"गो.बं. देगलूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २५:
==देगलूरकरांचे सूर्यपूजेसंबंधीचे विचार==
इराणमध्ये फार पूर्वीपासून सूर्याची पूजा-आराधना होत असे. तिथे मूर्तिभंजक आक्रमक आल्यावर त्यांनी भारताकडे धाव घेतली. भारतातही हिंदूंमध्ये सूर्यपूजा होत होतीच. श्रद्धासाधर्म्यामुळे दोन्ही समाजांना एकत्र येणे शक्य झाले. या सामाजिक सरमिसळीचे स्पष्ट प्रतिबिंब सूर्यप्रतिमांमध्ये दिसते. भारतातील हिंदू हे पूर्वी यंत्ररूपातील सूर्याला किंवा प्रत्यक्ष सूर्याला अर्घ्य अर्पण करून पूजा करीत असत. इराणी जनतेच्या संपर्कामुळे भारतात सूर्याची मानवी रूपातील मूर्ती घडवली जाऊ लागली. प्रारंभीच्या काळातील सूर्यमूर्तीच्या अंगावर विशिष्ट प्रकारचा मुकुट, मेखला, आखूड धोतर आणि गुडघ्यापर्यंत येणारे बूट असा वेश दिसतो. हा इराणमधील मूर्तीवरून घेतलेला आहे.
 
==घरचे संस्कार==
देगलूरकरांचे घराणे हे भागवतभक्त असल्याने घरच्या संस्कारांमुळेच बहुधा देगलूरकर प्राचीन इतिहासाकडे वळले आणि मूर्तिशास्त्राचा अभ्यास करू लागले. मूर्तीचा, परंपरांचा, लोकसमजुतींचा चिकित्सक अभ्यास करण्याची त्यांना झालेली प्रेरणा ही घरचे संस्कार आणि वारकरी परंपरा यातूनच आली असावी.
 
एकनाथी भारूडात कामक्रोधरूपी विंचू असतो, तसाच सूरसुंदरींच्या मूर्तीमध्ये मांडीवर विंचू दाखवला जातो. बिंबब्रह्म, वास्तुब्रह्म या संकल्पनांचा देगलूरकरांना झालेला उलगडा आणि मंदिर स्थापत्यात दिसणार्‍या मकरमुख, कासव, गोमुख अशा अनेक प्रतीकांचा अर्थ लावण्यास मिळालेले यश, यांसाठी घरच्या संस्कारांचा पायाच अधिक उपयोगास आला असे ते म्हणतात.
 
==गो.बं. देगलूकरांची काही पुस्तके==