"टोमॅटो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२:
'''टोमॅटो''' (ब्रिटिश उच्चार टोमाटो, अमेरिकन उच्चार टोमेटो, हिंदी उच्चार टमाटर, कोकणी उच्चार टंबाटे किंवा तांबाटी) ही एक फळभाजी आहे. मराठीत या फळाला टोमॅटो किंवा बेलवांगे म्हणतात.
 
==itihaasa==
मानवाला टोमॅटोची ओळख इ.स. १५५४ च्या सुमारास झाल्याची नोंद इतिहासात झालेली आहे.ही मुळची पेरू देशातील वनस्पती आहे. १५५०च्या सुमारास युरोपियन साम्राज्यातील इटली या देशाने प्रथम टोमॅटोचे लागवड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ब्रिटन, स्पेन, मध्य युरोपियन देशांनी औषधी समजून या वनस्पतीची लागवड केली. अमेरिकेत थॉमस जेकर्सनने १७८१च्या सुमारास व्हर्जीनियामध्ये प्रथम टोमॅटोची लागवड केली. तेथून एका फ्रेंच माणसाने १७८९ साली फिलाडेल्फिया येथे ही वनस्पती नेली. मात्र इ. स. १८०० सालापासून टोमॅटोचा अन्नात समावेश झाला. भारतात टोमॅटोची माहिती इ.स. १९०० सालापासून असावी.
 
==महराष्ट्रातील टोमॅटोच्या जाती==
* चेरी - ही तैवानहून येणारी जात आहे. ही जात साधारण जंगली प्रकारची असून फळांचा आकार गोलाकार टूटी-फ्रूटीसारखा असतो. पाण्याची कमतरता असल्यास रंग फिकट तांबूस, तर थंडीमध्ये लागवड केल्यास गर्द लाल असतो. पंचतारांकित हॉटेलांत चेरी फळाच्या ऐवजी ठेवण्याची प्रथा आहे.
* धनश्री - टोमॅटो नारंगी रंगाचे, मध्यम आकाराचे व जास्त गराचे
* नामधारी - फळ कडक, चौकोनी गोल (किंवा अंडाकृती गोल), गर्द लाल व वजनदार
* भाग्यश्री - टोमॆटो मोठ्या आकाराचे, लांबट गोल लांबट व पूर्ण लाल रंगाचे
* रूपाली - गर भरपूर असलेली जात
* शिवाजी - फळ लंबगोलाकार, गर्द लाल रंगाचे, कडक व ८५ ते ९० ग्रॅम वजनाचे
 
==टोमॅटो लागवडीसाठी हवामान==
टोमॅटो हे समशीतोष्ण सावमानात येणारे नाजूक पीक असल्याने बदलत्या हवामानातले कडक ऊन, ढगाळ हवा, झिमझिम वा मुसळधार पाऊस, धुई, धुके, कडाक्याची थंडी अथवा ढगाळ हवेतील गरम व दमटपणा या पिकास मानवत नाही.
 
==टोमॅटोचे महत्त्व व प्रक्रिया उद्योग==
टोमॅटोचे आहारात विशेष औषधी महत्त्व नसले तरी सुधारीरि जातींचा लालभडक आकर्षक रंग, आकार व चवीमुळे सर्व प्रकारच्या हॉटेल्समध्ये, शहरी वातावरणातील घरांमध्ये टोमॅटोचा तोंडी लावण्यासाठी व कोशिंबीरीममध्ये सर्रास वापर केला जातो. शहरातील हॉटेलमध्ये फ्रेंच फ्राईड, बटाटा चिप्सबरोबर टोमॅटो केचप देण्याची रीत आहे. टोमॅटोमध्ये 'अ' (०.६४%) व 'क' (२.८२%) जीवनसत्त्व असते. 'लायकोपीन' या घटकामुळे टोमॅटोस लाल रंग येतो. टोमॅटोपासून पेस्ट (प्यूरी)पासून टोमॅटो सूप, केचप, ज्यूस, टोमॅटोपुरी लोणचे इत्यादी पदार्थ तयार करतात.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/टोमॅटो" पासून हुडकले