"पृथ्वी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
→‎अतिरिक्त माहिती: प्रताधिकारीत मजकुर वगळला
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३४:
प्रावरण : पृथ्वीचे प्रावरण व गाभा यांच्या संघटनाची (खनिज व रासायनिक) माहिती अप्रत्यक्षपणे मिळू शकते. प्रावरण मुख्यत्वे लोह व मॅग्नेशियम यांच्या खनिजांचे बनलेले असावे. काहींच्या मते ⇨ ऑलिव्हीन गटातील खनिजांच्या संघटनांसारखे संघटन असणारी खनिजे प्रावरणाची प्रमुख घटक असून ⇨ पायरोक्सीन गटातील खनिजांच्या संघटनासारखे संघटन असणारी खनिजे त्याखालोखाल विपुल असावीत आणि डनाइट (ड्यूनाइट), पेरिडोटाइट व एक्लोझाइट यांच्यासारखे संघटन असणारे खडक हे प्रावरणातील प्रमुख खडक असावेत. अशनींतील बहुतेक सिलिकेटी खनिजेही ऑलिव्हीन व पायरोक्सीन गटांतील असल्याचे आढळले आहे; तसेच भूकंप तरंगाद्वारे मिळालेल्या माहितीवरूनही प्रवारण ऑलिव्हिनासारख्या खनिजांचे बनलेले असावे या मताला दुजोरा मिळतो.
शिलावरण : भूपृष्ठालगतच्या खडकांच्या थराला शिलावरण म्हणतात. काहींच्या मते शिलावरण म्हणजे भूकवच होय; काहींच्या मते भूकवच व प्रावरणाचा वरचा काही भाग शिलावरणात येतो. शिलावरणाची सरासरी जाडी ३५ किमी. आहे आणि पर्वत, महासागरांच्या द्रोणी, दऱ्या, खळगे, उंचवटे वगैरेंमुळे शिलावरणाचे पृष्ठ खडबडीत झालेले आहे. शिलावरणाचे खंडीय व अधःखंडीय असे थर मानले जातात. खंडीय थरातील खडक मुख्यत्त्वे ग्रॅनाइटसारख्या संघटनाचे असून त्यांचे सरासरी वि. गु. २.७५ आहे. या खंडीय थरावरच मानवाची वस्ती आहे. अधःखंडीय थरातील खडक प्रामुख्याने बेसाल्टाच्या संघटनांचे असून त्यांचे सरासरी विशिष्ट गुरुत्व ३.३ आहे. अधःखंडीय थर खंडीय थराखाली म्हणजे खंडांखाली तसेच महासागरांच्या तळाशी आहे. [⟶ शिलावरण].
 
=== बाह्यरचना ===
जलावरण : भूपृष्ठावरील पाण्याच्या भागाला जलावरण म्हणतात.त्यामध्ये महासागर,समुद्र, नद्या, सरोवर, हिम-बर्फ,⇨भूमिजल, तसेच सजीवांतील आणि खनिजांतील पाण्याचाही समावेश होतो. महासागर व समुद्र यांनी भूपृष्ठाचा सु. ७०.८% भाग व्यापला असून त्यांचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ०.०३% (१.४१×१०२४ ग्रॅ.) आहे. व त्यांची सरासरी खोली ३,८०० मी. आहे. जलावरण जवळजवळ सलग असले, तरी त्याची वाटणी विषम झालेली आहे. द. गोलार्धाचा बहुतेक भाग पाण्याने व्यापलेला आहे, तर जमिनीचा बहुतेक सर्व भाग उ. गोलार्धात येतो. पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी व आर्क्टिक हे प्रमुख महासागर असून त्यांपैकी पॅसिफिक सर्वांत मोठा (सु. अर्ध्या भूपृष्ठावर पसरलेला) व खोल आहे. भूमध्य, कॅरिबियन , बाल्टिक इ. विविध समुद्र हे महासागरांच्या शाखा आहेत. खंडाच्या भोवती खंड-फळी व तदनंतर खंडान्त उतार असून त्यापुढे महासागरांचे ओबडधोबड तळ असतात.
 
