"विशाखापट्टणम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४६८ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
|longd = 83 |longm = 13 |longs = 7 |longEW = E
}}
'''विशाखापट्टणम''' ([[तेलुगू भाषा|तेलुगू]]: విశాఖపట్నం) (जुने नाव विजगापट्टण Vizagapattan) हे [[भारत|भारताच्या]] [[आंध्र प्रदेश]] राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. विशाखापट्टणम शहर आंध्र प्रदेशच्या वायव्य भागात [[पूर्व घाट]] व [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागराच्या]] मध्ये वसले आहे. २०११ साली १७.३० लाख लोकसंख्या असलेले विशाखापट्टणम भारतामधील १७व्या क्रमांकाचे मोठे शहर होते. वॉल्टेअर आणि विशाखापट्टणम ही जुळी शहरे आहेत. वॉल्टेअर हे एक रेल्वे जंक्शन आहे.
 
विशाखापट्टणम भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील एक प्रमुख शहर असून ते देशातील पाचव्या क्रमांकाच्या वर्दळीचे [[बंदर]] आहे. [[भारतीय नौदल|भारतीय नौसेनेच्या]] ''ईस्टर्न नेव्हल कमांड''चे मुख्यालय येथे आहे.
 
ऐतिहासिक काळादरम्यान विशाखापट्टणम [[कलिंग]] साम्राज्याचा भाग होते. १५व्या शतकात येथे [[विजयनगरचे साम्राज्य|विजयनगर]] तर १६व्या शतकात [[मुघल साम्राज्य|मुघलांची]] सत्ता होती. १८व्या शतकात [[फ्रान्स|फ्रेंचांच्या]] अधिपत्याखाली राहिल्यानंतर इ.स. १८०४मध्ये येथे [[ब्रिटीश राज|ब्रिटिशांची]] राजवट आली जी भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत अस्तित्वात होती.
 
यिशाखापट्टणम या शहराला लोक अजूनही वैझॅग (Vizag) या संक्षिप्त नावाने ओळखतात.
 
==जनसांख्यिकी==
५५,२३४

संपादने