"सी.एन. अण्णादुराई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''सी.एन. अण्णादुराई''' तथा '''कोंजीवरम नटराजन अण्णादुराई''' (१५ सप्टें...
 
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट पदाधिकारी
'''सी.एन. अण्णादुराई''' तथा '''कोंजीवरम नटराजन अण्णादुराई''' ([[१५ सप्टेंबर]], [[इ.स. १९०९]]:कांचीपुरम, तमिळनाडू - ३ फेब्रुवारी, इ.स. १९६९:चेन्नई, तमिळनाडू) हे [[तमिळनाडू|तमिळनाडूचे]] मुख्यमंत्री आणि [[द्रविड मुन्नेत्र कळघम|द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे]] अध्यक्ष होते.
| नाव = सी.एन. अण्णादुराई
| चित्र = Annadurai, Chennai Airport.jpg
| चित्र आकारमान = 250 px
| चित्र शीर्षक = [[चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावरील अण्णादुराईंचा फलक
| पद = [[मद्रास राज्य]]ाचे व [[तमिळनाडूचे मुख्यमंत्री]]
| कार्यकाळ_आरंभ = फेब्रुवारी १९६७
| कार्यकाळ_समाप्ती = ३ फेब्रुवारी १९६९
| मागील = [[एम. भक्तवत्सलम]]
| पुढील = व्ही.आर. नेडुंचेळियन (कार्यवाहू)
| पद1 = [[राज्यसभा]] सदस्य
| कार्यकाळ_आरंभ1 = १९६२
| कार्यकाळ_समाप्ती1 = १९६७
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1909|9|15}}
| जन्मस्थान = [[कांचीपुरम]], [[मद्रास प्रांत]]
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1969|2|3|1909|9|15}}
| मृत्युस्थान = [[चेन्नई]]
| पक्ष = [[द्रविड मुन्नेत्र कळघम]]
| सही =
}}
'''सी.एन. अण्णादुराई''' तथा '''कोंजीवरम नटराजन अण्णादुराई''', लोकप्रिय नाव: अण्णा ([[तमिळ भाषा|तमिळ]]: கா. ந. அண்ணாதுரை; १५ सप्टेंबर १९०९ - ३ फेब्रुवारी १९६९) हे [[भारत]]ाच्या [[तमिळनाडू]] राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे [[मुख्यमंत्री]] होते. [[तमिळ भाषा|तमिळ भाषेतील]] एक निष्णात लेखक असलेले अण्णादुराई आपल्या भाषणशैलीसाठी देखील प्रसिद्ध होते. पेशाने प्रथम शाळा शिक्षक व नंतर पत्रकार असलेल्या अण्णादुराईंचा [[पेरियार]] ह्या द्रविडी चळवळकर्त्या नेत्यास पूर्ण पाठिंबा होता. अण्णादुराईंनी १९३७ साली पेरियारच्या ''द्रविडर कळघम'' ह्या पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षामध्ये झपाट्याने प्रगती करताना अण्णादुराई व पेरियार ह्यांमधील मतभेद वाढीस लागले. १९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य पेरियारच्या मते द्रविड लोकांसाठी वाईट बातमी होती परंतु अण्णादुराई ह्यांनी स्वातंत्र्याचे स्वागत केले.
 
अखेर १९४९ साली अण्णादुराईंनी आपल्या [[द्रविड मुन्नेत्र कळघम]] ह्य नव्या पक्षाची स्थापना केली. प्रामुख्याने ब्राह्मणविरोधी धोरणे व [[हिंदी भाषा|हिंदी भाषेचा]] तिटकारा असलेल्या अण्णादुराईंनी १९५३ साली स्वतंत्र तमिळनाडूची मागणी करण्याचे ठरवले होते परंतु १९५६ सालच्या राजकीय पुनर्रचनेदरम्यान [[मद्रास राज्य]]ामध्ये केवळ तमिळ भाषिक जिल्हेच राहिले व स्वतंत्र तमिळनाडू देशाची मागणी मागे पडली. वाढत्या लोकप्रियतेमुळे १९६७ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये द्रमुक पक्षाच्या आघाडीने २३७७ पैकी १७९ जागांवर विजय मिळवून दणदणीत बहुमत मिळवले व [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाची येथील सत्ता संपुष्टात आणली.
 
मुख्यमंत्रीपदावर केवळ २ वर्षे राहिल्यानंतर १९६९ साली [[कर्करोग]]ामुळे अण्णादुराईंचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला जमलेल्या सुमारे १.५ कोटी लोकांच्या गर्दीची नोंद [[गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स]]मध्ये करण्यात आली होती. चेन्नईमधील [[मरीना बीच]] येथे त्यांचे स्मारक असून शहरामधील ''अण्णा सलाई'' हा सर्वात वर्दळीच्या रस्त्याला, ''अण्णा नगर'' ह्या भागाला, [[अण्णा विद्यापीठ]] ह्यांना त्यांचेच नाव देण्यात आले आहे. अण्णादुराईंच्या मृत्यूनंतर द्रमुकमध्ये फूट पडून [[एम.जी. रामचंद्रन]]ने स्थापन केलेल्या [[अण्णा द्रमुक]] पक्षाला देखील त्यांचेच नाव दिले गेले आहे.
 
==बाह्य दुवे==
*[http://www.tamilnation.org/hundredtamils/annadurai.htm व्यक्तिचित्र]
{{कॉमन्स वर्ग|C. N. Annadurai|सी.एन. अण्णादुराई}}
 
{{तमिळनाडू राज्य}}
Line ८ ⟶ ३६:
[[वर्ग:द्रविड मुन्नेट्र कळगम पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:तमिळनाडूचे मुख्यमंत्री]]
[[वर्ग:इ.स.राज्यसभा १९०९ मधील जन्मसदस्य]]
[[वर्ग:इ.स. १९६९ मधील मृत्यू]]