"भोजनकुतूहल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: भोजनकुतूहल हा रघुनाथ नवहस्ते लिखित ग्रंथ आहे. याची रचना सतराव्य...
(काही फरक नाही)

०९:५८, २० फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

भोजनकुतूहल हा रघुनाथ नवहस्ते लिखित ग्रंथ आहे. याची रचना सतराव्या शतकात झाली. महाराष्ट्रात घरोघरी रोज होणाऱ्या पदार्थांचे मूळ येथे नोंदवलेले आढळते. तसेच सणावारी होणार्‍या पाककृती यात दिसून येतात.

इतिहास

तंजावर येथील मराठा राजे एकोजी भोसले यांची पत्नी दीपाबाई हिने रघुनाथ नवहस्ते यांच्याकडून 'भोजन कुतूहल' हा पाककलेवर ग्रंथ लिहून घेतला असे मानले जाते. परंतु पाठभेदाने हा ग्रंथ मूलत: अकराव्या शतकात लिहिला गेला व असे मानणारे अभ्यासक आहेत. रघुनाथ नवहस्ते याची शुद्धप्रत तयार केली.

स्वरूप

हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिलेला आहे. यात सुमारे चारशे पाककृतींचे पद्धतशीर वर्णन आहे. या पाककृती पद्यात मांडलेल्या आहेत. शिवाय अन्न व त्यामुळे होणारे परिणाम याचे ही विवेचन यात आहे. धान्याचे प्रकार, भाज्यांचे प्रकार याचे विस्तृत वर्णन आहे.

विभाग

  • शूकधान्य
  • शिम्बीधान्य
  • तृणधान्य
  • भाजले जाणारे पदार्थ
  • शिजवले जाणारे पदार्थ

पदार्थ

या ग्रंथात दिलेले पदार्थ सुमारे चारशे आहेत. त्यात खालील उल्लेखही आढळतात.

  • अपूप(अप्पे/घारगे),
  • शालिपूप (अनारसे),
  • शंखपाला (शंकरपाळे),
  • सम्पाव(सारोटी),
  • मधुशीर्षक(खाजे),
  • शष्कुली(करंजी),
  • चणकपुरीका(बेसनाच्या तिखट पुऱ्या),
  • मुद्गलड्ड (मुगाचे लाडू),
  • सेविका(शेवया),
  • चक्रिका(चकली)

=उदाहरण

पुरणपोळी या मराठी पदार्थाचे वर्णन पुढील ओळीत आहे पोळिका पूर्णगर्भा तु गुर्वी स्याद्गुडदालिता। स्वैर भाषांतर- जिच्या गर्भात गुळ व डाळीचे मिश्रण आहे ती पुर्णपोळी होय.

समोसे बनवण्याची कृती यात दिली आहे. हे समिष म्हणजे मांस घातलेले समोसे आहेत. त्या वेळी यांना मांसशृङ्गाटकं असे म्हणत.

शुद्धमांसं तनूकृत्य कर्तितं स्वेदितं जले। लवङ्गहिङ्गुलवणमरीचार्द्रकसंयुतम्॥ एलाजीरकधान्याकनिम्बूरससमन्वितम्। घृते सुगन्धे तद्भृष्टं पूरणं प्रोच्यते बुधै:॥ शृङ्गाटकं समितया कृतं पूरणपूरितम्। पुन: सर्पिषि संभृष्टं मांसशृङ्गाटकं वदेत्॥

प्रकाशन

त्रावणकोर विद्यापीठाने १९५६ साली याची आवृत्ती छापली आहे. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे डॉ.प.कृ.गोडे यांनी ग्रंथावर संशोधन केले आहे.

इतर ग्रंथ

  • नलराजाने 'नलपाकदर्पण' हा पाकशास्त्रावर ग्रंथ रचला होता.
  • क्षेमकुतूहल