महासागर व समुद्र यांतील पाणी खारट असून त्यांतील लवणांचे सरासरी प्रमाण (वजनाने) ३.५% आहे. सोडियम क्लोराइड अथवा मीठ (एकूण लवणांच्या ७७.७६%) व मॅग्नेशियम क्लोराइड ही यांपैकी महत्त्वाची लवणे आहेत. त्यांशिवाय मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट, पोटॅशियम सल्फेट, कॅल्शियम कार्बोनेट व मॅग्नेशियम ब्रोमाइड ही लवणे थोड्या प्रमाणात व इतर अनेक मूलद्रव्यांची लवणे लेशमात्र असतात. पिण्यासाठी, पिकांसाठी, लवणे मिळविण्यासाठी, वाहतुकीसाठी व ऊर्जानिर्मितीसाठी पाण्याचा वापर होतो. [⟶ महासागर व महासागरविज्ञान; जलविज्ञान].
 
वातावरण : पृथ्वीभोवती हवेचे थर असून त्यांना वातावरण म्हणतात. तापमानीय संरचनेनुसार वातावरणाचे थर पाडण्यात येतात. सर्वांत खालच्या (भूपृष्ठालगतच्या) थराला क्षोभावरण म्हणतात. हा थर विषुववृत्ताजवळ फुगीर असून त्याची जाडी १० ते १६ किमी. आहे. त्यामध्ये एकूण वातावरणातील सु. ६०% वस्तुमान एकवटलेले आहे. या थरात जसजशी उंची वाढते तसतसे तापमान घटत जाते. याच थरात ढग, वर्षण, हिम, वादळे, वारे इ. वातावरणीय आविष्कार घडत असतात व यामध्ये जीवांची धारणा होऊ शकते. क्षोभावरणाच्या वर सु.५५ किमी. उंचीपर्यंत स्तरावरण असून ते अतिशीत आहे व त्यात उंचीनुसार तापमान वाढत जाते. स्तरावरणात बहुतकरून ढग वगैरे नसतात. स्तरावरणाच्या वर सु. ८० किमी. उंचीपर्यंत ऊष्मावरण व त्याच्या पलीकडे सु. ८०० किमी. उंचीपर्यंत बाह्यावरण असे वातावरणाचे थर आहेत.
 
वातावरणात मुख्यत्वे नायट्रोजन (सु. ७८%) व ऑक्सिजन (सु. २१%) हे असून त्यांशिवाय आरगॉन, कार्बन डाय-ऑक्साइड, हायड्रोजन, निऑन, ओझोन, हीलियम, क्रिप्टॉन, झेनॉन, पाण्याची वाफ इ. वायूही अल्प प्रमाणात असतात. वातावरणाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ०.०००१% (५.१×१०२१ ग्रॅ.) आहे व त्यामुळे वातावरणाचा भूपृष्ठावर सरासरी १०१३ मिलिबार (सु.१ किग्रॅ./ चौ. सेंमी.) इतका दाब पडतो समुद्रसपाटीवर व ०० से. तापमानाला वातावरणाची घनता दर घ.मी.ला १.२ किग्रॅ. आहे. उंचीनुसार वातावरणातील आयनीभवनाचे (विद्युत्‌ भारित अणू, रेणू वा अणुगट म्हणजे आयनरूपात सुटे होण्याच्या क्रियेचे) प्रमाण वाढत गेलेले आढळते. वातावरणाच्या बाहेर इलक्ट्रॉन तसेच विद्युत्‌ भारित अणू व रेणू यांनी बनलेले⇨आयनांवर असून ते चांगले विद्युत्‌ संवाहक आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या दृष्टीने वातावरण अतिशय महत्त्वाचे आहे. कारण जीवांना आवश्यक असलेला ऑक्सिजन तर त्यातून मिळतोच, शिवाय बाहेरून येणाऱ्या अपायकारक प्रारणापासून (तरंगरूपी ऊर्जेपासून) वातावरणामुळे जीवांचे रक्षणही होते. [⟶ वातावरण].
 
