"ठुमरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १६:
आधीच्या ठुमर्‍या अवधी, भोजपुरी, मिर्झापुरी ह्या बोलीभाषांमध्ये रचल्या गेल्या. अर्थात काही ठुमर्‍या मराठी आणि बंगाली भाषेतही आहेत.
 
रागांच्या विविध रसांमुळे ठुमरीतील वेगवेगळ्या भावनांना योग्य तो न्याय देणे शक्य होते. त्यामुळे जरी ठुमरी हा [[उपशास्त्रीय संगीत|उपशास्त्रीय गायनप्रकार]] असला तरी तो गाणे पक्की शास्त्रीय बैठक असल्याशिवाय सोपे नाही. कारण ही गाताना एका रागातून दुसर्‍यात जाऊन पुन्हा मूळ चालीवर येणे अगदी सहजरीत्या घडावे लागते. ठुमरी बहुतेक करून, ज्यांत ’बडे ख्याल’ गायले जात नाहीत, जे हलकेफुलके राग मानले जातात त्या काही ठरावीक रागांमध्ये बांधलेली असते. असे राग म्हणजे खमाज, पिलू, तिलंग, देस, तिलक-कामोद, मांड, जोगिया, कलिंगडा, शिवरंजनी, भैरवी इत्यादी.. ह्या रागांमध्ये भावपूर्तीला जास्त वाव असतो. अपवाद म्हणून काही ठुमर्‍या ’मोठ्या’ म्हणजे ज्या रागांमध्ये ’बडे ख्याल’ गायले जातात अशा रागांमध्ये सुद्धा बांधल्या गेल्या आहेत. उदाहरणार्थ, राग बिहाग, शहाणा, सारंग, पूर्वी, कल्याण, सोहोनी, वगैरे.
 
== बोल ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ठुमरी" पासून हुडकले