"मृत्यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,६५६ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 106 langlinks, now provided by Wikidata on d:Q4)
'''मृत्यू''' म्हणजे जीवित प्राण्याच्या जीवनात येणारी अपरिहार्य पायरी. मृत्यूनंतर [[शरीरा|शरीराचे]] कार्य थांबते व [[प्राणी]] निष्क्रिय होतो. मृत्यूनंतर [[शरीरा|शरीराचे]] हळूहळू [[विघटन]] होण्यास सुरुवात होते. [[जन्म]] झालेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू अपरिहार्य आहे. <br /><br />
 
एखाद्याचा मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? या प्रश्नाचे तीन दृष्टिकोनांतून विश्लेषण करता येते. :- <br />
वैद्यकीय दृष्टिकोनातून, धार्मिक दृष्टिकोनातून आणि तिसरे आध्यात्मिक दृष्टिकोनातून.
 
==वैद्यकीय दृष्टिकोन==
’शरीरान्तर्गत सर्व क्रियाबंद पडणे म्हणजे मृत्यू’ अशी ढोबळ व्याख्या करता येते. श्वासोच्छ्‌वास बंद होणे, नाडीचे व हृदयाचे ठोके बंद पडणे, दृष्टी स्थिर होणे, शरीरावरील केस ताठ होणे, शरीराचे तापमान घसरणे व शरीर थंड पडायला लागणे, संपूर्ण मेंदूच्या प्रक्रिया थांबणे, शरीर कुजायला सुरुवात होणे आणि बाह्य जगताशी संपर्क कायमचा तुटणे ही मृत्यूची लक्षणे समजली जातात.
 
मृत्यूनंतर काही तास शरीरातील पेशी त्यांच्या आंतरिक प्रक्रियेमुळे स्वतंत्रपणे जिवंत राहतात. म्हणूनच मृत्युपश्चात अवयवांचे दान करता येते, आणि दुसर्‍या व्यक्तीच्या शरीरात ते अवयव बसवता येतात. हे मृत शरीरातले अवयव जिवंत असले तरी तरी त्यांत चेतना वा जाणीव नसते. उदाहरणार्थ मृत्यूनंतर सात-आठ तास डोळ्यांच्या पेशी जरी जिवंत असल्या तरी जाणिवेच्या अभावी बघण्याचे कार्य मात्र घडत नसते. मृत्यूनंतर पचनक्रियाही काही वेळ चालू असते. शरीर कुजण्याची क्रिया मृत्यूनंतर काही तासांनी सुरू होते.
 
हृदयक्रिया बंद पडणे या लक्षणापेक्षा मेंदू बंद पडणे हे मृत्यूचे सर्वमान्य लक्षण आहे. त्यामुळेच हृदयक्रिया बंद पडलेल्या आणि डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या व्यक्ती, त्यांचे मेंदू बंद पडलेले नसल्याने काही तासांनी जिवंत झाल्याची उदाहरणे आहेत.
 
मृत्यूची काटेकोर कायदेशीर व्याख्या अजूनही सर्वमान्य झालेली नाही.
 
==धार्मिक दृष्टिकोन==
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
* हेसुद्धा पाहा [[अंत्यविधी कला]]
 
५७,२९९

संपादने