==कक्षा आणि परिभ्रमण==
कक्षीय गती : आपल्याला सूर्य क्रांतिवृत्तावरून (त्याच्या भासमान मार्गावरून) फिरत असल्यासारखे वाटत असले, तरी प्रत्यक्षात पृथ्वी सूर्याभोवती विवृत्ताकार (लंबगोलाकार) कक्षेत फिरत असते. या विवृत्ताची विकेंद्रता [⟶ शंकुच्छेद] ०.०१६७४ व सरासरी त्रिज्या १.४९५ × १०८ किमी. असून पृथ्वीचा भ्रमणाक्ष व कक्षेचे प्रतल यांच्यात २३° २६'५९" इतका कोन आहे. सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास पृथ्वीला जो कालावधी लागतो, त्याला वर्ष म्हणतात. ताऱ्यांचे वार्षिक पराशय (सूर्याऐवजी पृथ्वीवरून तारे पाहिल्याने त्यांच्या स्थानांत होणारा भासमान बदल) हा पृथ्वीच्या कक्षीय गतीचा पुरावा आहे. पृथ्वीची कक्षेमधील गती सेकंदाला २९.७६ किमी. असून पृथ्वी सूर्याजवळ आली असताना ही गती वाढते.२ जानेवारीच्या सुमारास पृथ्वी सूर्यापासून सर्वात जवळ (सुमारे १४.६ कोटी किमी. अंतरावर) म्हणजे उपसूर्य बिंदूवर आणि २ जुलैच्या सुमारास सर्वात दूर (सु. १५.१ कोटी किमी. अंतरावर) म्हणजे अपसूर्य बिंदूवर असते. इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या कक्षेत दीर्घकालीन विक्षुब्धता येते व परिणामी कक्षेची विकेंद्रता बदलते (सध्या ती कमी होत आहे) यामुळे वर्षाचा कालावधी बदलतो.
 
सौरकुल गती : सूर्यकुलाबरोबर पृथ्वीही शौरी या तारकासमूहाकडे जात आहे. यामुळे पृथ्वीला जी गती मिळते तिला सौरकुल गती म्हणतात व ती सेकंदाला सु. १९.२ किमी. एवढी आहे.
गांगेय गती : सूर्यकुलासह पृथ्वी आकाशगंगेच्या मध्याभोवती सेकंदाला सु. ३२० किमी. गतीने फिरत असते, पृथ्वीच्या या गतीला गांगेय गती म्हणतात.
 
दीर्घिकीय गती : आकाशगंगा दीर्घिकांच्या ज्या समूहाची घटक आहे, त्याला ‘स्थानिक समूह’ म्हणतात. [⟶ दीर्घिका]. या स्थानिक समूहाच्या मध्याभोवती आकाशगंगा सु. ८० किमी. इतक्या गतीने फिरत असते. यामुळे पृथ्वीला जी गती प्राप्त होते, तिला दीर्घिकीय गती म्हणतात.
 
==जीवसृष्टी==
Line १६३ ⟶ १५४:
नंतर हळूहळू वातावरणातील मुक्त ऑक्सिजनाचे प्रमाण वाढत गेले असावे. सूर्यापासून येणाऱ्या तीव्र जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) प्रारणामुळे ऑक्सिजनापासून भूपृष्ठालगत ओझोन वायू बनला असावा. ओझोन तीव्र ऑक्सिडीकारक असल्याने त्याद्वारे लोह, कॅल्शियम व इतर मूलद्रव्यांचे ऑक्सिडीभवन झाले असावे व कवचातील सिलिकेटी खनिजांचे विभाजनही त्याद्वारे झाले असावे. पहिला उथळ महासागर लवणी नव्हता, तर काहीसा अम्लधर्मी होता. त्यात अम्ल-सूक्ष्म-जंतू व शैवले यांची जोरदार वाढ होऊन अधिकाधिक ऑक्सिजन मुक्त होत गेला असावा. कार्बन डाय-ऑक्साइड, पाण्याची वाफ व ऑक्सिजन यांचे वातावरणातील प्रमाण वाढत गेल्याने ज्या थरात ओझोनाची निर्मिती होते तो थर अधिकअधिक वरच्या पातळीत गेला. वातावरणाच्या या दाट पडद्यामुळे तीव्र अतिनील प्रारणापासून जीवांचे रक्षण होऊ लागले. त्यामुळे ऑक्सिजनावर जगणाऱ्या पहिल्या जीवाच्या म्हणजे प्रोटोझोआच्या क्रमविकासाचा मार्ग खुला झाला.
 
