"प्रकाशीय विद्युत परिणाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
अनेक [[धातु]] त्यांवर प्रकाश (विद्युतचुंबकीय प्रारण) पडला असता त्यांमधील [[विजाणू|विजाणूंना]] बाहेर टाकतात. या परिणामाला प्रकाशीय विद्युत परिणाम असे म्हटले जाते. इ.स. १८८७ हेन्रिक हर्ट्झ या जर्मन शास्त्रज्ञाने प्रकाशीय विद्युत परिणामाचा शोध लावला. इ.स. १९२१ मध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ [[अल्बर्ट आइनस्टाइन]] यांनी याचे सैद्धांतिक स्पष्टिकरण दिले. याबद्दल त्यांना [[इ.स. १९२१]] साली [[नोबेल पारितोषिक]] मिळाले.
 
अभिजात विद्युतचुंबकत्वाच्या सिद्धांतानुसार हा परिणाम प्रकाशाची उर्जा विजाणुंना मिळाल्यामुळे घडतो. या दृष्टीकोनानुसार, धातुमधून बाहेर पडणाऱ्या विजाणूंचा बाहेर पडण्याचा दर हा प्रकाशाची तिव्रता आणि प्रकाशाची तरंगलांबी या दोन्ही गोष्टींवर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे या सिद्धांतानुसार अत्यंत मंद प्रकाश धातुवर टाकला असता विजाणू बाहेर पडायला बराच वेळ लागायला हवा. मात्र प्रयोगावरून हे दोन्ही निष्कर्ष चुकीचे आहेत असे दिसून येते.
 
 
[[वर्ग:वैज्ञानिक सिद्धांत]]