"अशोक सराफ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

 
==अभिनय-प्रवास==
[[Image:Ashoksaraf1.PNG |250px|rightleft|thumb|'एक शेर दुसरी सव्वाशेर' चित्रपटातील एक दृष्यात अशोक सराफ]]
 
अशोक सराफ यांचा अभिनय 'अष्टपैलू' या विशेषणाशिवाय शब्दात मांडणे कठीण आहे. केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरुपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कार्याद्वारे घडविले आहे. विनोद रक्तातच मुरलेल्या अशोक सराफ यांनी दादा कोंडकें सारख्या जगमान्य विनोदवीराशी तोडीस तोड अशी अभिनयाची जुगलबंदी पांडू हवालदार मध्ये दाखविली तर कळत नकळत, भस्म यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी हुबेहूब साकारली तर [[चौकट राजा, चित्रपट|चौकट राजा]] मधील सहृदय गणाच्या व्यक्तिरेखेनेही प्रेक्षकांच्या हृदयात अजिंक्य स्थान मिळविले. ऐंशीच्या दशकात [[लक्ष्मीकांत बेर्डे]] यांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने [[अशी ही बनवाबनवी, चित्रपट|अशी ही बनवाबनवी]], [[धूमधडाका, चित्रपट|धूमधडाका]], [[दे दणा दण, चित्रपट|दे दणा दण]] यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला [[सचिन पिळगांवकर]], [[महेश कोठारे]] यासारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून [[नवरी मिळे नवर्‍याला, चित्रपट|नवरी मिळे नवर्‍याला]], [[आत्मविश्वास, चित्रपट|आत्मविश्वास]], [[गंमत जंमत, चित्रपट|गंमत जंमत]], [[आयत्या घरात घरोबा, चित्रपट|आयत्या घरात घरोबा]] पासून अलिकडच्या [[शुभमंगल सावधान, चित्रपट|शुभमंगल सावधान]] आई नं.१ व 'एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर' पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकाला खिळवून ठेवले.