सुमारे २.५ अब्ज वर्षांपूर्वीच्या काळातील या समुद्रात आदिम सागरी जीवांच्या क्रमविकासाला सुरुवात झाली. हे जीव वनस्पतीवर जगत असत. त्या काळातील कृमी व जेलीफिश यांचे लेशरूप जीवाश्म आढळलेले आहेत; मात्र त्यांना कवचे वा आधुनिक सागरी प्राण्यांसारखा सांगाडा नव्हता. तेव्हाच्या पाण्यात विपुल कॅल्शियम होते; परंतु बहुधा पाणी अम्लीय गुणधर्माचे असल्याने जीवांची कवचे विकसित होऊ शकली नसावीत. झिजेद्वारे जमिनीवरून येऊन पडणाऱ्या द्रव्यामुळे पाण्याची लवणता वाढत गेली. यामुळे कँब्रियन काळात जीव प्रथमच कॅल्शियम कार्बोनेटाची कवचे व सांगाडे तयार करू लागले. परिणामी त्यांचे रक्षण होऊ लागले व त्यांना निश्चित आकार येणे शक्य झाले. उच्च जीवांच्या क्रमविकासाच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा ठरला. नंतर जीवांचा क्रमविकास चालू राहून आजची जीवसृष्टी निर्माण झाली [⟶ क्रमविकास]. भविष्यकाळात क्रमविकास असाच चालू राहील असे मत असून पृथ्वीच्या भवितव्याच्या दृष्टीने सूर्याचा प्रभाव महत्त्वाचा ठरणार आहे. काही कोटी वर्षानंतर सूर्य तांबडा महातारा [⟶ तारा] या अवस्थेत जाईल तेव्हा भूपृष्ठावरील तापमान इतके जास्त होईल की, त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होईल, असा अंदाज आहे.
==चंद्र==
पृथ्वीचा उपग्रह साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी तिच्या प्रदक्षिणा घालू लागला. त्यालाच आपण चंद्र म्हणतो.
Line १६९ ⟶ १५९:
प्राचीन काळातील आणि निरनिराळ्या लोकांच्या पृथ्वीसंबंधीच्या काही कल्पना पुढीलप्रमाणे होत्या. आदिमानव पृथ्वी सपाट असल्याचे मानत असावा. पृथ्वी म्हणजे आधारावर असलेली सपाट तबकडी असून या आधारांमुळे सूर्य, चंद्र, तारे इ. तिच्या खाली जाऊन पुनःश्च वर येऊ शकतात, असे काहींना वाटत असे, तर इतर काहींच्या मते पृथ्वी हा विश्वाच्या मध्याशी असलेला सपाट व दृढ असा फलाट असून त्याच्याभोवती सूर्य, चंद्र, तारे वगैरे फिरत असतात. विश्वाच्या पृष्ठभागी पसरलेल्या पाण्यातून वर आलेले बेट म्हणजे पृथ्वी होय; असे बॅबिलोनियन, प्राचीन ग्रीक व हिब्रू लोक मानीत असत. बॅबिलोनियन पृथ्वी सपाट तर ग्रीक ती बशीसारखी असल्याचे मानीत. पृथ्वी ही बहिर्गोल आकाराची तबकडी असून तिच्याभोवती सर्व सरोवरे व नद्या यांचा उगम मानला गेलेला‘ओशेनस’ हा जलप्रवाह आहे, असे होमर (इ.स. पू. ९००-८००) यांनी वर्णन केले आहे. त्या काळातील इतर लोकांच्या मते पृथ्वी ही एक तबकडी असून ती एका प्रचंड सागरी कासवाच्या पाठीवर उभ्या असलेल्या चार हत्तींनी तोलून धरलेली आहे. ईजिप्शियनांची पृथ्वीसंबंधीची कल्पना अशीच होती. काहींच्या मते गीझा येथील पिरॅमिड (इ.स.पू. २५५०) बांधणाऱ्यांनी ते बांधताना पृथ्वीचा गोलाकार लक्षात घेतला असावा. मात्र असे असले, तरी पृथ्वी गोल असल्याचे प्रथम पायथॅगोरस (इ.स.पू. सहावे शतक) यांनी सांगितले, असे मानतात. ज्याअर्थी सूर्य व चंद्र गोल आहेत, त्याअर्थी पृथ्वीही गोल असली पाहिजे, असा युक्तिवाद पायथॅगोरस व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता. ॲनॅक्सिमिनीझ (इ.स. पू सहावे शतक), ॲरिस्टॉटल (इ.स. पू चौथे शतक) व हिपार्कस (इ.स.