"मोहन जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''मोहन विष्णू जोशी''' (जन्म : बंगलोर, १२ जुलै, इ.स. १९५३) हे रंगमंचावरील आणि चित्रपटातील एक प्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत. ते मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत (इ.स. २०१५)
 
मोहन जोशींना लहानपणापासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. त्यामुळे वडिलांनीही नाटकात काम करण्याची परवानगी दिली. नाटकात काम करण्याचा प्रारंभ त्यांनी १९६६ म्हणजे इयत्ता सहावीत असल्यापासून केला. पहिले नाटक ’टुणटुण नगरी खणखण राजा’ हे होते. नाटके करणे सुरू असताना ते बी.कॉम. झाले. पदवीधर झाल्यावर पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून किर्लोस्कर कंपनीत नोकरीला लागले. पण नाटकाच्या दौर्‍यांसाठी सुट्ट्या लागायच्या आणि त्यासाठी प्रत्येक वेळी खोटे बोलणे अपरिहार्य झाले. एक दिवस व्यवस्थापकाजवळ त्यांचे बिंग फुटले आणि त्यांनी नोकरी किंवा नाटक यापैकी एक निवडायला सांगितले. मोहन जोशी यांनी शांतपणे विचार करून दुसर्‍या दिवशी नोकरीचा राजीनामा दिला.
ओळ ६:
 
नाटकाने पोट भरेल अशी स्थिती नव्हती त्यामुळे स्वत:चा ट्रक घेऊन मोहन जोशी ड्रायव्हर झाले. आठ वर्षे ड्रायव्हर म्हणून काम केले. पुढे ‘एक डाव भुताचा’ या पहिल्या मराठी चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली, आणि शेवटी ते अभिनयक्षेत्रात स्थिरावले.
 
==मोहन जोशी यांचे कुटुंबीय==
मोहन जोशींची आई म्हणजे माहेरच्या कुसुम भावे. त्या साहित्यिक [[पु.भा. भावे]] यांच्या चुलत भगिनी होत. वडील (अण्णा) खडकीला मिलिटरीच्या ईएम्‌ई वर्कशॉपमध्ये नोकरी करत. त्यांच्या बदल्याही होत. आईचे माहेर नागपूरचे आणि सासर अमरावतीचे. मोहन जोशी यांचे आई वडील पुण्यातील नवी पेठ येथील फाटकांच्या वाड्यात रहात. रवींद्र आणि अविनाश हे मोहन जोशींचे मोठे भाऊ; रवींद्र सर्वात मोठे. त्यांचे एक वर्कशॉप होते. मोहन जोशी सर्वात धाकटे. वडिलांचे मामा बाबा साठे हे [[भरत नाट्य मंदिर]]ात मेकअपमन होते. गौरी आणि नंदन ही मोहन जोशींची मुले. रवींद्र जोशींची पत्‍नी माहेरची रोहिणी फडणीस. त्यांचा मुलगा डॉ.अतुल रवींद्र फडणीस अमेरिकेत स्थायिक झाला आणि इंजिनिअर झालेला धाकटा जय पुण्यात.
 
==गौरीनंदन थिएटर्स==
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहन_जोशी" पासून हुडकले