ‘शारदा’ ने अतिशय सोपी, सहज पण प्रासादिक पदे नाट्यसंगीतात आणली. त्यात माधुर्य होते आणि जिव्हाळाही होता. शिवाय एक सामाजिक भानही या पदांमध्ये होते. उदा. शारदा, [[संशयकल्लोळ]], मृच्छकटिक या नाटकांतील रचना. कृ. प्र. खाडिलकरांची पदे ओजोगुणयुक्त आणि आदर्शवादी आहेत. हे स्वयंवर, मानापमान, विद्याहरण, द्रौपदी, मेनका, त्रिदंडीसंन्यास यातील नाट्यपदे ऐकल्यानंतर लक्षात येते. सुभाषितांचे मोल यातील काही पदांना मिळाले, हेही एक वैशिष्ट्य मानावे लागेल. मी अधना न शिवे भीती मना, तव जाया नृपकन्या, प्रेमसेवा शरण, शूरा मी वंदिले, स्वकुलतारक सुता, ही ‘सुभाषितांची’ उदाहरणे होत. किर्लोस्कर, खाडीलकर, देवल यांच्यापेक्षा निराळा बाज गडकरी, सावरकर, वरेरकर, जोशी, रांगणेकर यांनी नाट्यगीतांतून पुढे आणला. नाट्यपदांची रचना अधिक काव्यमय, सोपी, गायनानुकूल झाली. नाट्यपदांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाली. हा बदल रसिकांनाही भावला.
 
गंधर्वोत्तर काळातील प्रतिभासंपन्न नाट्य-संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी यांनी मराठी संगीत नाटकातील संगीतात लक्षवेधक प्रयोग केले. नाट्यपदांची अ-विस्तारक्षमता (विस्ताराला अतिरेकी वाव नसणारी बांधीव रचना) आणि स्वतंत्र स्वररचना (बंदिशींवर आधारित नव्हे तर स्वतंत्र चाली बांधल्या) ही वैशिष्ट्ये जपत अभिषेकींनी नाट्यसंगीत आटोपशीर केले. भावगीतांचा सुंदर वापर (उदा० अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा, गर्द सभोती रानसाजणी, सर्वात्मका सर्वेश्वरा,) तसेच अनवट रागांचा वापर (उदा० धानी, बिहागडा, सालगवराळी) त्यांनी नाट्यसंगीतात केला. शहाशिवाजी, कट्यार काळजात घुसली, जय जय गौरीशंकर, नेकजात मराठा, पंडितराज जगन्नाथ, मदनाची मंजिरी, मंदारमाला, मेघमल्हार, संन्यस्तखड्ग, सुवर्णतुला, स्वरसम्राज्ञी - ही संगीत नाटकांची सूची पाहिली असता संगीतामुळे नाटक किती उत्कट व प्रभावी बनू शकते याचा प्रत्यय आपल्याला येतो.
|-
! width="20%"|ही बहु चपल वारांगना
! width="20%"|[[संशयकल्लोळ]]
! width="20%"|खमाज
|-
५५,५८१

संपादने