पू. दुसरे शतक) यांचाही या मतास पाठिंबा होता. पुढे एफ्. मॅगेलन (१४८०-१५२१) यांनी पृथ्वीप्रक्षिणा केल्यावर पृथ्वीचा गोलाकार सिद्ध झाला. ॲरिस्टॉटल यांनी पृथ्वीचा परिघ ४ लाख स्टेडिया (१ स्टेडियम=१८५.२ मी., स्टेडिया अनेकवचन) इतका काढला होता, तो प्रत्यक्ष परिघाच्या दुप्पट येत असला, तरी पृथ्वीचे आकारमान काढण्याचा हा पहिलाच शास्त्रीय प्रयत्न होता. पृथ्वीचे आकारमान काढण्याच्या शास्त्रीय मापन पद्धतीचे वर्णन व वापर प्रथम एराटॉस्थीनीझ यांनी केला. त्यामुळे ते भूगणित या शास्त्राचे एक संस्थापक मानले जातात. त्यांनी पृथ्वीचा परिघ २.५ लाख स्टेडिया (४.६३ कोटी मी.) इतका काढला होता व हे मूल्य परिघाच्या प्रत्यक्ष मूल्यापेक्षा १५ टक्क्यांनी जास्त आहे; परंतु त्यांनी वापरलेली पद्धती पाहता हे मूल्य पुष्कळच अचूक म्हणता येईल. त्यांनी पृथ्वीसंबंधीची इतराही अनेक मापने बऱ्याच अचूकपणे केली होती (उदा., सूर्यापासून पृथ्वीचे अंतर). इ.स. पू. तिसऱ्या शतकात ॲरिस्टार्कस यांनी पृथ्वी हा सूर्यभोवती फिरणारा एक घटक पिंड आहे, असे सूचित केले होते; मात्र ही कल्पना सतराव्या शतकापर्यत मान्य झाली नव्हती. पोसिडोनिअस (इ.स. पू. पहिले शतक) यांनी पृथ्वीचे आकारमान काढले होते व ते प्रत्यक्ष आकारमानापेक्षा ११ टक्क्यांनी जास्त आहे. शिवाय त्यांनी पृथ्वीचा परिघ २.४ लाख स्टेडिया इतका काढला होता. टॉलेमी यांनीही पृथ्वीचा परिघ (३ लाख स्टेडिया) काढला होता. पृथ्वी ही गोल, स्थिर व विश्वाच्या मध्याशी असून इतर खस्थ पदार्थ तिच्याभोवती वर्तुळाकार कक्षांत फिरत असतात, असे टॉलेमी यांचे मत होते. ही भूकेंद्रीय कल्पना कोपर्निकस (१४७३-१५४३) यांचा सूर्यकेंद्रीय सिद्धांत पुढे येईपर्यत मान्य पावली होती. सूर्य हा सूर्यकुलाच्या मध्याशी असून त्याच्याभोवती इतर खस्थ पदार्थ विवृत्ताकर कक्षांमध्ये फिरत असतात, असे मत कोपर्निकस यांनी मांडले होते आणि त्यांच्या या सूर्यकेंद्रीय कल्पनेची खातरजमा गॅलिलीओ (१५६४-१६४२) यांनी वेध घेऊन केली होती. झां फर्नेल (फर्नीलिअस) (१४९७-१५५८) यांनीही पृथ्वीचा परिघ काढला होता. व्हिलेब्रॉर्ट स्नेल (१५९१-१६२६) यांनी त्रिकोणीकरणाद्वारे पृथ्वीचे आकारमान काढले होते व ते प्रत्यक्ष आकारमानापेक्षा ३.४ टक्क्यांनी कमी आले. झां पीकार (१६२०-८२) यांनी अक्षांश निश्चित करण्यासाठी प्रथमच दूरदर्शकाचा वापर केला होता व त्यावरून पृथ्वीचा परिघ काढण्याचाही प्रयत्न केला होता (१६६९). झां रीशे यांनी पृथ्वी मध्यभागी फुगीर असल्याचे प्रथम निदर्शनास आणले होते (१६६९). पृथ्वीला अक्षीय व कक्षीय गती असल्याचे १७२५ साली सिद्ध झाले होते. पृथ्वीचे वस्तुमान काढण्याची पद्धत आयझॅक न्यूटन यांनी प्रथम सुचविली होती. प्येअर बूगेअर (१६९८-१७५८) यांनी पृथ्वीचे वस्तुमान लंबकाच्या प्रयोगाद्वारे १७३८ साली काढले; तर नेव्हिल मॅस्केलिन (१७३२-१८११) यांनी १७७४ साली ते काढले आणि गुरुत्वीय विश्वस्थिरांकाच्या आधारे हेन्री कॅव्हेंडिश (१७३१-१८१०) यांनी अधिक अचूकपणे पृथ्वीचे वस्तुमान काढले होते (१७९७). पृथ्वीचा चुंबकीय उत्तर ध्रुव जे. सी. रॉस (१८००-६२) यांनी १८३१ साली, तर चुंबकीय दक्षिण ध्रुव ई. एच्. शॅकल्टन (१८७४-१९२२) यांनी १९०९ साली शोधून काढला.
 
