"लखनौ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३१:
भारतातील [[राष्ट्रीय महामार्ग २४|रा.मा. २४]], [[राष्ट्रीय महामार्ग २५|रा.मा. २५]], [[राष्ट्रीय महामार्ग २८|रा.मा. २८]] व [[राष्ट्रीय महामार्ग ५६|रा.मा. ५६]] हे चार [[राष्ट्रीय महामार्ग]] लखनौमधून जातात. [[लखनौ चारबाग रेल्वे स्थानक]] हे येथील प्रमुख रेल्वे स्थानक [[उत्तर रेल्वे (भारत)|उत्तर रेल्वेच्या]] लखनौ विभागाचे मुख्यालय व भारतातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. नागरी परिवहनासाठी येथे अनेक बसमार्ग उपलब्ध आहेत. लखनौ-[[कानपूर]] ही [[उपनगरी रेल्वे]]सेवा ह्या दोन शहरांदरम्यान रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीची आहे. [[लखनौ मेट्रो]] ही [[जलद परिवहन]] प्रणाली लखनौमध्ये सध्या बांधली जात असून ती २०१६-१७ साली वापरात येईल असा अंदाज आहे.
 
[[चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ]] लखनौमधील प्रमुख [[विमानतळ]] असून भारतामधील बहुतेक सर्व प्रमुख शहरे लखनौसोबत थेट जोडली गेली आहेत. ह्याशिवाय [[मध्य पूर्व]]ेतील [[दुबई]], [[रियाध]], [[मस्कत]] इत्यादी शहरांसाठी देखील लखनौहून थेट विमानसेवा उपलब्ध आहे.
 
==शिक्षण==
लखनौमध्ये उच्च शिक्षणासाठी अनेक नामांकित महाविद्यालये आहेत. [[भारतीय प्रबंध संस्थान लखनौ]] ही नामांकित व्यापार प्रशासन शिक्षण संस्था लखनौमध्ये स्थित आहे. ह्याशिवाय भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, केंद्रीय औषधे संशोधन संस्था, भारतीय विषविज्ञान संशोधन संस्था इत्यादी अनेक प्रशिक्षण संस्था लखनौमध्ये आहेत.
 
==खेळ==
[[भारतीय बॅडमिंटन संघटना]] (''बॅडमिंटन असोसिएअशन ऑफ इंडिया'') ह्या भारतामधील [[बॅडमिंटन]] खेळाच्या सर्वोच्च नियंत्रण संस्थेचे मुख्यालय लखनौमध्ये आहे. [[के.डी. सिंग बाबू स्टेडियम]] हे लखनौमधील प्रमुख [[क्रिकेट]] मैदान असून येथे अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजीत केले जातात. [[भारतीय बॅडमिंटन लीग]]मध्ये खेळणारा [[अवध वॉरियर्स]] व [[हॉकी इंडिया लीग]]मध्ये खेळणारा [[उत्तर प्रदेश विझार्ड्स]] हे दोन लखनौमधील प्रमुख व्यावसायिक क्लब आहेत.
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Lucknow|लखनौ}}
*{{wikivoyage|Lucknow|लखनौ}}
 
{{भारतीय राज्ये आणि प्रदेशांची राजधानी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/लखनौ" पासून हुडकले