"विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३८:
: '''पर्याय २ रा''') जोखीमी बद्दल सजगतेची शक्य ती कल्पना देऊन लोगो आणि ट्रेडमार्कच्या बाबतीत लोगो आणि ट्रेडमार्कच्या बद्दल वर्णनात्मक परिच्छेद लेखन + संबंधीत छायाचित्राच्या वापराबाबत आढाव्यात सयुक्तीक तर्कसुसंगत स्पष्टीकरण लिहिणे बंधन कारक करून; सोबत <nowiki>{{</nowiki>[[साचा:संकोले]]<nowiki>}}</nowiki> हा मथळा साचा वापरणे बंधन कारक करून, समीक्षण नसलेली चित्रपट पोस्टर्स मात्र नाकारावीत (लेखास केवळ मनोवधक बनवण्याच्या उद्देशासाठी उचित उपयोग चित्र चा उपयोग केला जाऊ शकत नाही.) अशी छायाचित्रे विकिपीडियाबाहेर इतर संस्थळावर विकिपीडियातून एंबेडकरण्यास अनुमती नसल्या बद्दल संबंधीत कॉपीराईटेड टॅग मध्ये सुस्पष्ट सुचना असावी. (असा उपयोग आढळल्यास पहारा आणि गस्त पानावर संचिकेचे नाव आणि वापरल्या गेलेल्या संस्थळाचे नाव पाहील्याच्या वेळ तारखेसहीत सुस्पष्ट नमुद करून संबंधीत संचिकेवर अयोग्य संचिका वापर नावाची संचिका चढवावी का संचिका वगळावी या बद्दल निती बनवून तद नुसार कारवाई करावी) जाणत्या सदस्यांनी प्रचालकांच्या साहाय्याने वेळोवेळी गरज अभ्यासून शर्तींमध्ये ताठरता अथवा लवचीकता आणावी.
: याच पर्यायामध्ये छायाचित्र विषयक समीक्षणांवर आधारीत समीक्षणात्मक लेखासाठी लागणारी छायाचित्रे सुद्धा चढवू द्यावीत.
 
: या पर्यायात १) मुक्त सांस्कृतीक काम या संकल्पनेचा परीचय करून घेतला असणे आणि लोगो (छाया)चित्रासाठी अधीक मुक्त आणि कायदेशीर विकल्प उपलब्ध करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्यासाठी तत्वत: बांधील असणे २) भारतीय प्रताधिकार कायदा, ट्रेडमार्क कायदा, डिझाईन्स कायदा ब्रॉडकास्टींग कायदा, केसस्टडीज आणि इतर संबंधीत कायद्यांतर्गत उद्भवू शकणारी जोखीमीची किमान स्वरूपाची माहिती घेतली असणे ३) लोगो / चित्र / छायाचित्र विकिपीडियाबाहेर प्रकाशित झालेले असणे ४) ते प्रकाशन प्रताधिकार धारकाच्या परवानगीने झालेले असणे ५) विकिपीडियावर घेताना अशा छायाचित्राचा स्रोत नोंदवणे ६) प्रताधिकार धारक/ मालकांच्या मालकीची नोंद करणे (attribution) ७) मुक्त विकल्प उपलब्ध नसणे अथवा मुक्त विकल्प बनवणे शक्य नसणे ८) उद्देश लेखास मनोवेधक बनवणे '' हा नसणे''' ९) शक्यतो कॉपीराइट धारकाचे कोणतेही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नसावी १०) गूड फेथ मध्ये कल्पना नसल्याचा अपवाद वगळता ट्रेडमार्क / लोगो इत्यादी लेखात संबंधीत संस्थेचा असेल याची पुरेशी खात्री करणे ११) कमीत कमी उपयोग /वापर (एका चित्राने जे काम भागते त्यासाठी अधिक चित्रे वापरु नयेत) १२) चित्राचा छोटा भाग अथवा कमी रिझोल्यूशनचे चित्रवापरलेले चालत असल्यास पहावे (याने भारतीय कायद्यातील जोखीम कमी होत असेलच असा गैर समज टाळावा) १३) छायाचित्र आणि संबंधीत मजकुर विकिपीडियाच्या इतर निती आणि ज्ञानकोशीय उल्लेखनीयता निकषास अनुसरुन असावा १४) मराठी विकिपीडियाच्या छायाचित्र विषयक इतर निकषांना ही पात्र ठरणारा असावा १४) (छाया)चित्र चढवण्या आधी पासून किमान दोन परीच्छेदांचा ज्ञानकोशीय लेख उपलब्ध असावा १५) असे छायाचित्र / लोगो ज्या कोणत्या लेखात वापरावयाचे आहे तेथे ते वापरणे कसे सयुक्तीक तर्कसुसंगत स्पष्टीकरण '''प्रत्येक लेखाच्या बबतीत स्वतंत्रपणे''' नमुद करणे अत्यावश्यक आहे, (स्पष्टीकरण नसणे /अयोग्य असणे याने संबंधीत लेखातून संचिका वगळली जाईल, आणि एकाही लेखास न जोडलेली संचिका त्या कारणाने वगळली जाईल) १६)
 
 
 
{{collapse top|* या पर्याया मागची भूमिका }}
मराठी विकिपीडियावर जोखींमींची चर्चा केलेलीच आहे तरी सुद्धा ज्यांना कायद्याचा उदार अर्थ काढावयाचा आहे अथवा जोखीम असेल नसेल पुरेशी काळजी घेऊन पुढे जावयाचे आहे त्यांच्यासाठी हा उदार पर्याय.
{{Collapse bottom}}
 
 
 
 
 
:'''अथवा'''