"मिनोती आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६७१ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
डॉ. मिनोती आपटे यांनी पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस ही पदवी घेऊन जवळच्याच ससून रुग्णालयात काम केले, त्यानंतर त्या ऑस्ट्रेलियाला गेल्या व आता तेथील नागरिक आहेत. ऑस्ट्रेलियातील साऊथ वेस्टर्न सिडनी क्लिनिकल स्कूल या न्यू साऊथ वेल्स विद्यापीठाच्या संस्थेत त्या वैद्यकशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. तसेच त्या इश्गहॅम इन्स्टिटय़ूट फॉर अ‍ॅप्लाइड रिसर्च या संस्थेच्या स्वादुपिंड संशोधन गटाच्या संचालक आहेत.
 
अल्कोहोलमुळे होणार्‍या स्वादुपिंडाच्या कर्करोगातील उपचाराच्या त्या तज्ज्ञ आहेत. 'पॅनक्रिएटॉलॉजी' या नियतकालिकाच्या त्या प्रमुख संपादक आहेत.
 
==संशोधन==
स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्यानंतर फक्त सहा टक्के रुग्ण पाच वर्षांहून अधिक काळ जगू शकतात. या प्रकारचा कर्करोग इतका आक्रमक का असतो याचा शोध मिनोती आपटे घेत आहेत. लठ्ठपणा, मधुमेह व इतर दुर्मीळ जनुकीय आजार स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे होऊ शकतात. स्वादुपिंडाचा कर्करोग नेमका कसा होतो याची पेशींच्या पातळीवरील प्रक्रिया त्यांनी अभ्यासली आहे, त्यातून आगामी काळात स्वादुपिंडाच्या कर्करोगावर काही नवीन औषधे तयार करता येतील. त्यांच्या संशोधनामुळे त्या वैज्ञानिक संशोधनात प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
 
==डॉ. मिनोती आपटे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* वैद्यकीय संशोधनासाठी, ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स राज्याचा ’वूमन ऑफ द ईयर २०१५’ पुरस्कार..
* ’ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हे पदक
 
 
[[वर्ग:मराठी संशोधक]]
 
[[वर्ग: इ.स. १९५८ मधील जन्म]]
(अपूर्ण)
५५,५९२

संपादने