"सामंतशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १६:
सामंतशाही असलेल्या समाजात तीन [[वर्ग]] होते. पहिला वर्ग सामंत व जमिनदारांचा होता. हा वर्ग सर्वांत प्रभावशाली होता. तो सत्ता व वैभव भोगणारा होता. दुसरा वर्ग [[नगर]]वस्तीत राहणारा मध्यमवर्ग होता. तिसरा वर्ग शेतकर्‍यांचा व शेतमजुरांचा (भूदासांचा) होता. हा तिसरा वर्ग प्रत्यक्षात जमीन कसण्याचे काम करत असे. या वर्गातील लोकांना गुलामांप्रमाणे आणि वेठबिगारांप्रमाणे वागणूक मिळे. त्यामुळे या वर्गाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. सर्वसामान्य जनतेची दुरवस्था हा सामंतशाहीचा मोठा दोष होता.
 
==[[मॅनॅार]]==
प्रत्येक सामंताची तटबंदीयुक्त [[गढी]] आणि त्या सभोवतालचा प्रदेश म्हणजे [[मॅनॅार]] होय. [[मॅनॅार]]मध्ये सामंताचा प्रासाद, शेतकर्‍यांच्या झोपड्या, [[चर्च]], [[धान्य]]ाची कोठारे आणि त्यांना लागून शेतजमीन असे. संपूर्ण [[मॅनॅार]]भोवती तटबंदी असे. [[मॅनॅार]]ला मध्ययुगीन समाजात महत्त्वाचे स्थान होते. प्रत्येच [[मॅनॅार]] हे आर्थिक आणि प्रशासकीयदृष्ट्या स्वायत्त व स्वयंपूर्ण होते. [[किल्ला|किल्लेवजा]] [[मॅनॅार]]मधील सामंत एखाद्या [[राजा]]प्रमाणे राहत. ते आपल्या प्रासादात दरबार भरवत. या दरबारात त्यांचे दुय्यम सामंत व कुळे हजर रहात असत. ते नजराणे देत व मनुष्यबळ पुरवीत. [[मॅनॅार]]मध्ये नेहमी उत्सव, समारंभ, खेळांचे सामने व मेजवान्या चालत. [[मॅनॅार]]मुळे युरोपीय सामंतशाही अधिक बळकट झाली.