"धूमकेतू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
No edit summary
ओळ ६:
 
धूमकेतू सूर्यापासून अतिदूर अंतरावर असलेल्या ढगांपासून तयार होतात असे समजले जाते. असे ढग [[सौर तारागर्भ|सौर अभ्रिकेपासून]]([[:en:Solar nebula|Solar nebula]]) बनलेल्या घन कचर्‍यापासून तयार झालेले असतात. उल्का वेगळ्या पद्धतीने तयार होतात पण अतिथंड धूमकेतूच्या आतील अस्थिर वायू/बाष्प संपल्यावर त्याच्यापासून उल्का होतात.
 
==इतिहास==
 
ख्रिस्ताब्द [[कालगणना]] सुरू होण्यापूर्वी ३५० वर्ष म्हणजे [[इ.स.पू. ३५०]] च्या सुमारास [[ग्रीक]] तत्त्वज्ञ [[एॅरिस्टॅाटल]] याच्या मिटिऑरॉलॉजीआ ( meteorologia) नावाच्या प्रसिद्ध ग्रंथात धूमकेतूचा प्रथम उल्लेख सापडतो. '[[पृथ्वी]]च्या वातावरणात दूरवर घडणारे निसर्गाचे निःश्वास' असे त्याने धूमकेतूचे वर्णन केले आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात तत्कालीन एक पंडित क्लॉडियस टोलेमी (Claudius Ptolemy) यानेही त्याच्या अल्माजेस्ट ( Almagest) या ग्रंथात असेच मत प्रतिपादन करून ऍरिस्टॉटलला दुजोरा दिला. नंतर मात्र हे तत्व कोणाला पटले नाही. [[रोम]]न तत्ववेत्ता ल्युसिअस सिनेका याने प्रथम धूमकेतू हे खगोल गोल असल्याचे विधान स्वतःच्या एका लेखात केले. मात्र शास्त्रीय निरीक्षणाचा आधार तो देऊ शकला नाही. नंतर १६ व्या शतकातील एक [[खगोलशास्त्रज्ञ]] [[टायको ब्राहे]] (Tycho Brahe) याने स्वतः बनवलेल्या उपकरणाच्या साहाय्याने धूमकेतू हे खगोल गोल असल्याचे सप्रमाण सिद्ध करून दाखविले. [[इ.स. १५७७]] साली पृथ्वीच्या जवळ आलेल्या एका धूमकेतूचे त्याने निरीक्षण केले व आपले मत मांडले की, धूमकेतू हे पृथ्वीच्या जवळपास असतीलतर इतर तार्‍यांच्या संदर्भात पॅरॅलॅक्स पद्धतीनेत्याच्या अंतराचे मोजमाप करता आले पाहिजे. पण तसे शक्य होत नाही याचा अर्थ पृथ्वी व [[चंद्र]] यांच्यामधील अंतरापेक्षा कितीतरी पटीने दूर हे धूमकेतू असले पाहिजेत.
 
== हेसुद्धा पाहा ==
 
* [[होम्स धूमकेतू]]
 
==संदर्भ==
 
*[http://www.avkashvedh.com/ अवकाशवेध]
 
{{साचा:अंतरिक्षशास्त्र}}
"https://mr.wikipedia.org/wiki/धूमकेतू" पासून हुडकले