"गोरखनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 8 langlinks, now provided by Wikidata on d:Q983584
No edit summary
ओळ २९:
 
गोरखनाथांनी गहिनीनाथांना नाथसंप्रदायाची दीक्षा दिली.
==इतर नावे व कथा==
 
[[त्र्यंबकेश्‍वर]] हे नाथसंप्रदायाचे उगमस्थान मानले जाते. याच ठिकाणी गुरू गोरक्षनाथांनी नऊ नाथांना व ८४ सिद्धांना उपदेश केला आहे. ते उपदेश केलेले ठिकाण म्हणजे अनुपम शिळा होय. या अनुपम शिळेला बोलीभाषेत अनुपान शिळा असेही म्हटले जाते. मनःशांतीच्या शोधात असलेल्या [[परशुरामा|परशुरामालाही]] गुरू गोरक्षनाथांनी याच अनुपम शिळेवर पात्र हातात दिले होते. त्या पात्रात ज्या ठिकाणी ज्योत पेटेल, तेथे [[तपश्‍चर्या]] करण्यास सांगितले होते. सध्याच्या [[कर्दळीवन]] येथे ज्योत पेटल्यानंतर तेथे ज्योतिस्वरूप गोरक्षनाथ प्रकट झाले, त्या वेळी तेथे मोठ्या प्रमाणात [[धुके]] पसरले होते. [[कन्नड]] भाषेत धुक्‍याला मंजू म्हणत असल्याने गुरू गोरक्षनाथांना '''मंजूनाथ''' असेही म्हणतात. याच परंपरेचा भाग म्हणून आजही नाथसंप्रदायातील १२ पंथांतील एका योग्याची आळीपाळीने [[लोकशाही]] पद्धतीने राजेपदी नियुक्ती करून त्या राजाच्या हातात पात्र देऊन नाथांची झुंडी त्र्यंबकेश्‍वर येथून कर्दळीवनाच्या दिशेने निघते.
 
==अनुपम शिळा==
साठ हजार ऋषींच्या विनंतीवरून गुरू गोरक्षनाथांनी त्यांना उपदेश देण्याचे मान्य केले. त्या सर्व ऋषींना घेऊन गोरक्षनाथ [[कौलगिरी]]कडे गेले. तेथे त्यांनी एका शिळेवर सर्व ऋषींना बसवून उपदेश दिला. त्यातील गुरू गोरक्षनाथांची सांगितलेला प्रत्येक शब्द जसाच्या तसा नऊ जणांनी ग्रहण केला. त्यांना नवनाथ असे म्हणतात. तो उपदेश ऐकून ८४ जण उभे राहिले व त्यांना त्यातील भावार्थ समजला. म्हणून त्यांना '''सिद्ध''' म्हणतात. नवनाथ व ८४ सिद्धांना या शिळेवर गुरू गोरक्षनाथांची उपदेश केल्याने या शिळेला अनुपम शिळा म्हणतात. अनुपम म्हणजे उपमा नसलेली शिळा.
{{नवनाथ}}
{{हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय}}
"https://mr.wikipedia.org/wiki/गोरखनाथ" पासून हुडकले