"मृत्यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,६३४ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
 
==धार्मिक दृष्टिकोन==
माणसाचा मृतदेह पुरणे, जाळणे, पशुपक्ष्यांच्या ताव्यात देणे नदीला किंवा समुद्राला अर्पण करणे इत्यादी अंत्यविधीच्या प्रथा निरनिराळ्या समाजात रूढ आहेत. हा अंत्यविधी करण्यापूर्वी मृत देहावर अखेरचे कौटुंबिक, सामाजिक आणि धार्मिक संस्कार करण्यात येतात. मृत्यूनंतर विशिष्ट दिवशी आप्त आणि अन्य लोक जमा होतात आणि विशिष्ट धार्मिक किंवा तशाच प्रकारचे काही विधी करतात. याशिवाय मृतव्यक्तीचे मासिक, त्रैमासिक किंवा वर्षश्राध करण्याची पद्धत हिंदूंमध्ये आहे. अन्य लोक ठरावीक दिवशी मृताच्या स्मृतीनिमित्त किमान त्याच्या तसबिरीला हार घालतात.
 
या सर्व विधींच्या मागे मृत व्यक्तीला आपल्या सद्‌भावना, श्रद्धा, आपले सन्मान पोहचावेत अशी इच्छा असते. म्हणजे त्या व्यक्तीच्या जिवाला किंवा आत्म्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे असे गृहीत धरलेले असते. मृतात्म्याला सद्‌गती लाभो, किंवा शांती मिळो, त्याचा पुढचा प्रवास सुरळीत होवो अशी इच्छा त्या मृत जिवापर्यंत पोहोचते अशी लोकांमध्ये समजूत असते.
 
मृत व्यक्तीचा ’जीव’ कायमचा कबरीमध्ये पडून राहतो, कायमचा कैलासावर, वैकुंठात, स्वर्गात, नरकात किंवा थोडाथोडा काळ या दोन्ही ठिकाणी वास्तव्य करतो, भूत होऊन पृथ्वीवरच राहतो, परमेश्वराशी एकजीव होतो जातो, निर्वाणाला जातो वगैरे अनेक धार्मिक कल्पना आहेत. जगाच्या अंताच्या वेळी ईश्वर कबरीत पडून राहिलेल्या ’जिवा’चा न्यायनिवाडा करतो अशीही धार्मिक कल्पना आहे. याचा अर्थ असा की ’जिवाचे मृत्यूनंतर अस्तित्व’ अनेक धर्मांनी मान्य केले आहे. म्हणजे माणसाचा शारीरिक मृत्यू झाल्यावरही तो धर्मदृष्ट्या ’जिवंत’ असतो.
 
==आध्यात्मिक दृष्टिकोन==
५७,२९९

संपादने