"ख्रिस्तोफर कोलंबस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ ४०:
 
युरोपीय साम्राज्यवाद व आर्थिक प्रतिस्पर्धा वाढत होत्या व युरोपीय राज्ये संपत्तीच्या शोधात नवनवीन व्यापारी मार्ग स्थापन करत होते. ह्या पार्श्वभूमीवर पूर्व दिशेला असलेला हिंदुस्थान देश हा पश्चिमी सागरमार्गाने गाठता येईल ह्या तर्कावर आधारलेल्या कोलंबसच्या मोहिमेला शेवटी स्पेनचा शाही पाठिंबा मिळाला. स्पेनच्या राजेशाहीला त्या मोहिमेत आशिया खंडातल्या अतिफायदेशीर मसाल्याच्या व्यापाराद्वारे आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर कुरघोडी करण्याची संधी दिसली. आपल्या १९४२च्या पहिल्या सफरीत त्याच्या अंदाजाने कोलंबस जपानला पोचणार होता त्याऐवजी बहामा द्वीपसमूहावर पोहोचला. ज्या ठिकाणी त्यांचे जहाज लागले त्या जागेला कोलंबसने साल्व्हाडोर हे नाव दिले. पुढच्या तीन मोहिमांत कोलंबस बुद्रुक व खुर्द इंडीज, वेनेंझुएलाचा कॅरिबिअन किनारा व मध्य अमेरिका ह्या भागांना भेटून आला व त्याने ते प्रांत स्पेनच्या राजांच्या अधिकाराखाली आल्याचे जाहीर केले.
 
तुर्कांनी काॅनस्टॅन्टीनोपल जिंकल्याने युरोपीयांचे [[आशिया]] खंडाशी [[व्यापार]] करण्याचे मार्ग बंद झाले. त्यामुळे व्यापार करण्यासाठी नविन मार्ग शोधण्याची आवश्यकता होती. यासाठी कोलंबस सागरी मार्गाने निघाला खरा पण तो भारतात न पोहचता उत्तर अमेरिकेत पोहचला. पण आपण भारतातच पोहोचलो आहे अशी त्याची समजूत झाली. मात्र काही वर्षांनी [[अमेरिगो व्हेस्पुसी]] हा कोलंबसच्या मार्गावर निघाला व अमेरिका खंडात पोहचला. पण त्याला लक्षात आले की हा भारत नसून दुसरीच भूमी आहे कारण भारतातील लोकं [[शेती]] करतात हे त्याला माहित होते. त्यामुळे त्याच्या नावावरून या खंडाला '''अमेरिका''' असे नाव दिल्या गेले.
 
कोलंबस हा अमेरिकेला पोहोचणारा पहिला युरोपीय शोधक नव्हता. लिफ एरिकसनने ११व्या शतकात नोर्स मोहिमेखाली अमेरिका गाठली होती.<ref>http://www.pc.gc.ca/lhn-nhs/nl/meadows/index_e.asp</ref> पण त्याचा पाठपुरावा झाला नाही आणि त्यामुळे त्यातून टिकाऊ असा युरोप व अमेरिका संबंध अस्तित्वात आला नाही, तो कोलंबसच्या सफरींमुळे होण्यास सुरुवात झाली. पुढची काही शतके युरोपचा हा अमेरिका-शोध, कब्जा व वसाहतीकरण चालूच राहिले. त्याचा आधुनिक जगाच्या घडणीवरही बराच प्रभाव पडला. कोलंबसने क्रिस्ती धर्माचा प्रसार ही स्वतःची मोठी कर्तबगारी मानली.<ref name="Britanica"/>