<nowiki> </nowiki>एराटॉस्थीनीझ यांच्यापासून ते झां पीकार यांच्यापर्यंतच्या काळात पृथ्वी गोलाकार असल्याचे प्रतिपादणारे सिद्धांत मांडले गेले. त्यामुळे या काळाला भूगणितातील ‘गोलाकार युग’ म्हणतात. नंतर न्यूटन व क्रिस्तीआन हायगेन्झ (१६२९-९५) यांनी सुचविलेल्या पृथ्वीच्या दीर्घवृत्ताभ आकाराचा काळ येतो आणि तद्नंतर भूरूप (भूभ्याकृती) सिद्धांताचे युग चालू झाले आहे. समवर्चसी पृष्ठाने येणारा अथवा महासागरांची सरासरी पातळी ही खंडांखालीही सलग आहे असे गृहीत धरून जो पृथ्वीचा आकार येतो, त्याला भूरूप म्हणतात. [⟶ भूगणित].
 
भारतीय : भारतीय परंपरेनुसार पृथ्वी पंचमहाभूतांपैकी एक असून प्रथ् (विस्तार पावणे) या धातूवरून पृथ्वी (विस्तार पावणारी) हा शब्द आला आहे. मनू यांच्या मते हिरण्यरूप अंडाची दोन शकले होऊन पृथ्वी व द्यो (आकाश किंवा स्वर्ग) ही तयार झाली; प्रथम पृथ्वीचा जन्म झाला व तदनंतर द्योची अंगे (सूर्य, ग्रह इ.) निर्माण झाली. प्रजापतीने उच्चारलेल्या भूः या शब्दातून पृथ्वी उत्पन्न झाली, अशी कथा तैत्तिरीय ब्राह्मणात आहे. पौरणिक कल्पनेनुसार पृथ्वी शेष नावाच्या नागाने आपल्या मस्तकावर तोलून धरली आहे, काही पुराणकथांमध्ये पृथ्वी आठ दिशांना आठ दिग्गजांनी तोलून धरली आहे, असा उल्लेख आढळतो.
 
