"विष्णुशास्त्री चिपळूणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ ३७:
 
महाविद्यालयीन शिक्षणानंतर चिपळूणकरांनी शिक्षकी पेशा निवडला. त्यांनी [[इ.स. १८७२|१८७२]] ते [[इ.स. १८७७|१८७७]] सालांदरम्यान पुण्यातील, तर [[इ.स. १८७८|१८७८]]ते [[इ.स. १८७९|१८७९]] सालांदरम्यान [[रत्नागिरी|रत्नागिरीतील]] शाळांमधून अध्यापनाचे काम केले.
 
{{संदर्भ हवा}}
[[इ.स. १८७४|१८७४]] साली चिपळूणकरांनी ''निबंधमाला'' हे मासिक प्रकाशन आरंभले. १८७४ सालापासून हयात असेपर्यंत, म्हणजे सुमारे आठ वर्षे, त्यांनी निबंधमाला चालवली. निबंधमालेतील निबंधांतून त्यांनी तत्कालीन [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश सत्तेच्या]] अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण, तसेच साहित्यिक लिखाणही लिहिले. त्यांनी [[इ.स. १८७८|१८७८]] साली महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी लोकांची जाणीव वाढवण्याच्या व सामान्यजनांची काव्याभिरुची घडवण्याच्या हेतूने ''काव्येतिहास संग्रह'' हे मासिक सुरू केले. त्याच वर्षी त्यांनी पुण्यात आर्यभूषण छापखाना व चित्रशाळा स्थापण्यात पुढाकार घेतला. [[इ.स. १८७५|१८७५]] साली मराठी समाजाला प्रेरित करणारे साहित्य उपलब्ध करण्याच्या हेतूने ''किताबखाना'' नावाचे पुस्तकांचे दुकान उघडले. उमलत्या पिढीला 'राष्ट्रीय शिक्षण' देण्याच्या उद्दिष्टातून, [[इ.स. १८८०|१८८०]] साली त्यांनी [[बाळ गंगाधर टिळक]] व [[गोपाळ गणेश आगरकर]] यांच्या सहकार्याने पुण्यात [[न्यू इंग्लिश स्कूल, पुणे|न्यू इंग्लिश स्कूल]] शाळा स्थापली. [[इ.स. १८८१|१८८१]] सालाच्या जानेवारीत त्यांनी ''[[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]]'' हे मराठीभाषिक व ''[[मराठा (वृत्तपत्र)|मराठा]]'' हे इंग्रजीभाषिक वृत्तपत्र सुरू केले.{{संदर्भ हवा}} चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर बाळ गंगाधर टिळकांनी ही दोन्ही वृत्तपत्रे पुढे चालवली. त्यांनी, आपल्या वडिलांच्या शालापत्रक या मासिकात कालिदास, भवभूती, बाण, सुबंधु व दंडी या पाच संस्कृत कवींवर स्वतंत्र लेख लिहिले होते. त्या लेखामध्ये कवींची उपलब्ध माहिती आणि त्यांच्या काव्यांचे, जरूर तेथे उताऱ्यांसहित, रसपूर्ण विवरण असे.
 
== सामाजिक कार्य ==