"सामंतशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १२:
 
===कमकुवत मध्यवर्ती शासन===
 
रोमन सम्राट शार्लमेननंतर सत्तेवर आलेले बहुतेक राजे दुर्बल व अकार्यक्षम होते. त्यांचे शासनावर काहीही नियंत्रण नव्हते. राजांचे स्वतःचे सैन्य नसल्यामुळे संरक्षणासाठी त्यांना सामंतांवर अवलंबून राहावे लागे. यामुळे मध्यवर्ती शासन आणखी परावलंबी झाले. त्यामुळे सामंतांचे प्राबल्य वाढत गेले. सामंतांचे सैन्य व त्यांची कुळे राजाएेवजी सामंतांशी एकनिष्ठ असत. त्यामुळे मध्यवर्ती शासनाची दुर्बलता आणखी वाढत गेली. अखेरीस सामंत आणि त्यांचे सैन्य, कमकुवत मध्यवर्ती शासनावर हुकुमत गाजवू लागले. ह्यातून सामंतशाही वृद्धिंगत झाली.
 
Line १७ ⟶ १८:
 
रोमन साम्राज्याच्या अस्तबरोबर साम्राज्यातील केंद्रीभूत प्रशासन व्यवस्था लोप पावली. मध्ययुगातील आर्थिक अडचणींमुळे मध्यवर्ती शासनास विकेंद्रीत व्यवस्था सुरू करणे आवश्यक झाले. विकेंद्रीकरण ही काळाची गरज बनली. राजा, सामंत कुळे अशा उतरंडीने राज्यातील शेतजमिनीचे वाटप झाले. त्यामुळे सामंतशाहीला चालना मिळाली. सामंत प्रबळ असल्यामुळे त्यांच्या प्रदेशातील प्रशासनाचे सर्व अधिकार त्यांनी स्वत:कडे घेतले. ते त्यांच्या जहागिरीमध्ये प्रबळ बनले.
 
===पूरक स्थानिक गरजा===
 
मध्ययुगीन युरोपातील सामान्य लोकांच्या आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या स्थानिक गरजा सामंतशाहीच्या उत्कर्षास साहाय्यक ठरल्या. आक्रमक टोळ्यांच्या सतत होणाऱ्या हल्ल्यापासून शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होई. काही वेळा शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागे. जमिनीतील पिके वाचविणे व जीविताचे संरक्षण होणे शेतकऱ्यांसाठी गरजेचे होते. शेतकऱ्यांनी आपणहून आपल्या जमिनी आपआपल्या भागातील सामंतांच्या स्वाधीन केल्या आणि सामंतांच्या संरक्षणाखाली त्या जमिनी कसण्याचे अधिकार मिळवले. शेतकरी हे जमिनदार व सामंतांची कुळे बनले.
 
शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी सामंतांच्या स्वाधीन केल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या आर्थिक गरजा सामंतांशी निगडीत झाल्या. संरक्षणाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना आपल्या शेतउत्पादनाचा ठरावीक भाग कर म्हणून सामंतांना द्यावा लागे. शेतमालही सामंतांनाच विकावा लागे. वेळोवेळी आर्थिक मदतीसाठी सामंतांकडे हात पसरावा लागे. शेतकरी पूर्णपणे सामंतांलर अवलंबून असत. शेतकऱ्यांची वेगाने घसरणारी आर्थिक परिस्थिती सामंतशाहीच्या विकासास साहाय्यकारक ठरली. सामंतशाही आणखी भक्कम बनू लागली.
 
==सामंतशाहीचे स्वरूप==