"ऑक्टाव्हियो पाझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ऑक्टाव्हियो पाझ (जन्म १९१४ मृत्यू १९९८) हे एक मेक्सिकन कवी, लेखक, व...
 
No edit summary
ओळ १:
ऑक्टाव्हियो पाझ (जन्म १९१४ मृत्यू १९९८) हे एक मेक्सिकन कवी, लेखक, व प्रशासकीय अधिकारी होते. त्यांना १९९० सालचे साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. १९६० च्या दशकात पाझ भारतातले मेक्सिकोचे राजदूत होते. भारताततील वास्तव्याचा त्यांच्या लेखनावर प्रगाढ प्रभाव आहे असे मानले जाते. “एल लाबिरिन्तो दे ला सोलेदाद” (“एकांताचा भुलभुलैय्या”), “एल मोनो ग्रामातिको” (“वानर व्याकरणकार”), व “लादेरा एस्ते” (“पुर्वेकडचे उतार”) ही त्यांची मुख्य ललित पुस्तके आहेत. याशिवाय त्यांची वीसहून अधिक काव्यसंग्रहे प्रकाशित आहेत. त्यातल्या अनेकांचे जगभरातील अनेक भाषांत अनुवाद उपलब्ध आहेत.