"भास्कर रामचंद्र भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३९:
लहानपणापासून इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाची भागवतांना आवड होती. शालेय जीवनात 'माय मॅगझिन' हे पुस्तक/नियतकालिक आणि गिबन्स, डिकन्स, थॅकरे तसेच [[ह. ना. आपटे]], [[विष्णुशास्त्री चिपळूणकर]] ह्यांचे साहित्य ह्यांमुळे प्रभावित होऊन भा.रा. भागवतांनी बालवयातच लेखन सुरू केले. घरातल्या साहित्यप्रेमी पोषक वातावरणामुळे त्यांनी 'वसंत' नावाचे मासिक काढले होते. बालपणी त्यांनी त्यांची आतेबहीण दया परांजपे हिच्या मदतीने 'निळे पाकीट' या रहस्यमय कादंबरीचे लेखन केले. ते छापूनही आले. वयाच्या दहाव्या वर्षी भागवतांची मांजरीवरील कविता 'आनंद' मासिकात छापून आली होती. त्याच सुमारास त्यांनी चित्रावरून लिहिलेली एक गोष्ट 'बालोद्यान' ह्या मासिकात प्रसिद्ध झाली होती.
 
भागवतांनी इ.स. १९३०च्या दशकापासून पत्रकारितेस आरंभ केला. इ.स. १९३५-३६मध्ये ते [[सकाळ (वृत्तपत्र)|दैनिक सकाळ]]चे उपसंपादक होते. इ.स. १९३७-३८ कालखंडात ते ''प्रकाश'' साप्ताहिकाचे संपादक होते <ref name="हूज हू १९९९">{{स्रोत पुस्तक | दुवा = http://books.google.com.sg/books?id=QA1V7sICaIwC&pg=PA133&lpg=PA133&dq=Bhaskar+Ramchandra+Bhagwat&source=bl&ots=i_r580SJGf&sig=iqOs_ZTPnPa9CdG0NiUmGkcFpY0&hl=mr&sa=X&ei=mTczUaqYE4P9rAe-iYGQDA&ved=0CCoQ6AEwAQ#v=onepage&q=Bhaskar%20Ramchandra%20Bhagwat&f=true | शीर्षक = हूज हू ऑफ इंडियन रायटर्स, १९९९ (खंड १) | संपादक = कार्तिकचंद्र दत्त | प्रकाशक = साहित्य अकादमी | वर्ष = इ.स. १९९९ | पृष्ठ = १३३-३४ | भाषा = इंग्लिश }}</ref>. ऑल इंडिया रेडियोच्या दिल्ली केंद्रावरील वार्तापत्राचे ते मराठी अनुवादक (इ.स. १९४१-४२) होते. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींच्या]] अटकेची बातमी प्रसारित न करण्याचे आदेश असतानाही त्यांनी ती केली आणि नोकरीचा राजीनामा देऊन ते भूमिगत झाले. तेव्हा त्यांचा विवाह [[लीलालीलावती भागवत]] यांच्याशी झालेला होता व त्या गरोदर होत्या. पण भा.रा. भागवत भूमिगत झाल्यावर त्यांना लपतछपत मुंबईत परत येणे भाग पडले. याच काळात [[एस.एम. जोशी]] यांच्यासोबत भागवत [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्य चळवळीत]] सहभागी होते. [[विसापूर]]च्या तुरुंगात त्यांनी त्याबद्दल कारावासही भोगला<ref name="हूज हू १९९९"/>. त्याच काळात त्यांची आई वारली. त्यांच्या थोरल्या मुलाचा - रवींद्र याचा - जन्मही ते तुरुंगात असतानाच झाला. या स्वातंत्र्यचळवळीतल्या सहभागाबद्दल त्यांना पुढे सरकारी निवृत्तिवेतन मिळत असे.
 
== साहित्यिक कारकीर्द ==