ऋग्वेदामध्ये रुंद पसरलेली भूमी असा पृथ्वीचा उल्लेख आढळतो. ऐतरेय ब्राह्मणात पृथ्वीच्या भोवताली समुद्ररूपी कंबरपट्टा असल्याचा उल्लेख आहे. तसेच पृथ्वी गोलाकार, आकाशापासून वेगळी व आकाशात निराधार राहिलेली आहे, अशा अर्थाचे वाक्यही या ब्राह्मणात आहे. शतपथ ब्राह्मणात पृथ्वीला सृष्टी व अग्निगर्भ असे म्हटले असून ती वाटोळी, स्वतःभोवती फिरणारी व वातावरण असलेली अशी असल्याचा उल्लेख आहे. अशाच अर्थाची वाक्ये अथर्ववेदाच्या गोपथ ब्राह्मणातही आलेली आहेत. पृथ्वी गोल व निराधार असल्याचे ऋग्वेदसंहितेच्या काळात माहीत होते. जर पृथ्वी सपाट असती, तर सूर्य उगवताच सर्व पृथ्वीवर निदान तिच्या अर्ध्या भागावर तरी एकदम सूर्यकिरण पडले असते. मात्र प्रत्यक्षात असे न घडता सूर्यकिरण एकापाठोपाठ एक असे पडत जातात, अशा अर्थाचे निर्देश बऱ्याच ठिकाणी आलेले आढळतात. यावरून पृथ्वी गोलाकार असल्याचे तेव्हा माहीत असले पाहिजे. जीवनोपयोगी वस्तू पृथ्वीपासूनच मिळत असल्याचे माहीत असल्यामुळे कृतज्ञतेपोटी प्राचीन काळापासून पृथ्वीची प्रार्थना केली जात आहे. शांखायन आरण्यकात बहुधा यामुळेच पृथ्वीला 'वसुमति' म्हणजे संपत्तीने परिपूर्ण असे म्हटले आहे. ग्रहांसह तारामंडळ सु. एका दिवसात पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करते, ही वास्तवगती नसून पृथ्वीच्या प्रत्यही आपल्याभोवती फिरण्यामुळे होणाऱ्या दैनंदिन गतीमुळे असे भासते, असे असे पहिल्या आर्यभटांचे (इ.स. सहावे शतक) मत होते. या त्यांच्या मताबद्दल ब्रह्मगुप्तांसारख्या (सातवे शतक) इतर पौरुष सिद्धांतकारांनी त्यांना दोष दिला होता. तथापि पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे या आर्यभटांचे मत नव्हते. त्यांनी पृथ्वीची त्रिज्या १,०५० योजने (१ योजन =सु. १३ किमी.) इतकी काढली होती. पृथ्वीच्या अंगी आकर्षणशक्ती (गुरुत्वाकर्षण) असल्याचे भास्कराचार्य (बारावे शतक) मानीत असत. त्यांच्या मते अवकाशातील एखादा जड पदार्थ पृथ्वी स्वशक्तीने आपल्याकडे आकर्षिते व तो तिच्यावर पडतो, असे आपल्याला भासते.
 
भारतीय ज्योतिषशास्त्रातील विविध सिद्धांतांमध्ये पृथ्वीबद्दलची पुढील प्रकारची भौगोलिक व इतर माहितीही आलेली आहे. पृथ्वीवरील निरनिराळ्या स्थलांवरून होणारी आकाशस्थ गोलाची दर्शने उदा., विषुववृत्तावर ध्रुवतारा क्षितिजापाशी दिसतो; क्षितिजावर ग्रह वगैरे लंबरूपाने उगवतात व मावळतात; जसजसे उत्तरेस जावे तसतशी ध्रुवताऱ्याची उंची वाढत जाते; ग्रहादिकांच्या दैनंदिन गतीसंबंधीचा गमनमार्ग क्षितिजावर तिरपा दिसतो; ध्रुवांवर सूर्यादि आकाशस्थ पदार्थ क्षितिजसमांतर फिरताना दिसतात वगैरे. शिवाय उ. गोलार्धात कोणत्या अक्षांशावर राशिचक्राचा काहीच भाग दिसत नाही; कोणत्या अक्षांशावर कोणत्या राशी दिसत नाहीत, कोणत्या अक्षांशावर सूर्य ६० घटिका ( १ घटिका=सु. २४ मिनिटे) अथवा त्यापेक्षा जास्त काळ दिसतो आणि किती दिवसांपर्यंत तो तसा दिसतो इ. प्रकारची माहिती या बहुतेक सिद्धांतांमध्ये आलेली आढळते.
 
महाभारतातील पृथ्वीचे वर्णन:-
"https://mr.wikipedia.org/wiki/पृथ्वी" पासून हुडकले