"दंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ५:
दंडीच्या नावावर जरी किमान तीन ग्रंथ असले, तरी त्यापैकी काव्यदर्श (किंवा काव्यादर्श) व दशकुमारचरित हे दोन ग्रंथ त्याचेच आहेत असे निश्चितपणे सांगता येते. काव्यादर्श हा ग्रंथ काव्यचर्चेच्या काळातील स्वतंत्र ग्रंथ आहे. त्यामुळे तो संस्कृत साहित्यशास्त्राच्या परंपरेत मान्यता पावलेला ग्रंथ आहे. विद्वानांनीही या ग्रंथाचा खूप आदर केला आहे. महाकाव्याचे चिंतन आणि समीक्षण करणारा हा ग्रंथ प्रमाणभूत म्हणून मानण्यात येतो. या ग्रंथाची श्लोकसंख्या ३६० असून, त्याचे तीन परिच्छेद आहेत. पहिल्या परिच्छेदात महाकाव्याची व्याख्या केली आहे; तसेच महाकाव्याचे तीन विभागही सांगितले आहेत.
 
काव्यदर्श ग्रंथात दंडीची सूक्ष्म बुद्धी, कल्पकता आणि तर्कशुद्ध विचारपद्धती दृष्टीस पडते. त्यावरूनच दंडी हा संस्कृत कवी आणि काव्यशास्त्रज्ञ म्हणून गौरविला गेला आहे. दंडीने लिहिलेले गद्य ग्रंथही वैदर्भी शैलीत असून, त्यांतील पदलालित्य रसिकांना मुग्ध करणारे आहे. म्हणूनच - ''[[संस्कृत महाकवी|'दण्डिन: पदलालित्यम्''']] असा त्याच्या शैलीचा गौरव संस्कृत रसिकांनी केला आहे.
 
दंडीच्या मते गद्य, पद्य आणि मिश्र असे काव्याचे तीन विभाग आहेत, तर आख्यायिका आणि कथा असे महाकाव्याचे दोन प्रकार आहेत. महाकाव्याबरोबरच दंडीचे वाङ्मय प्रकाराचेही भेद वर्णिले आहेत. संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि मिश्र असे वाङ्मयाचे चार भाग त्यांनी सांगितले आहेत, तर वैदर्भी आणि गौडी भाषाशैलीचे प्रकार आणि काव्याचे दहा गुण वर्णिले आहेत. विदग्ध महाकाव्याची लक्षणे मांडणारे जे महत्त्वाचे ग्रंथ शास्त्रकारांनी मान्य केले आहेत त्यात अग्निपुरण, काव्यालंकार, सरस्वतीकंठाभरण, साहित्यदर्पण आणि दंडीच्या काव्यादर्श या ग्रंथाचा आवर्जून उल्लेख केला आहे. कवित्वशक्ती कशामुळे प्राप्त होते याचे विवेचन करताना दंडीने म्हटले आहे, की प्रतिभा, श्रुत आणि अभियोग या तीन गुणांमुळे कवित्वशक्ती उभी राहते.
"https://mr.wikipedia.org/wiki/दंडी" पासून हुडकले