"विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २०:
 
==जोखीम अंशत: हलकी करु शकणारे मुद्दे==
* हे मुद्दे नोंदवण्याचा उद्देश केवळ सजगता आहे. विकिपीडिया कायद्यांच्या कोणत्याही उल्लंघनांना प्रोत्साहन देत नाही. आणि या मुद्द्यांमुळे जोखीम कमी होईलच असे निश्चितपणे सांगताही येत नाही. खालील गोष्टींमुळे जोखीम कमी होत असू शकते, संपत नाही, (जोखीम संपली हे केसटू केस केवळ न्यायालयच सांगू शकते)
 
* विकिपीडियावर उचित उपयोग संचिका चढवताना चढवणाऱ्या व्यक्तीस कोणताही आर्थीक लाभ होत नाही.
:: '''मर्यादा''': कायद्यानुसार प्रताधिकार उल्लंघन उल्लंघनच राहते, आर्थीक फायदा घेतला नसणे याने उल्लंघनाने निर्माण होणारी जोखीम अंशत: कमी होते संपत नाही (जोखीम संपली हे केसटू केस केवळ न्यायालयच सांगू शकते), या भूमिकेची मर्यादा, पळवाट म्हणून कुणी या कडे पाहणे असे करणाऱ्यास जोखिमीचे असू शकते.
 
* विकिपीडियावर उचित उपयोग संचिका चढवताना चढवणारी व्यक्ती कॉपीराईट मालकाशी स्पर्धेत नाही.
:: '''मर्यादा''': कायद्यानुसार प्रताधिकार उल्लंघन उल्लंघनच राहते, कॉपीराईट मालकाशी स्पर्धेत नसणे याने उल्लंघनाने निर्माण होणारी जोखीम अंशत: कमी होते संपत नाही (जोखीम संपली हे केसटू केस केवळ न्यायालयच सांगू शकते), या भूमिकेची मर्यादा, पळवाट म्हणून कुणी या कडे पाहणे असे करणाऱ्यास जोखिमीचे असू शकते. खासकरून कॉपीराईट मालकाचे आर्थीक नुकसान झाले असेल अथवा होत असेल.
 
* नो मलाईस, नो बॅडफेथ
:: '''मर्यादा''': कायद्याच्या दृष्टीने नो मलाईस, नो बॅडफेथ म्हणजे गूडफेथ असे नव्हे, परवानगी शिवाय दुसऱ्याच्या शेतात जाऊन गवत उपटणे मलाईस आणि बॅडफेथ नसेल तरीही कायद्याचे उल्लंघन उल्लंघनच राहते, कायद्यानुसार प्रताधिकार उल्लंघन उल्लंघनच राहते, उल्लंघनाने निर्माण होणारी जोखीम नो मलाईस, नो बॅडफेथ ने अंशत: कमी होईल संपत नाही.
 
:: 'परवानगी शिवाय दुसऱ्याच्या शेतात जाऊन गवत उपटणे' हा गुन्हा असल्याचा कायदा आहे हे माहित नाही, कायद्याच आणि त्यातील नियमांची माहिती नसणे हे गूडफेथ मध्ये कव्हर होत नाही. शेताच्या मालकाने नौकराला/इतरकुणाला अबक प्रकारचे गवत उपटण्याची परवानगी दिली वेगळे गवत अबक सारखे दिसत होते ते चुकीने (जाणीवपुर्वक नव्हे) उपटले गेले तर त्या साठी गुडफेथ प्रोव्हीजन आहे, कायद्याचे उल्लंघन करण्यासाठी, होऊ देण्यासाठी गूडफेथ प्रोव्हीजन नसते.