"कासव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १२:
* '''हिरवे कासव''' (ग्रीन टर्टल) - या कासवाचे पोट गुळगुळीत असते तर पाठ अतिशय टणक असते. पोटाचा रंग पिवळट पांढरा असतो. या कासवांच्या शरीराच्या मानाने डोक्याचा आकार छोटा असतो. भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनार्‍यावर यांचा आढळ आहे.
* '''चोच कासव''' - (हॉक्स बिल टर्टल) या कासवांच्या तोंडाचा आकार चोचीसारखा असतो. त्यामुळे त्यांना चोच कासव म्हणतात. ही छोट्या आकाराची कासवांची जात आहे. आपली घरटी ही कासवे एकान्त असलेल्या ठिकाणी बांधणे पसंत करतात. [[स्पंज]], [[माखले]], [[झिंगे]] हे त्यांचे खाद्य असते. भारतात यांचा आढळ [[अंदमान आणि निकोबार]], [[निकोबार]] आणि [[लक्षद्वीप]] बेटांवर आहे.
* '''चामडी पाठीचे कासव''' - (लेदर बॅक टर्टल) - समुद्री कासवांमधील यांचा आकार सर्वांत मोठा असतो. यांची जास्तीतजास्त लांबी १७० सें.मी. आढळली आहे व वजन ५०० किलोग्रॅम. या कासवाची [[पाठ]] एका पातळ मऊ आवरणाने आच्छादलेली असते. यांचा जबडा नाजूक कात्रीसारखा असतो. [[जेली फिश]]हे यांचे आवडते खाद्य आहे. भारतात यांचा आढळ [[अंदमान आणि निकोबार]] आणि [[निकोबारलक्षदीप]] बेटांवर आहे.
 
तेल गळतीसारखे अपघात, यांत्रिक मासेमारीच्या जाळ्यात कासव अडकून मृत्यू, मानवाकडून किनारी भागांचा विध्वंस, कासवांच्या पाठींचा दागिन्यांसाठी वापर, अशा अनेक कारणामुळे समुद्री कासवांची संख्या कमी होते आहे. कासवांच्या सातही प्रमुख प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच त्या प्राणिसंवर्धन अणि संरक्षण कायद्याच्या परिघात येतात. '''समुद्री कासवांना पकडणे बेकायदेशीर आहे.'''
 
==== संवर्धन ====
"https://mr.wikipedia.org/wiki/कासव" पासून हुडकले