"सुमित्रा भट्टाचार्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
छो (शुद्धलेखन)
लग्नानंतर एक दोन वर्षांतच त्यांनी परत लिखाणाला आरंभ केला. १९७८ ते १९७९ या काळात त्यांनी लघुकथा लेखन केले आणि १९८५च्या आसपास त्या कादंबरी लेखनाकडे वळल्या. दहा वर्षाच्या आत, आणि विशेषतः ''काचेर दीवाल'' या कादंबरीनंतर त्यांची गणना बंगालच्या प्रमुख लेखकांमध्ये होऊ लागली.
 
सुचित्रा भट्टाचार्य यांच्या लेखनाचे विषय मध्यम वर्गीयांचे जीवन आणि त्यात होऊ घातलेले बदल हे असत. या बदलांमुळे समाजाजाचीसमाजाची मानसिकता कसकशी बदलत जाते, आणि तिच्यावर जागतीकरणाचा कसा प्रभाव पडत गेला हे त्यांच्या लेखनामधून दृग्गोचर होत असे. त्यांनी स्त्रियांच्या समस्यांवर लिहिले असले तरी त्या स्त्रीवादी लेखिका नव्हत्या.
 
सुचित्रा यांची वैचारिक स्पष्टता पोथीनिष्ठ नसून समाजनिष्ठच होती. म्हणून तर १९८० नंतरच्या आधुनिक बंगाली स्त्रियांचे प्रश्न त्या सहजपणे मांडू शकल्या. याच सहजपणामुळे त्यांच्या चार कथा/ कादंबर्‍यांवर निघालेले चित्रपटही लोकप्रिय झाले.
५५,४६६

संपादने