"स्वामी रामानंद तीर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २७:
==हैदराबाद मुक्तिसंग्राम==
[[हैदराबाद]] येथील निजामाचा सेनापती कासीम रझवी याच्या ‘रजाकार’ या दहशतवादी संघटनेने [[मराठवाड्यातील|मराठवाडा]] [[हिंदू]] जनतेवर अत्याचार सुरू केले होते. याचा विरोध करणे आवश्यक झाले होते. या साठी काम करणाऱ्या महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून स्वामीजी काम पाहत होते. यासाठीची चळवळ अनेक वर्षे चालली होती. २७ ऑक्टोबर, १९३८ रोजी स्वामीजी कार्यकर्त्यांसह सत्याग्रहासाठी हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले. त्यांना अटक झाली होती. ते सुमारे चार माहिने कारावासत् होते. यानंतर निजामाने जातीय दंगली घडवल्या व जनतेवर अत्याचारांना प्रोत्साहन दिले. यामुले सुटका होताच स्वामीजींनी भूमिगतपणे काम केले. याचा निजामाला इतका त्रास झाला की त्याने तडजोड मान्य करून संघटनेवरील बंदी हटवली.
‘हैद्राबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा’ अशी हाक रामानंदतीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली. याचा परिणाम होऊन लोक या संग्रामात सामील झाले. मुक्तिसंग्रामात आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ’व्हीजन’ हे साप्ताहिक चालवले होते. यामार्फत ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत. माणिकराव पहाडे, शंकरभाई पटेल, [[बाबासाहेब परांजपे]]. [[गोविंदभाई श्रॉफ]] हे तरूण स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते प्रमुख समर्थक होते.
तत्कालीन गृहमंत्री [[सरदार वल्लभभाई पटेल]] यांनी सशस्त्र कारवाई करून निजामाला शरण आणले. [[हैदराबाद संस्थान]] १७ सप्टेंबर १९७४ रोजी भारतात विलिन झाले.
स्वातंत्र्यानंतरच्या दोन निवडणुकांत [[गुलबर्गा]] व [[औरंगाबाद]] येथून ते लोकसभेवर निवडून गेले होते. १९७२ साली त्यांचे हैद्राबाद येथे निधन झाले.
==स्मृती==
एस. एम्. जोशींनी ‘प्रादेशिक ऐक्य व लोकशाहीसाठी स्वामीजींचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल’ असा त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे.
*यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ [[नांदेड]] येथील मराठवाडा विद्यापीठाला [[स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ]] असे नाव दिले.
*[[अंबाजोगाई]] येथे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व्यंकटराव डावळे प्रतिष्ठान व राज्य सरकार यांच्यातर्फे चालविले जाते.
*[[उस्मानाबाद]] येथे स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला चालवली जाते.
{{DEFAULTSORT:रामानंदतीर्थ}}
[[वर्ग:हैदराबाद मुक्तिसंग्राम]]