"इराक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,१५८ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (बॉट: removed featured-article template, now given by wikidata.)
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''इराक''' हा अतिप्राचीन लिखित इतिहास असलेला [[मध्यपूर्व|मध्यपूर्वेतील]] एक प्रजासत्ताक [[देश]] आहे. इराकच्या पूर्वेला [[इराण]], दक्षिणेला [[सौदी अरेबिया]], आग्नेयेला [[कुवेत]], पश्चिमेला [[जॉर्डन]], वायव्येला [[सीरिया]] व उत्तरेला [[तुर्कस्तान]] हे देश आहेत. [[बगदाद]] ही इराकची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
१९७९ ते २००३ सालादरम्यान इराक देशाचे शासन [[सद्दाम हुसेन]] ह्या हुकुमशहाच्या ताब्यात होते. २००३ साली [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] इराकवर लष्करी कारवाई करून सद्दामची राजवट संपुष्टात आणली. [[नूरी अल-मलिकी]] हे इराकचे सध्याचे पंतप्रधान आहेत.
 
इराकचे [[क्षेत्रफळ]] ४,३८,३१७ [[वर्ग किलोमीटर]] एवढे असून [[लोकसंख्या]] ३,१४,३७,००० एवढी आहे. [[अरबी]] व [[कुर्दिश]] ह्या येथील प्रमुख [[भाषा]] आहेत. [[टायग्रिस]] आणि [[युफ्रेटिस]] या दोन नद्यांमधील प्रदेश म्हणून पूर्वी या देशाला 'मेसोपोटेमिया' असे म्हणत.
 
इराकचे अधिकृत [[चलन]] [[दिनार]] असून या देशाची संपूर्ण [[अर्थव्यवस्था]] [[खनिज तेल]]ावर अवलंबून आहे. [[बार्ली]] हे इराकचे प्रमुख [[धान्य]] आहे. [[खजुर]]ाची निर्यात करण्यात इराकचा [[जग]]ात पहिला क्रमांक लागतो.
 
== इतिहास ==
===ऑटोमन साम्राज्य===
इराण, सुमेरिया आणि हडप्पा या तीनही समृद्ध संस्कृती साधारण एकाच कालखंडातल्या (तपासून पाहावे! ). त्या काळी इराक(मेसोपोटेमिया) हा सुमेरियन संस्कृतीचा हिस्सा होता. हडप्पाचे लोक सुमेरियन लोकांशी व्यापार करण्यास उत्सुक असत.
 
इसवी सन १५३४ ते १९१८ या कालखंडात इराकमध्ये ऑटोमन साम्राज्य होते. इ‌‌.स. १९१७मध्ये पहिल्या जागतिक युद्धात, ब्रिटनच्या सेनेने बगदादला वेढा घातला, आणि ऑटोमन साम्राज्यावर विजय मिळवला. ब्रिटिश लोकांनी मेसोपोटेमियामध्ये आपले सरकार स्थापन केले आणि त्या देशाचे नाव इराक असे केले.
१,९३६

संपादने