१,७०,१९४
संपादने
No edit summary |
छो (→प्रारंभिक जीवन) |
||
गृहत्याग करण्यासाठी हरपाळदेवांनी रामाच्या दर्शनास रामटेक येथे जावयाचे आहे अशी सबब घरी सांगितली. त्यावेळी महाराष्ट्रातील यादव व [[भडोच]]चे राज्य यांच्यात कलह सुरू होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी या कल्पनेस विरोध केला. परंतु शेवटी हरपाळदेवांनी वडिलांचे मन वळविले व त्यांच्या वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार व सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली. त्यांना आपल्यासोबतचा लवाजमा नको होता. त्यांना सर्वत्याग करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामावरून आपले क्षेमकुशल कळवण्यासाठी एकेक सैनिक परत पाठवणे सुरू केले. शेवटी अमरावती जिल्ह्यातील देऊळवाडा येथे काजळेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असतांना त्यांचे सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून त्यांनी आपली राजवस्त्रे तिथेच काढून ठेवून दोन वस्त्रांनिशी ते तिथून निघून गेले.<ref name="leela7">लीळाचरित्र, एकांक, लीळा ७</ref>
सर्वस्वाचा त्याग करून भ्रमण करत असतांना हरपाळदेव [[रिद्धपूर]] येथे आले. तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील श्री [[गोविंदप्रभु]] दिसले. गोविंदप्रभूंपासून हरपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या.<ref name="leela7"/> याचवेळी गोविंदप्रभूंनी त्यांना चक्रधर हे नाव दिले.<ref>संकपाळ (२००९) पृ. १२</ref>
==एकाकी भटकंतीचा काळ==
|