"गो.बं. देगलूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. गो.बं. देगलूरकर (जन्म : १०३४) हे [[मूर्तिशास्त्र|मूर्तिशास्त्राचे]] अभ्यासक आहेत. त्यांनी मराठवाड्यातील अन्वा, निलंगा आणि औंढ्या नागनाथ येथील अनेक मंदिरांतील मूर्तींचा खास अभ्यास केला आहे.
 
==जन्म आणि शिक्षण==
ते पुण्यातील डेक्कन कॉलेजचे कुलगुरु आहेत.
गो.बं देगलूरकरांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्य़ातील हिप्परगा येथे परमभागवत देगलूरकर घराण्यात झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. पदवी परीक्षेसाठी त्यांनी इतिहास हा विषय घेतला होता. पण आधुनिक इतिहास आवडेना म्हणून ते पदव्युत्तर पदवीसाठी त्यांनी प्राचीन इतिहास व पुरातत्त्वशास्त्र असे विषय घेतले.
 
पीएच.डी.साठी ‘कल्चरल हिस्ट्री ऑफ मराठवाडा’ हा विषय त्यांनी निवडला. त्यांच्या ‘व्हायवा’साठी विद्यापीठाबाहेरील विद्वान जाणकार म्हणून प्रा. [[ग.ह. खरे]] आले होते. मराठवाडा हाच मराठी संस्कृतीचा स्रोत असल्याचं मत त्यांनी थिसिसमध्ये मांडले आणि [[ग ह. खरे]] यांनी ते मान्य केले.
 
==नोकरी==
एम. ए. झाल्यावर देगलूरकर उस्मानिया विद्यापीठात अध्यापन करू लागले. संशोध सुरू करण्याआधीच त्यांनी नागपूरला त्यांनी प्राध्यापकपद स्वीकारले. तिथे डॉ. शांताराम भालचंद्र देव हे विभागप्रमुख म्हणून रुजू झाले होते. त्यांनी मूर्तिशास्त्र शिकवण्याची जबाबदारी देगलूरकरांवर टाकली. डॉ. देवांमुळे, देगलूकरांमध्ये प्राचीन स्थापत्यशास्त्र, कला, मूर्तिशास्त्र या विषयांमध्ये संशोधन करण्याची इच्छा प्रबळ झाली.
 
पुरातत्त्वशास्त्राच्या प्रेमाखातर नागपूरला मिळणार्‍या पगारापेक्षा कमी पगारावर डॉ. देगलूरकर [[पुणे|पुण्यातील]] डेक्कन कॉलेजमध्ये रुजू झाले. कालांतराने ते डेक्कन कॉलेजचे कुलगुरु झाले..
 
२०१४ साली सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर [[दुर्ग साहित्य संमेलन]] झाले. तिथे देगलूरकर संमेलनाध्यक्ष होते.