"पृथ्वी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
→‎आंतररचना: प्रताधिकारित भाग वगळला
Mahitgar (चर्चा | योगदान)
→‎पृथ्वीची संरचना: प्रताधिकारीत भाग वगळला
ओळ १०४:
 
==पृथ्वीची संरचना==
भूकवचातील खडकांचे रासायनिक व खनिज संघटन अनेक खडकांच्या प्रत्यक्ष विश्लेषणांद्वारे ठरविण्यात आले आहे. व्ही. एम्. गोल्डश्मिट यांनी याबाबतीत महत्त्वाचे कार्य केले आहे. जमिनीवर पडलेल्या उल्का म्हणजे अशनी होत व ते सूर्यकुलातील पिंडांचेच (उदा., लघुग्रहाचे) तुकडे असल्याचे मानले जाते. त्यामुळे अशनींचे घटक हे पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रातिनिधिक घटक ठरू शकतील. तसेच वर्णपटांच्या साहाय्याने सूर्याचे व इतर ताऱ्यांचे विश्लेषण करून त्यांच्यातील मूलद्रव्ये कोणती हे काढण्यात आले आहे. या सर्वांवरून एकूण विश्वातील द्रव्याचे रासायनिक संघटक सापेक्षतः एकसारखे असावे, असे अनुमान केले जाते. या अनुमानावरून ज्या आदिम (आद्य) द्रव्यापासून पृथ्वी व ग्रह बनले, त्या द्रव्याच्या रासायनिक संघटनाचा शास्त्रज्ञांनी विचार केला आहे. एच्. झ्यूस व एच्. सी. यूरी या शास्त्रज्ञांच्या मतानुसार अशा आदिम द्रव्यात सिलिकॉन या मूलद्रव्याच्या एका अणूमागे इतर मूलद्रव्यांचे किती अणू असतील हे पुढे दिले आहे: हायड्रोजन ४०,०००, हीलियम ३,१००, कार्बन ३.५, नायट्रोजन ६.६, ऑक्सिजन २१.५, निऑन ८.६, सोडियम ०.०४, मॅग्नेशियम ०.९१, ॲल्युमिनियम ०.०९, फॉस्फरस ०.०१ गंधक ०.३७, आरगॉन ०.१५, कॅल्शियम ०.०५, लोह ०.०६, निकेल ०.०३. यांशिवाय दुसरी सहा मूलद्रव्ये त्यांपेक्षाही अल्प प्रमाणात असावीत. पृथ्वीवर यांपैकी बहुतेक सर्व मूलद्रव्ये विविध प्रमाणात व विविध संयुगांच्या रूपांत आढळत असून पैकी सिलिकॉन, मॅग्नेशियम व लोह ही मूलद्रव्ये पृथ्वीच्या संघटनाच्या संदर्भात महत्त्वाची आहेत.
 
=== आंतररचना ===
Line ११० ⟶ १०९:
 
=== बाह्यरचना ===
जलावरण : भूपृष्ठावरील पाण्याच्या भागाला जलावरण म्हणतात.त्यामध्ये महासागर,समुद्र, नद्या, सरोवर, हिम-बर्फ,⇨भूमिजल, तसेच सजीवांतील आणि खनिजांतील पाण्याचाही समावेश होतो. महासागर व समुद्र यांनी भूपृष्ठाचा सु. ७०.८% भाग व्यापला असून त्यांचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ०.०३% (१.४१×१०२४ ग्रॅ.) आहे. व त्यांची सरासरी खोली ३,८०० मी. आहे. जलावरण जवळजवळ सलग असले, तरी त्याची वाटणी विषम झालेली आहे. द. गोलार्धाचा बहुतेक भाग पाण्याने व्यापलेला आहे, तर जमिनीचा बहुतेक सर्व भाग उ. गोलार्धात येतो. पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी व आर्क्टिक हे प्रमुख महासागर असून त्यांपैकी पॅसिफिक सर्वांत मोठा (सु. अर्ध्या भूपृष्ठावर पसरलेला) व खोल आहे. भूमध्य, कॅरिबियन , बाल्टिक इ. विविध समुद्र हे महासागरांच्या शाखा आहेत. खंडाच्या भोवती खंड-फळी व तदनंतर खंडान्त उतार असून त्यापुढे महासागरांचे ओबडधोबड तळ असतात.
 
 
वातावरण : पृथ्वीभोवती हवेचे थर असून त्यांना वातावरण म्हणतात. तापमानीय संरचनेनुसार वातावरणाचे थर पाडण्यात येतात. सर्वांत खालच्या (भूपृष्ठालगतच्या) थराला क्षोभावरण म्हणतात. हा थर विषुववृत्ताजवळ फुगीर असून त्याची जाडी १० ते १६ किमी. आहे. त्यामध्ये एकूण वातावरणातील सु. ६०% वस्तुमान एकवटलेले आहे. या थरात जसजशी उंची वाढते तसतसे तापमान घटत जाते. याच थरात ढग, वर्षण, हिम, वादळे, वारे इ. वातावरणीय आविष्कार घडत असतात व यामध्ये जीवांची धारणा होऊ शकते. क्षोभावरणाच्या वर सु.५५ किमी. उंचीपर्यंत स्तरावरण असून ते अतिशीत आहे व त्यात उंचीनुसार तापमान वाढत जाते. स्तरावरणात बहुतकरून ढग वगैरे नसतात. स्तरावरणाच्या वर सु. ८० किमी. उंचीपर्यंत ऊष्मावरण व त्याच्या पलीकडे सु. ८०० किमी. उंचीपर्यंत बाह्यावरण असे वातावरणाचे थर आहेत.
 
 
==कक्षा आणि परिभ्रमण==
"https://mr.wikipedia.org/wiki/पृथ्वी" पासून हुडकले