"लखनौ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २७:
 
उत्तर प्रदेश व भारताच्या राजकीय पटलावर लखनौला अनन्यसाधारण महत्त्व आहे. [[भारताचे पंतप्रधान|भारताचे माजी पंतप्रधान]] [[अटलबिहारी वाजपेयी]] येथील [[लखनौ (लोकसभा मतदारसंघ)|लखनौ]] लोकसभा मतदारसंघामधून सलग ५ निवडणुकांमध्ये विजय मिळवून लोकसभेवर गेले होते. भारताचे विद्यमान [[भारताचे गृहमंत्री|गृहमंत्री]] [[राजनाथ सिंह]] २०१४ सालच्या निवडणुकीत येथूनच निवडून आले.
 
==वाहतूक==
भारतातील [[राष्ट्रीय महामार्ग २४|रा.मा. २४]], [[राष्ट्रीय महामार्ग २५|रा.मा. २५]], [[राष्ट्रीय महामार्ग २८|रा.मा. २८]] व [[राष्ट्रीय महामार्ग ५६|रा.मा. ५६]] हे चार [[राष्ट्रीय महामार्ग]] लखनौमधून जातात. [[लखनौ चारबाग रेल्वे स्थानक]] हे येथील प्रमुख रेल्वे स्थानक [[उत्तर रेल्वे (भारत)|उत्तर रेल्वेच्या]] लखनौ विभागाचे मुख्यालय व भारतातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. नागरी परिवहनासाठी येथे अनेक बसमार्ग उपलब्ध आहेत. लखनौ-[[कानपूर]] ही [[उपनगरी रेल्वे]]सेवा ह्या दोन शहरांदरम्यान रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीची आहे. [[लखनौ मेट्रो]] ही [[जलद परिवहन]] प्रणाली लखनौमध्ये सध्या बांधली जात असून ती २०१६-१७ साली वापरात येईल असा अंदाज आहे.
 
[[चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ]] लखनौमधील प्रमुख [[विमानतळ]] असून भारतामधील बहुतेक सर्व प्रमुख शहरे लखनौसोबत थेट जोडली गेली आहेत. ह्याशिवाय [[मध्य पूर्व]]ेतील [[दुबई]], [[रियाध]], [मस्कत]] इत्यादी शहरांसाठी देखील लखनौहून थेट विमानसेवा उपलब्ध आहे.
 
{{भारतीय राज्ये आणि प्रदेशांची राजधानी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/लखनौ" पासून हुडकले