"बाळ ज. पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
बाळ ज. पंडितांनी क्रीडा समीक्षक म्हणून जवळजवळ ५० वर्षे वृत्तपत्रांतून लिखाण केले. त्यांची ३० हून अधिक क्रीडाविषयक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांच्या 'पराक्रमी दौरा' आणि 'दी लिटल मास्टर' या पुस्तकांना राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळाले. ’आमने सामने’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला. त्‍यांनी रसरंग. क्रीडाविश्व अशा अनेक मराठी मासिकांमधून लेखन केले आहे.
 
क्रिकेटमध्ये मराठीमध्ये समालोचन त्यांच्यापासूनआधी झालेदि.ब. त्यांनीदेवधरांनी सुरू केले आणि पंडितांनी ते लोकप्रिय केले.. दोघांनीही मराठीत क्रिकेटमधील वेगवेगळे शब्द शोधून काढलेबनवले आणि क्रिकेटप्रेमींपर्यंत पोहचविले. त्यामुळे चाहत्यांना क्रिकेट समजण्यास सोपे गेले. क्रिकेटमध्ये आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्येही त्यांचे योगदान राहिले आहे. मराठी वृत्तपत्रांत वापरले जाणारे षटक, षट्‌कार, चौकार, यष्टी, बाद, गोलंदाज, फलंदाज, सीमापार, आपटबार (बंपर) आदी क्रिकेटविषयक शब्द बहुधा पंडितांनी सुचविलेले आहेत.
 
जुन्या काळातील कर्नल सी.के. नायडू, क्रिकेटमहर्षी प्रा. दि.ब. देवधर, विजय हजारे, मन्सूर अली खान पतौडी, फारूख इंजिनियर, चंदू बोर्डे, अजित वाडेकर यांच्यापासून ते सुनील गावसकरच्या युगातील गुंडप्पा विश्वनाथ, दिलीप वेंगसरकर यांच्यासारख्या किती तरी खेळाडूंशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. या खेळाडूंच्या शैलीचे बाळ पंडित नेमकेपणाने वर्णन करीत. ज्या काळात कार्यालये, दुकाने आणि घरांघघरांत लोक रेडिओला कान लावून क्रिकेट सामन्यांचे वर्णन ऐकत, अशा काळात बाळ पंडितांचे धावते वर्णन ऐकणे म्हणजे मेजवानी असे. 'फलंदाजाने चेंडू टोलवलाय, क्षेत्ररक्षक धावतोय आणि चेंडू सीमापार...' अशा पद्धतीचे वर्णन ते त्यांच्या विशिष्ट शैलीत करीत, तेव्हा मराठी रसिक त्याला दाद देत असत.
 
भारतीय क्रिकेट संघाचा १९७१ मधील ऐतिहासिक इंग्लंड दौरा, तसेच १९७४ मधील दौरा समीक्षक म्हणून त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. त्या वेळची त्यांची वार्तापत्रेही गाजली होती. मूळचे क्रिकेटपटू असल्याने त्यांना या खेळाची सखोल जाण होती. त्यांच्याशी जुन्या काळातील क्रिकेटपटूंवर गप्पा मारणे म्हणजे एक मनस्वी आनंद असायचा. कर्नल सी.के. नायडू, विजय हजारे, बोर्डे, खंडू रांगणेकर, नाना जोशी, मधू रेगे, हेमंत कानिटकर यासारख्या किती तरी खेळाडूंचा खेळ त्यांच्या शब्दातून ऐकताना श्रोत्यांच्या माहितीत खूपच भर पडायची. पंडित यांनी क्रीडापटू, संघटक, लेखक आणि समालोचक अशा विविध भूमिकांतून मुशाफिरी केली. क्रिकेटवरील ते व्याख्यानेदेखील देत.
 
बाळ पंडित एमए, एल्‌एलबी होते. एल्‌एलबीच्या परीक्षेत ते पुणे विद्यापीठात तिसरे आले होते. क्रिकेट समालोचनाच्या कामाशिवाय बाळ ज. पंडित यांनी शैक्षणिक आणि धार्मिक संस्थावरही काम केले आहे. आळंदी देवस्थानचे देखील ते काही काळ विश्‍वस्त होते. शिक्षण प्रसारक मंडळींसारख्या नामवंत शिक्षण संस्थांचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले.