"पृथ्वी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
मोठा प्रताधिकारीत मजकुर वगळण्याचे काम चालू, दाब विभागा पर्यंतचा प्रताधिकारीत मजकुर वगळला,
Mahitgar (चर्चा | योगदान)
→‎अतिरिक्त माहिती: प्रताधिकारीत मजकुर वगळला
ओळ १९३:
==अतिरिक्त माहिती==
<blockquote>'''ही माहिती मराठी विश्वकोशातून जशी च्या तशी उचलण्यात आलेली आहे. या माहितीचे नीट वर्गीकरण करण्याची गरज आहे.''' </blockquote>पृथ्वीच्या उत्पत्ती नंतर भौगोलिक आणि जैविक प्रक्रियांनी तिच्यात खूप परिवर्तन झाले आहे.
पृथ्वी आपल्या अक्षाभोवती [[पश्चिम]]ेकडून [[पूर्व]]ेकडे फिरते.
 
 
अक्षांश व रेखांश : पृथ्वीवरील एखादे स्थान दर्शविण्यासाठी अक्षांश व रेखांश हे सहनिर्देशक वापरतात. एखाद्या ठिकाणाचे अक्षांश म्हणजे त्या स्थानापासून पृथ्वीच्या मध्यापर्यंतची रेषा व विषुववृत्ताचे प्रतल (पातळी) यांच्यातील कोन होय. ध्रवताऱ्याची कोनीय उंची १ अंशाने वाढण्यासाठी उत्तरेकडे जेवढे अंतर जावे लागते, ते (कोनीय) अंतर म्हणजेही १ अक्षांश होय. नकाशावर अक्षांश विषुववृत्ताला समांतर अशा पूर्व-पश्चिम वक्र रेषांनी (अक्षवृत्तांनी) दाखवितात आणि ते विषुववृत्तापासून उत्तरेस व दक्षिणेस ०० ते ९०० असे मोजतात. २३० २७' उत्तर अक्षवृत्ताला कर्कवृत्त, तर २३० २७' दक्षिण अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणतात; तसेच ६६० ३०' उत्तर अक्षवृत्ताला उत्तर ध्रुववृत्त तर ६६० ३०' दक्षिण अक्षवृत्ताला दक्षिण ध्रुववृत्त म्हणतात. विषुववृत्तापासून मकर व कर्क वृत्तांपर्यंतच्या प्रदेशाला उष्ण कटिबंध, त्यांच्या पुढील ध्रुववृत्तापर्यंतच्या भागांना समतीशोष्ण कटिबंध व तेथून पुढच्या ध्रुवापर्यंतच्या भागांना शीत कटिबंध म्हणतात.
 
एखाद्या स्थानाचे रेखांश म्हणजे त्या स्थानाचे मध्यान्हवृत्त व मध्यमंडल (मूळ रेखावृत्त) यांच्यातील क्षैतिज कोन होय; नकाशावर रेखांश दक्षिणोत्तर वक्र रेषांनी (रेखावृत्तांनी) दर्शवितात आणि ग्रिनिचचे रेखावृत्त (मूळ रेखावृत्त) शून्य मानून त्याच्या पूर्वेस व पश्चिमेस ०० पासून १८०० पर्यंत रेखावृत्ते मोजतात. कृत्रिम उपग्रहांचे युग सुरू झाल्यावर पूर्वीप्रमाणे मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेस व पश्चिमेस १८०० पर्यंत रेखावृत्ते देण्याऐवजी ती मूळ रेखावृत्तापासून एकाच दिशेत म्हणजे पूर्वेकडे ३६०० पर्यंत दिली, तर सोयीचे होईल असे आढळून आले आहे आणि रेखावृत्तांची ही नवी पद्धती आता वापरात येऊ लागली आहे. [⟶ अक्षांश व रेशांश].
 
भरती-ओहोटी : मुख्यतः चंद्राच्या व अल्प प्रमाणात सूर्याच्या पृथ्वीवरील गुरुत्वीय आकर्षणामुळे महासागरांना भरती-ओहोटी येत असते. भरती-ओहोटीमुळे महासागरांमध्ये काही मीटर उंचीच्या तर किनाऱ्याजवळ सु. १८ मी. पर्यंत उंचीच्या लाटा निर्माण होतात. [⟶ भरती-ओहोटी].
 
महासागरांप्रमाणे जमिनीतही भरती-ओहोटीसारख्या विकृती निर्माण होत असतात, त्यांना ‘भूवेला’ म्हणतात.‘भूवेला’ ओळखणे अवघड असून तिच्यामुळे निर्माण होणाऱ्या लाटांची उंची ०.३३ मी. पेक्षा जास्त नसते. भरती-ओहोटीच्या मानाने भूवेलेची गती अतिशय मंद असते. कारण पाण्याच्या मानाने भूपृष्ठ व पृथ्वीचे अंतरंग अधिक दृढ आहेत; मात्र त्यांच्या स्थितीस्थापक (ताण नाहीसा झाल्यावर मूळ आकार धारण करण्याच्या) गुणधर्मामुळे भूवेलीय विकृती निर्माण होऊ शकतात. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपासून भूवेला मोजण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
 
भूकंप व ज्वालामुखी : पॅसिफिक महासागराच्या सभोवती हिमालय-आल्प्स पर्वतश्रेणीला अनुसरून असलेल्या भागात भूकंपाचे पट्टे आहेत व या दोन पट्ट्यांत जगातील ८०% भूकंप होत असतात. यांशिवाय ब्रम्हदेश, ईस्ट इंडिज ते जपान हा प्रदेश आणि महासागरांमधील पर्वतरांगा (उदा., मध्य अटलांटिकमधील पर्वतरांग) या भागांतही वारंवार भूकंप होत असतात. भूकवचातील विभंगांना (तड्यांना) अनुसरून होणाऱ्या हालचालीमुळे भूकंप होतात. बहुतेक भूकंपाची केंद्रे भूकवचात सु.३० किमी. खोलीवर आढळतात, तथापि पॅसिफिकभोवतीच्या व ईस्ट इंडीजमधील काही भूकंपांची केंद्रे ७०० किमी. पर्यंत खोल असलेली आढळली आहेत. असे खोल केंद्र असलेले भूंकप खंडांच्या लगत असलेल्या भागात अधिक प्रमाणात झालेले आढळतात. [⟶ भूकंप].
 
कधीकधी उष्णता जास्त झाल्याने भूकवचातील भेगांतून शिलारस बाहेर टाकला जातो व ज्वालामुखी क्रिया घडून येते. मुख्यत्त्वे वरील दोन पट्ट्यांतच ज्वालामुखी क्रिया आढळते व जगातील ज्ञात ज्वालामुखींपैकी ६५% ज्वलामुखी या भागात आहेत. [⟶ ज्वालामुखी - २].
 
दीर्घकालीन बदल : पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती हळूहळू कमी होत आहे, हे प्राचीन ग्रहणांच्या नोंदींवरून व १६०० सालापासून मिळालेल्या माहितीवरून दिसून आले आहे. याचा अर्थ पूर्वी दिवस लहान होता. या बदलांमुळे एका शतकामध्ये दिवसाचा कालावधी ०.००१५ सेकंदाने वाढतो. हे बदल मुख्यतः वेला-घर्षणामुळे (महासागरांच्या तळावर पाण्याचे घर्षण होऊन झालेल्या विरोधामुळे) ऊर्जा ऱ्हास झाल्याने होतात. थोडक्यात चंद्राचे पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण हे गतिरोधकाप्रमाणे (ब्रेकप्रमाणे) कार्य करते आणि परिणामी पृथ्वीची अक्षीय गती कमी होत असते.
 
अनियमित बदल : हे बदल यदृच्छपणे होतात व कधी कित्येक वर्षेही होत राहतात. या बदलांमुळे ५-१० वर्षे इतक्या थोडया कालावधीसाठी अक्षीय गती वाढते व नंतर घटत जाते. एका वर्षात हे बदल सहस्त्रांश सेकंदाइतके अल्प असतात व त्यांच्यामुळे एका शतकामध्ये दिवसाचा कालावधी ५ मिलिसेकंदांनी बदलू शकतो. पृथ्वीच्या द्रवरूप गाभ्यातील अभिसरणाची प्रणाली निराळी झाल्याने हे बदल घडून येत असावेत.
 
आवर्ती बदल : एक वर्ष, सहा महिने, २७.५५ दिवस व १३.६६ दिवस इतक्या कालावधीनंतर दिवसाच्या कालावधीत ०.०००५ सेकंदाने बदल होतो (उदा., दरवर्षी पृथ्वीची अक्षीय गती जूनच्या सुमारास अपेक्षेपेक्षा ३० मिलिसेकंद मागे, तर ऑक्टोबरच्या पुढे गेलेली असते). हिम व हिमनद्यांचा विस्तार तसेच पृथ्वीवरील हवा व पाणी यांचे अभिसरण यांच्यात होणाऱ्या बदलांमुळे असे आवर्ती बदल होतात, असे मानले जाते.
 
तापमान व उष्णतेचे संक्रमण : सूर्यापासून येणाऱ्या प्रारणामुळे भूपृष्ठ तापते. या प्रकारे पृथ्वीला सूर्यापासून दीर्घकाळापासून व पुष्कळच एकसारख्या प्रमाणात ऊर्जा मिळत आली आहे. पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर, पृथ्वीची अक्षीय गती व पृथ्वीभोवतालच्या वातावरणाचे स्वरूप यांच्या द्वारे भूपृष्ठाला मिळणाऱ्या उष्णतेचे नियंत्रण होत असते. त्यांच्यामुळे पृथ्वीवरील तापमान सजीवांच्या दृष्टीने सुसह्य असे राहू शकले आहे. भूपृष्ठावरील वार्षिक सरासरी तापमान सु. ३२° से. ते -३२° से. यांच्या दरम्यान बदलत असते. यापुढे पृथ्वीच्या अंतरंगातील तापमानाविषयी विवरण केले आहे.
 
पृथ्वीमध्ये पुढील प्रकारांनी उष्णता निर्माण होत असावी, असे मानतात: (१) मूलद्रव्यांमध्ये असलेल्या उष्णतेतून (अशी उष्णता धूळ व वायू यांचे संघटन म्हणजे घनीभवन होताना गतिज ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर होऊन निर्माण झाली असावी), (२) युरेनियम, थोरियम, पोटॅशियम इ. किरणोत्सर्गी मूलद्रव्यांच्या क्षयातून उत्पन्न होणारी उष्णता संवहनाने भूपृष्ठाशी येते, (३) पृथ्वीतील द्रव्याच्या संकोचनाने, (४) पृथ्वीच्या अंतरंगात होणाऱ्या वेलीय घर्षणाद्वारे, (५) पृथ्वीच्या अंतरंगातील रासायनिक विक्रियांद्वारे आणि (६) सौरवाताबरोबर (सूर्यापासून येणाऱ्या प्रोटॉनांच्या झोताबरोबर) होणाऱ्या विद्युत्‌ चुंबकीय आंतरक्रियांद्वारे. यांपैकी पहिल्या दोन कारणांनी उत्पन्न होणारी उष्णता महत्त्वाची आहे.
 
पृथ्वीतील तापमानाची वाटणी कशी आहे हे ठरविण्याची प्रत्यक्ष पद्धत उपलब्ध नसली, तरी तिच्यासंबंधी तर्क करता येतो. भूपृष्ठालगतच्या थरांतील तापमानासंबंधी खोल खाणी, विहिरी इत्यादींमधील तापमानावरून थोडाफार अंदाज करता येतो. खाणीमध्ये खोलीनुसार तापमान वाढत जाते, ही गोष्ट सर्वपरिचित आहे. भूपृष्ठाला कोणत्या त्वरेने (गतीने) खालून उष्णता पुरविली जाते. हे द्रव्याची उष्णता संवाहकता (द्रव्याची उष्णता वाहून नेण्याची क्षमता) आणि तापमान वाढण्याची त्वरा यांच्या गुणाकाराने काढता येते. अशा प्रकारे पृथ्वीतून बाहेर पडणारी उष्णता काढता येते. एकक वेळात व एकक क्षेत्रातून भूपृष्ठाशी होणाऱ्या उष्णता संवहनाच्या त्वरेला सामान्यतः उष्णता प्रवाह म्हणतात. या प्रवाहावर भूमिस्वरूपे व वाहते पाणी यांचा परिणाम होत असतो. सामान्यपणे भूपृष्ठानजीकचा उष्णता प्रवाह दर सेकंदाला १.५×१०-६ कॅलरी/चौ. सेंमी. असतो. महासागरांच्या तळावरील उष्णता प्रवाहाच्या मापनाद्वारे मिळालेल्या माहितीवरून अतिशय खोल सागरी तळांतून बाहेर पडणारी उष्णता ही जवळजवळ खंडांतून बाहेर पडणाऱ्या उष्णतेइतकी असते. सर्व पृथ्वीतून वर्षाला सु. २×१०२० कॅलरी उष्णता संवहनाने बाहेर पडते.
 
पृथ्वीच्या बाहेर स्तरांत सरासरीने दर किमी. खोलीमागे १५° ते २५° तापमान वाढते. दर किमी. ला १४° से. तापमान वाढते असे गृहीत धरल्यास, ३०० किमी. खोलीवर सु. ४,२००° से. तापमान असेल. इतक्या खोलीवर असलेला दाब लक्षात घेतला, तरी हे तापमान कोणत्याही सिलिकेटाच्या वितळबिंदूपेक्षा पुष्कळच जास्त आहे; परंतु प्रत्यक्षात या खोलीवर खडक वितळलेले नाहीत. यावरून भूपृष्ठाच्या खाली मध्यम खोलीवरच तापमान वाढत जाण्याचे प्रमाण घटत असले पाहिजे. पृथ्वीतून बाहेर पडणारी बहुतेक उष्णता किरणोत्सर्गाद्वारे उत्पन्न होते, असे मानल्यास किरणोत्सर्गी द्रव्ये भूपृष्ठालगतच मोठ्या प्रमाणातच एकत्रित झाली असावीत, असे म्हणता येते. जर ही द्रव्ये यापेक्षा अधिक खोलीवर विखुरली गेलेली असती, तर फार पूर्वीच पूर्ण पृथ्वी वितळून गेली असती. पृथ्वी उत्पन्न झाली तेव्हा थंड होती व किरणोत्सर्गी द्रव्ये सर्व पृथ्वीवर सारखी विखुरलेली होती असे गृहीत धरल्यास, तसेच खडकांची उष्णता संवाहकता अगदी कमी असल्याने आधीच्या काळात पृथ्वी किरणोत्सर्गी उष्णतेने सावकाश तापत गेली असेल, असे म्हणता येते. यानंतर लोह व तदनंतर सिलिकेटे वितळली असतील. सिलिकेटे न वितळता पुरेशी मऊ झाली, तर वेगवेगळी द्रव्ये थरांच्या रूपात वेगळी होऊ शकतात आणि किरणोत्सर्गी मूलद्रव्यांची संयुगे सापेक्षतः हलकी असल्याने तरंगून भूपृष्ठाकडे आली असावीत आणि भूपृष्ठालगत एकत्रित झाली असावीत, असे मानतात. तसेच भूकवच हे खंडांखाली एकत्रित झाली असावीत, असे मानतात. तसेच भूकवच हे खंडांखाली जाड असून महासागरांच्या तळांवर ते पातळ आहे. यावरून बहुतेक उष्णता प्रवाह खंडाच्या भागात उत्पन्न होत असावेत, असे अनुमान निघते; परंतु महासागरांच्या तळांवरील उष्णता प्रवाहांच्या मापनांवरून हे अनुमान चुकीचे ठरते. महासागरांच्या तळांजवळही किरणोत्सर्गी द्रव्ये आहेत; मात्र ती तेथे भूकवचाऐवजी प्रावरणात आहेत.
 
पृथ्वीच्या खोल भागातील तापमानाचा विचार केवळ तर्कानेच करता येतो. मात्र तापमानाची कोणतीही वाटणी गृहीत धरली, तर ठरावीक अटी पूर्ण व्हाव्या लागतात. सर्व प्रावरणामध्ये तापमान साध्या सिलिकेटांच्या वितळबिंदूखाली असले पाहिजे; बाह्य गाभ्यात ते लोहाच्या वितळबिंदूपेक्षा जास्त असले पाहिजे. आतील गाभा लोहाचाच असल्यास त्याच्या सीमेजवळील तापमान लोहाच्या वितळबिंदूइतके वाढेल व त्याच्या आत ते यापेक्षाही जास्त असले पाहिजे. यावरून पृथ्वीच्या अधिक खोल भागांचे तापमान काढण्याचा मार्ग म्हणजे वाढत्या दाबाबरोबर वितळबिंदूत होणारी वाढ काढणे, हा होय. अर्थात ही तापमानाची मूल्ये अंदाजेच येतील कारण त्या ठिकाणी प्रत्यक्ष असलेली परिस्थिती जशीच्या जशीच्या तशी कुठल्याही प्रयोगशाळेत निर्माण करता येणे शक्य नाही. उदा., पृथ्वीच्या गाभ्याच्या सीमेजवळील दाब हा प्रयोगशाळेत मिळविता येणाऱ्या जास्तीत जास्त दाबाच्या दहापट असेल.
 
पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान काढल्यास कदाचित पृथ्वीच्या गाभ्याच्या सीमेजवळ ते सु. ३,०००° से. तर मध्याशी सु. ४,०००° से. येते. अर्थात या आकड्यांत शेकडो अंशांची तफावत असण्याची शक्यता आहे.
 
सिलिकेट उष्णतेचा अतिमंदवाहक असल्याने प्रावरणाच्या खोल भागातील उष्णता पृथ्वीच्या निर्मितीपासून जणू काही तेथेच बद्ध होऊन राहिली आहे. मात्र १९५६ साली ई. क्लार्क व फ्रॅन्सिसे बर्च यांनी प्रावरणामध्ये प्रारणाद्वारे उष्णता संक्रमण होते, हे दाखवून दिले. तापमान पुरेसे वाढल्यास सर्व द्रव्यांतून प्रारण बाहेर पडते व वाढत्या तापमानानुसार अशा प्रारणाचे प्रमाणही वाढते. अशा प्रकारचे प्रारण पृथ्वीमध्ये निःसंशयपणे उत्सर्जित होते; परंतु त्याद्वारे पुरेशी उष्णता पुरेशा जलदपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते की नाही, हा मुख्य प्रश्न आहे. प्रारणाद्वारे होणाऱ्या उष्णता संक्रमणाची त्वरा संबंधित द्रव्याच्या पार्यतेवर अवलंबून असते. अधिक पार्य द्रव्यातून (उदा., ऑलिव्हीन हे खनिज) प्रारणाने होणारे संक्रमण अधिक जलदपणे होते. १,५००° से. पेक्षा जास्त तापमानाला साध्या संवहनाइतकेच उष्णता संक्रमण प्रारणानेही होते. यापेक्षा जास्त तापमानाला तर ते संवहनाच्या मानाने अधिक जलदपणे होते. या सर्वांचा परिणाम म्हणजे पृथ्वीच्या खोल भागातील तापमानात अपेक्षेपेक्षा पुष्कळच सहजपणे एकसारखेपणा येऊ शकत असावा. यावरून प्रावरणाच्या खालील भागातील तापमान वाढण्याची त्वरा मध्यम असली पाहिजे. पृथ्वीच्या गाभ्यातील द्रायूमध्ये सापेक्षतः जलदपणे हालचाल होत असावी व पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर या हालचालींचा प्रभाव पडत असल्याचे आढळते. या हालचालीचे पटणारे स्पष्टीकरण म्हणजे संनयन (अभिसरण) हे होय. भांड्यात पाणी तापविल्यास ज्याप्रमाणे खालील गरम पाणी वर येते व वरचे थंड पाणी खाली जाते त्याप्रमाणेच गाभ्यातील द्रायूत संनयन होत असावे, असे बहुतेकांचे मत आहे. मंदवाहक खडकांच्या प्रावरणाने वेढलेल्या व चांगल्या संवाहक धातुयुक्त (लोहाच्या) गाभ्यामध्ये संनयन कसे होऊ शकेल, हे समजणे दीर्घकाळपर्यंत अवघड होते; परंतु प्रारणाद्वारे होणारे उष्णता संक्रमण विचारात घेतल्यानंतर ते समजणे शक्य झाले. धातू अपार्य असल्याने प्रारणाद्वारे गाभ्यात होणारे उष्णता संक्रमण अल्प असले पाहिजे. उलट प्रावरणाच्या खालच्या भागात प्रारणाने होणारे संक्रमणापेक्षा जास्त परिणामकारक असले पाहिजे आणि दोन्हीमधील या फरकामुळे गाभ्यात संनयन चालू रहात असावे.
 
महासागरांतर्गत पर्वतरांगांच्या जवळच्या भागात नवा सागरतळ निर्माण होऊन नंतर पसरतो, अशी एक परिकल्पना आहे. तिच्यावरुनही पृथ्वीमध्ये संनयन प्रवाह असावेत, असा तर्क केला जातो. प्रावरणाती प्रचंड उष्णता तसेच प्रावरण व भूकवचाचा तळ यांच्या तापमानांतील फरक यांमुळे असे संनयन प्रवाह सुरू होत असावेत, असे काहींचे मते आहे. उष्णतेमुळे तापून हलके झालेले द्रव्य वर ढकलले जात असावे व त्यामुळे प्रावरणाच्या तळापासून संनयन प्रवाह सुरू होत असावेत. नंतर हे प्रवाह भूकवचाजवळ वळून खाली जात असावेत. [⟶ खंडविल्पव; भूपट्ट सांरचनिकी].
 
पृथ्वीतील उष्णतेचा व्यावहारिक वापर करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. गरम पाण्याचे झरे किंवा उन्हाळी व ज्वालामुखीशी निगडीत वाफ यांच्यापासून ऊर्जा मिळविता येऊ शकेल. भूपृष्ठात छिद्र पाडून त्यातून मिळणारी वाफ वा गरम पाणी टरबाइन चालविण्यासाठी वापरता येणे शक्य आहे. इटली, आइसलँड, जपान, रशिया आणि न्यूझीलंड येथे अशा तऱ्हेने ‘भू-औष्णिक’ (जिओथर्मल) ऊर्जा वापरली जात असून असे नवीन उद्गम शोधून काढण्याचे प्रयत्न जगभर चालू आहेत. [⟶ शक्ती उद्गम].
 
चुंबकत्व : भूचुंबकत्व : पृथ्वीमध्ये चुंबकीय गुणधर्म असल्याचे मध्ययुगाच्या अखेरीपासून माहीत आहे. कारण तेव्हा नौकानयनासाठी खलाशी साधे चुंबकीय होकायंत्र वापरीत असत, तसेच संपूर्ण पृथ्वी हा एक प्रचंड परंतु दुर्बल असा चुंबक असल्याचे विल्यम गिल्बर्ट यांनी १६०० साली प्रतिपादिले होते. पृथ्वीच्या चुंबकीय गुणधर्मामुळे तिला प्राप्त झालेले चुबंकीय क्षेत्र सु. ०.५० गौस असून त्याला भूचुंबकत्व म्हणतात. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र तिच्याभोवतीही पसरले असून अवकाशातील विद्युत्‌ भारित कणांच्या हलाचालींवर त्याचा जेथपर्यंत प्रभाव पडतो अशा भागाला ⇨ चुंबकांबर म्हणतात. सूर्याच्या बाजूला चुंबकांबर सु. ६४,००० किमी. पर्यंत पसरलेले असते.
 
पृथ्वीचे चुंबकीय ध्रुव व भौगोलिक ध्रुव एकाच ठिकाणी नसतात. त्यांच्यात सु. १,६०० किमी. अतंर असते. १९७५ साली पृथ्वीचा उत्तर चुबंकीय ध्रुव अंदाजे ७६.१° उत्तर, १००° पश्चिम येथे आणि दक्षिण चुंबकीय ध्रुव अंदाजे ६५.८° दक्षिण, १३९° पूर्व येथे होता. तसेच पृथ्वीचा चुंबकीय अक्ष आणि भ्रमणाक्ष यांच्यात १७° कोन असून चुंबकीय अक्ष भ्रमणाक्षाभोवती १,००० वर्षांत एक फेरी पूर्ण करतो.
 
पृथ्वीवरील सर्व बिंदूंचे-चुंबकीय क्षेत्र समजल्यास पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचे आत उद्गम क्षेत्राचे आत उद्गम असलेले व बाह्य उद्गम असलेले असे दोन भाग करता येतील, असे कार्ल एफ्. गौस (गाउस) यांनी १८८० च्या सुमारास दाखवून दिले. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा बहुतेक (म्हणजे ९/१०) भाग आतील उद्गम असलेला व थोडाच (१/१०) भाग बाह्य उद्गमाचा असल्याचे नंतर आढळून आले. पृथ्वीत जडविल्या गेलेल्या चुंबकीय द्रव्यामुळे पृथ्वीला चुंबकत्व आले आहे, असे पूर्वी मानीत असत. पृथ्वीचा गाभा व प्रावरण यांच्यातील विभेदी (वेगवेगळ्या, विसंगत) वलनामुळे (फिरण्याने) उद्भवणाऱ्या विद्युत्‌ चुंबकीय क्षेत्रांमुळे भूचुंबकत्वाचा आत उद्गम असलेला, तर आयनांबराच्या पट्ट्यातील विद्युत्‌ प्रवाहांमुळे बाह्य उद्गमाचा भाग निर्माण होतो, असे आता मानले जाते. चुंबकीय क्षेत्र हे पृथ्वीच्या द्रायुरुप व धातवीय गाभ्यातील विद्युत्‌ प्रवाहांनी निर्माण होते, असे डब्ल्यु. एलझॅझर यांनी १९४७ मध्ये दाखविले. ही प्रक्रिया व शक्तिकेंद्रातील विद्युत्‌ जनित्रामध्ये (डायनामो वा जनरेटरमध्ये) होणाऱ्या प्रक्रिया यांच्यात अतिशय साम्य असल्यामुळे या सिद्धांताला डायनामो (जनित्र) सिद्धांत म्हणतात व तो सामान्यपणे मान्यता पावला आहे. किरणोत्सर्गी उष्णतेने गाभ्यातील संनयन प्रवाह चालू राहत असावेत व त्यांद्वारे विद्युत्‌ प्रवाह चोहीकडे नेले जात असावेत, असेही एक मत आहे. [⟶ भूचुंबकत्व].
 
पृथ्वीवरील चुंबकीय विक्षोभ हे सूर्यापासून येणारे विद्युत्‌ भारित कण (सौरवात) व आयनांबर यांच्यातील आंतरक्रियांमुळे निर्माण होत असतात. पृथ्वीभोवतालचे ⇨प्रारण पट्ट हे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात विद्युत्‌ भारित कण पकडले जाऊन तयार झालेले आहेत.
 
पुराचुंबकत्व : विपुल प्रमाणात लोह असेलला लाव्हा चुंबकीय क्षेत्रात क्यूरी बिंदूखाली (ज्या तापमानाला लोहचुंबकीय द्रवातील कायमचे चुंबकत्व निघून जाते त्या तापमानाखाली) थंड होतो तेव्हा लोह ऑक्साइडाच्या कणांना या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेतील चुंबकत्व प्राप्त होते आणि नंतर मूळचे चुंबकीय क्षेत्र नष्ट झाले, तरी त्याच्या दिशेतील कणांचे हे चुंबकत्व थोड्या प्रमाणात टिकून रहाते. या अवशिष्ट चुंबकत्वावरून खडक जेव्हा तयार झाला तेव्हाची चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरविता येते. अशाच प्रकारे वालुकाश्मातही अवशिष्ट चुंबकत्व आढळते. अशा चुंबकत्वाला किंवा भूवैज्ञानिक काळातील भूचुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पुराचुंबकत्व म्हणतात आणि विशेषतः इतिहासपूर्व काळातील अशाच अभ्यासाला पुरातात्विक चुंबकत्व म्हणतात.
 
पुराचुंबकत्वावरून पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवांच्या जागांची अदलाबदल झालेली आढळते. ही अदलाबदल अनियमितपणे झालेली आढळते व ती का होते हे अजून समजलेले नाही. महासागरांच्या तळांवरील चुंबकीय क्षेत्राच्या दिशांची तऱ्हा महासागरांतर्गत पर्वतरांगाना समांतर व नियमित पट्ट्यांच्या रूपात तसेच पर्वतरांगेच्या दोन्ही बाजूंस सममित (एकसारखी) असल्याचे आढळले आहे. यावरून त्या ठिकाणी लाव्हा वर येऊन सागराचा नवीन तळ तयार होतो, असा निष्कर्ष निघतो आणि हा ⇨खंडविप्लवाचा एक पुरावा आहे. खंडीय ठोकळ्यांच्या अलीकडच्या काळातील भूसांरचनिक हालचाली समजण्याच्या दृष्टीनेही पुराचुंबकत्वाचा अभ्यास उपयुक्त ठरला आहे.
 
[⟶ पुराचुंबकत्व].
 
रेडिओ उद्गम : सूर्यकुलाबाहेरून तसेच सूर्यकुलातील सूर्य, गुरू इत्यादींपासून रेडिओ तरंगांचे उत्सर्जन होत असल्याचे वैज्ञानिकांना माहीत झाले होते; पंरतु पृथ्वीच्या चुंबकांबरातच तीव्र ‘रेडिओ गोंगाट’ होत असल्याचे कळून आले नव्हते, कारण चुंबकांबरात निर्माण होणारे हे रेडिओ तरंग भूपृष्ठाकडे येत असतानाच मधल्या आयनांबराने परावर्तित होऊन अवकाशात परत जातात व त्यामुळे ते पृथ्वीवरून ओळखू येत नाहीत. तथापि १९७० नंतर उपग्रहांच्या साहाय्याने केलेल्या रेडिओ तरंगांच्या व आयनद्रायू तरंगांच्या [⟶ आयनद्रायुभौतिकी] मापनांवरून सूर्य, गुरू व शनी यांच्याप्रमाणेच पृथ्वीही तीव्र रेडिओ उद्गम असल्याचे कळून आले आहे [⟶ रेडिओ ज्योतिषशास्त्र].
 
भूमिस्वरूपे व त्यांची उत्पत्ती : भूपृष्ठावर ठळकपणे दिसणारी ओबडधोबड अशी अनेक भूमिस्वरूपे आढळतात. खंड आणि महासागरांच्या द्रोणी ही प्रमुख भूमिस्वरूपे आहेत. पर्वत, दऱ्या, खचदऱ्या, समुद्र, उपसागर, आखात, भूशिरे, ज्वालामुखी बेटे, किनारे, सरोवरे, नद्या, हिमनद्या, त्रिभुज प्रदेश, वाळवंटे इ. कित्येक इतर भूमिस्वरूपे आहेत. भरती-ओहोटी, लाटा, पाऊस, प्रवाह, विभंगक्रिया (भेगा वा तडे पडणे), जमीन वर उचलली जाणे वा खचणे, हवामानातील बदल, ज्वालामुखी, भूकंप इ. क्रियांचा महासागर व जमीन यांवर परिणाम होतो व त्यामुळे नवी भूमिस्वरूपे तयार होतात आणि आधीच्या भूमिस्वरूपांत बदल घडून येतात. भूकंप व ज्वालामुखी या क्रिया सोडल्यास इतर क्रियांमुळे होणारे बदल अतिशय मंदपणे होत असतात. उदा., पर्वताची झीज होणे आणि तिच्याद्वारे सागरात भर पडणे; भूपृष्ठाची पातळी आणि महासागराची पातळी व तळ यांच्यातील परस्परसंबंध तसेच पाणी व जमीन यांची भूपृष्ठावरील विषम वाटणी या गोष्टी भूमिस्वरुपांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. भूमिस्वरूपांच्या उत्पत्तीविषयी विविध संकल्पना मांडण्यात आल्या असून त्यांपैकी प्रमुख पुढे दिलेल्या आहेत.
 
समस्थायित्व : निरनिराळ्या उंचीचे लाकडी ठोकळे पाण्यात टाकले, तर त्यांचे पाण्याच्या वर येणारे भाग हे त्या त्या ठोकळ्यांच्या उंचीच्या प्रमाणात वर आलेले असतात व ते ठोकळे जलस्थैतिक समतोलावस्थेत आहेत, असे म्हटले जाते. भूकवचाचे प्रचंड ठोकळे अशाच समतोलावस्थेत असल्याचे मानतात आणि या समतोलावस्थेला समस्थायित्व म्हणतात. या समतोलामुळे भूकवचाच्या ठोकळ्यांना निरनिराळी उंची प्राप्त होते व त्यांद्वारे महासागरांचे तळ, खंडे, विस्तीर्ण मैदाने व पठारे, पर्वतरांगा इ. भूमिस्वरूपे उत्पन्न झाली आहेत, असा या संकल्पनेचा आशय आहे. समुद्रपातळीच्या खाली ठरावीक किमान खोलीवर वरच्या द्रव्याच्या भाराने प्रत्येक एकक स्तंभावर पडणारा दाब सर्वत्र सारखा असतो, असा या संकल्पनेचा अर्थ होतो. खडक निश्चितपणे दृढ आहेत; परंतु अखंडपणे दीर्घकाल प्रेरणांखाली घनरूप द्रव्यही काहीसे द्रवरूप पदार्थाप्रमाणे वागू शकते व त्यात विरूपण होऊ शकते. डांबराच्या पृष्ठभागावर वजनदार वस्तू ठेवली, तर ती त्यात सावकाशपणे खाली जाऊन स्थिर होईल व समतोल प्रस्थापित होईल. या उदाहरणाद्वारे हे विरूपण समजून घेता येईल. कवचाचे ठोकळे अशाच प्रकारे प्रावरणावर असलेले ओझे मानले असून कवचाचे द्रव्य प्रावरणाच्या द्रव्यापेक्षा हलके आहे. त्यामुळे कवचाचे ठोकळे मुक्तपणे तरंगू शकतील इतक्या खोलीपर्यंत बुडून स्थिर होतील आणि परिणामी भूमिस्वरूपे निर्माण होतील. कवच हलके असल्याने त्याच्या ठोकळ्यांची पाण्यातील हिमनगांशी तुलना होऊ शकेल म्हणजे हिमनगांप्रमाणेच या ठोकळ्यांचा आत गेलेला (बुडालेला) भाग हा वर दिसणाऱ्या भागापेक्षा जास्त मोठा असेल, हे समस्थायित्वाचे तत्त्व आहे. समस्थायित्वामुळे कवचात उभ्या दिशेत समतोल प्रस्थापित होतो. यावरून पर्वताचे भूपृष्ठाच्या वर दिसणारे वस्तुमान हे जादा भासत असले, तर पर्वताखाली त्याच्या उंचीपेक्षाही अधिक खोलीपर्यंत वस्तुमानाची कमतरता असेल म्हणजे पर्वताखालील द्रव्य हे सखल प्रदेशाखालील किंवा सागरतळाखालील द्रव्यापेक्षा हलके असेल. अशा प्रकारे सामान्यपणे पर्वताच्या सरासरी उंचीच्या सहापट खोलीपर्यंत हलके द्रव्य असते, असा अंदाज आहे. पर्वताखालील हलक्या द्रव्याची कल्पना प्रथम गुरुत्वीय निरीक्षणांवरून आली. समस्थायित्वाचा आदर्श समतोल झाला असला, तर महासागर व खंड यांच्यावरील गुरुत्वाकर्षण सारखे असेल. प्रत्यक्षात बहुतेक पर्वतीय उंचवटे आणि महसागरांच्या द्रोणी चांगल्या प्रकारे समतोलित झालेल्या आढळल्या आहेत म्हणजे पर्वतीय उंचवटे हे जादा द्रव्य नाही; तसेच महासागराच्या द्रोणी म्हणजे द्रव्याची कमतरता नाही. जेथे असा समतोल बिघडला आहे, अशा ठिकाणी तो परत प्रस्थापित होण्याची क्रियाही चालू असते. पर्वतनिर्मितीच्या ठिकाणी समतोल बिघडला असल्याने तेथे गुरुत्वीय विक्षेप किंवा गुरुत्वाकर्षणात विसंगती आढळतात (उदा., पॅसिफिकमधील बेटे) आणि अशाच भागांत ज्वालामुखी क्रिया आणि भूकंप एकवटलेले आढळतात. [⟶ समस्थायित्व].
 
पर्वतनिर्मिती : बहुतेक मोठे पर्वत घडीचे पर्वत आहेत. गाळाचे प्रचंड जाडीचे (सु. १२-१५ किमी.) थर साचतात. ते ओझ्याने दाबले जाऊन त्यांना घड्या पडतात आणि असे पर्वत निर्माण होतात (उदा., हिमालय-आल्प्स पर्वतरांगा). पर्वतनिर्मितीच्या या प्रक्रियेला गिरिजनन म्हणतात. [⟶ गिरिजनन].
 
भूकवचाला भेगा व तडे पडूनही पर्वत निर्माण होतात (उदा., अमेरिकेतील सिएरा नेवाडा पर्वतरांगा). अंतर्गत हालचालीने भूकवच वरच्या दिशेत वाकविले गेल्याने अथवा थरांच्या खडकांत खालून शिलारस घुसून ते घुमटाकार झाल्याने घुमटी पर्वत बनतात (उदा., अमेरिकेच्या उटा राज्यातील हेन्री पर्वत). ज्वालामुखीच्या उद्रेकानेही पर्वत निर्माण होतात. (उदा., जपानातील फूजियामा पर्वत). तसेच पठारी प्रदेशाची झीज होऊन पर्वत निर्माण होतात. (उदा., विंध्य आणि सातपुडा पर्वत). पर्वतनिर्मितीस कारणीभूत होणाऱ्या चार प्रक्रियांची केवळ तत्त्वेच पुढे दिली आहेत; मात्र पर्वतनिर्मितीचा प्रश्न अद्यापी सुटलेला नसून त्यांसंबंधीचा सिद्धांत जटिल असेल आणि त्यामध्ये या चारही प्रक्रियांचा वापर करावा लागेल.[⟶ पर्वत].
 
आंकुचन : सुकलेल्या फळावर ज्याप्रमाणे सुरकुत्या पडतात त्याप्रमाणे पृथ्वीचा पृष्ठभाग थंड होताना आकुंचन पावून त्यावर सुरकुत्यांच्या रुपात पर्वत व दऱ्या निर्माण झाल्या असाव्यात, अशी ही पर्वतनिर्मितीसंबंधीची एक सर्वांत जुनी संकल्पना आहे; मात्र प्रारणांमुळे पृथ्वी तापू शकते हे कळल्यानंतर भूवैज्ञानिक गतकाळात पृथ्वी पुरेशी आकुंचन पावली असावी, यावर विश्वास ठेवणे अवघड झाले आहे व त्यामुळे ही संकल्पना मागे पडली.
 
संनयन : भांड्यात पाणी तापविले असता जसे संनयन होते तशा प्रकारचे संनयन प्रावरणात होत असावे असे या प्रक्रियेत मानतात. जर प्रावरण द्रायुरूप असते आणि खालून तापविले जात असते, तर संनयनामुळे त्याचे द्रव्य सावकाशपणे वर (उफाळून) आले असते. तथापि प्रावरण धनरूप व आकार्य (आकार देता येण्यासारखे) असून श्यान (दाट) व द्रायुरूप नाही त्यामुळे त्याच्यातील संनयनाची तऱ्हा द्रायूतील संनयनाच्या तऱ्हेहून वेगळी असावी; शिवाय प्रावरणातील खोल भागात संनयनाची हालचाल जाऊ शकेल की नाही, याविषयी शंकाच आहे.
 
प्रावस्था बदल : खनिजांच्या स्फटिकी संरचनेतील बदल म्हणजे प्रावस्था बदल होय. हा बदल तापमान व दाब यांत बदल झाल्याने होतो. भूकवचाच्या तळाशी असलेल्या मोहोरोव्हिसिक असांतत्यामुळे [⟶ पृथ्वीचे अंतरंग] असा प्रावस्था बदल होत असल्याचे सूचित होते. किरणोत्यर्गी ऱ्हासाने तापमान वाढूनही असांतत्य सीमा खाली जाऊ शकेल; उलट ज्वालामुखीसारख्या क्रियेने उष्णता बाहेर टाकली जाऊन तापमान कमी होईल व ही सीमा वर सरकेल. समस्थायित्वामुळे समतोल प्रस्थापित होताना अशा वेळी उभ्या दिशेत बरेच विस्थापन होऊ शकेल व परिणामी पर्वतनिर्मितीवर परिणाम होऊ शकेल. केवळ या नवीन कल्पनेद्वारे पर्वतनिर्मितीचे स्पष्टीकरण करता येत नसले, तरी पर्वतनिर्मितीच्या एकूण सिद्धांताला ही पूरक ठरु शकेल.
 
अभिवृद्धी : पृथ्वीच्या मध्याकडे जाताना तापमान प्रथम जलदपणे व नंतर सावकाश वाढत जाते. काही शेकडो किमी. खोलीवर सिलिकेटे वितळण्याइतके तापमान असावे. अशा ठिकाणी स्थानिक रूपात वितळण्याची क्रिया घडल्यास तेथे हलके द्रव्य वर व जड द्रव्य खाली असे द्रव्याचे विभाजन होईल. अशा प्रकारे हळूहळू हलके द्रव्य वर येऊ शकेल त्यामुळे भूकवचाच्या द्रव्यात भर पडून खंडाचे ठोकळे निर्माण होत असावेत. ज्वालामुखीचे उद्गिरण हीही अशाच प्रकारची प्रक्रिया असावी. अशाच तऱ्हेने खडकातून बाहेर पडलेल्या द्रव्यापासून महासागर व वातावरण निर्माण झाली असल्याचा पुरावा मिळाला आहे. ही अभिवृद्धीची संकल्पना मान्य होत असून तिच्यातील काही मुद्दे महत्त्वाचे आहेत, याविषयी शंका नाही.
 
खंडविल्पव : या संकल्पनेचे सार पुढीलप्रमाणे आहे. सु. २० कोटी वर्षापूर्वी सर्व खंडांची मिळून बनलेली एक विस्तीर्ण भूमी होती. पुढे ती भंग पावून तिचे तुकडे (खंड) झाले व हे तुकडे नंतर निरनिराळ्या दिशांना सरकत जाऊन आजची खंडे बनली आहेत. या संकल्पनेच्या आधाराने विविध भूमिस्वरूपांच्या निर्मितीचे स्पष्टीकरण देता येते.
 
[⟶ खंडविप्लव].
 
महासागरांच्या तळांचे विस्तारण : ही संकल्पना १९५० नंतर विकसित झाली आहे. या संकल्पनेनुसार महासागरांच्या तळाचे द्रव्य आडव्या दिशेत विस्थापित होत असते किंवा सरकत असते. असे विस्थापन वर्षात १ ते ४ सेंमी. इतके अल्प असल्याने ते अप्रत्यक्षपणे मोजावे लागते. सागरांतर्गत उंचवटे व पर्वतरांगा या ठिकाणी वरच्या प्रावरणातील संनयनाद्वारे द्रव्य वर येत असते. हे द्रव्य तेथील कटकाच्या (सर्वात उंच भागाच्या) मध्यरेषेच्या दोन्ही बाजूंना आडव्या दिशेत पसरते. अशा प्रकारे महासागरांचे तळ नव्याने बनतात किंवा त्यांच्या जागी नवीन द्रव्य येते. एच्. हेस यांनी सुचविलेली ही संकल्पना विविध निरीक्षणांद्वारे पडताळून पहाण्यात आली आहे. कटकाच्या मध्यभागी वर आलेले द्रव्य लगेच थंड होते व त्या वेळच्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेनुसार त्यांच्या चुंबकीकरणाची दिशा निश्चित होते. निरनिराळ्या काळांत पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची दिशा वेगवेगळी असल्याने निरनिराळ्या काळांत वर आलेल्या खडकातील चुंबकीकरणाच्या दिशा वेगवेगळ्या असल्या पाहिजेत. विविध कटकांभोवतील खडकांच्या चुंबकीय क्षेत्रांच्या दिशांची काळजीपूर्वक तुलना करून भूवैज्ञानिकांनी महासागरांच्या तळांचे विस्तारण होत असल्याचे पुष्कळ निश्चितपणे प्रस्थापित केले आहे. या संकल्पनेमुळे खंडविप्लव आणि गिरिजनन यांच्याविषयीच्या माहितीत नवीन भर पडली आहे.
 
भूपट्ट सांरचनिकी : महासागरांच्या तळांचे विस्तारण या संकल्पनेतून १९७० नंतर भूपट्ट सारंचनिकी या संकल्पनेचा विकास झाला आहे. पूर्वीच्या संकल्पना तसेच पर्वतनिर्मिती, भूंकप, ज्वालामुखी इ. भूवैज्ञानिक क्रिया यांता एकत्रित विचार करणे आणि त्यांचे परस्परसंबंध प्रस्थापित करणे यासंबंधीचा प्रयत्न या संकल्पनेत केला आहे. तापमान व दाब यांच्यामुळे प्रावरणाचा खालील भाग मऊ व विरूप होऊ शकेल, असा असल्याचे मानतात व त्यामुळे त्याला दुर्बलावरण म्हणतात. दुर्बलावरणात उथळ संनयन प्रवाह असून त्यांच्यामुळे ते उकळणारे द्रव असलेल्या पात्राप्रमाणे असावे, असे मानता येते. दुर्बलावरण ५० ते १०० किमी. पासून कित्येकशे किमी. खोलीपर्यत आहे. याच्यावरील प्रावरणाचा भाग व भूकवच यांचे मिळून दृढ खडकांचे शिलावरण बनलेले आहे (आ. ८). या शिलावरणाचे सहा मुख्य व मोठे आणि अनेक लहान तुकडे म्हणजे भूपट्ट असून ते त्यांच्या खालील दुर्बलावरणावर सरकत असतात. हे भूपट्ट सारंचनिकीचे गृहीत तत्त्व आहे. हे भूपट्ट १०० किमी. जाड असल्याचे मानले असून सु. ४० किमी. जाडीचे खंडांचे तुकडे (ठोकळे) मोठया भूपट्टांवर असल्याचे मानतात. महासागराच्या तळांच्या विस्तारणामुळे भूपट्ट एकमेकांपासून दूर जातात. महासागरातील काही खंदकांजवळ भूपट्ट एकत्रित येतात व महासागरी भूपट्ट दुसऱ्या भूपट्टखाली जातो; जर दुसऱ्या भूपट्टांवर खंडीय कवच (तुकडा) असेल, तर खंडीय सीमेजवळ पर्वत (उदा., अँडीज) निर्माण होऊ शकेल. जेव्हा दोन खंडीय भूपट्ट एकमेकांवर आदळतात तेव्हा मोठया प्रमाणात पर्वतनिर्मिती होऊ शकते (उदा., आल्प्स-हिमालय). एक महासागरी भूपट्ट दुसऱ्याखाली गेल्यास अधिक उच्च तापमानाच्या दुर्बलावरणात जाताना खाली जाणाऱ्या भूपट्टतील महासागरी कवच अंशतः वितळत असावे. अशा प्रकारे शिलारस निर्माण होऊन व तो भूपृष्ठावर येऊन ज्वालामुखी निर्माण होत असावेत. अशा प्रकारे या संकल्पनेच्या साह्याने भूकंपाचे आणि अनेक भूमिस्वरूपांच्या निर्मितीचेही स्पष्टीकरण देता येते. [⟶ भूपट्ट सांरचनिकी].
 
 
 
साधनसंपत्ती : मानवाच्या विविध गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या जवळजवळ सर्व वस्तू त्याला पृथ्वीमधूनच उपलब्ध होतात. अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा पृथ्वीपासून मिळणाऱ्या द्रव्यांद्वारेच भागविल्या जातात. ही द्रव्ये त्याला जमीन, महासागर व वातावरण यांपासून मिळत असतात. जमिनीवरील या साधनसंपत्तीचे सामान्यपणे पुढील प्रकार पडतात. गोडे पाणी, शेतजमिनी, खनिजांचे साठे, प्राणिसृष्टी, जंगले व कुरणे यांपासून औषधांपासून पोलादापर्यंतच्या बहुतेक वस्तू बनविता येतात. मानव मुख्यत्वे जमिनीवरील साधनसंपत्तीवरच अवलंबून राहिला असला, तरी सागरी संपत्तीचा (उदा., मीठ, आयोडीन व विविध खनिजे, मासे व इतर जलचर प्राणी, तसेच सागरी वनस्पती) उपयोगही तो प्राचीन काळापासून करीत आला आहे. वातावरणापासून मानवाला ऑक्सिजन हा जीवनावश्यक घटक तर मिळतोच, शिवाय वातावरणातील नायट्रोजनाचा औद्योगिक दृष्ट्या उपयोग करण्यात येतो व विश्वकिरण, जंबुपार किरण यांसारख्या भेदक किरणांपासून मानवासह सर्व जीवनसृष्टीचे वातावरणामुळेच रक्षण होत असते. [⟶ नैसर्गिक साधनसंपत्ति].
 
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पृथ्वी" पासून हुडकले