"महालक्ष्मी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ४:
 
पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. ते कोल्हापुरात (करवीर) आहे. कोल्हापूरची [[महालक्ष्मी]], तुळजापूरची [[महासरस्वती]], माहूरची [[महाकाली]] व वणीची [[सप्तशृंगी देवी]]. हिच्या दर्शना साठी देशभरातुन भाविक येतात.
हामातृक क्षेत्र म्हणजे तीर्थस्थान करवीर मातृपूजेचे आद्य क्षेत्र शक्ती उपासक तसेच प्रत्यक्ष दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र कोल्हापूर साक्षात करवीर निवासिनी महलक्ष्मी जगदंबा हिच्या वास्तवाने च या स्थानाला अन्यन साधारण महत्व प्राप्त झाले आहे महाराष्ट्रात देवीची साडे तीन शक्तीपीठे प्रसिद्ध आहेत कोल्हापूरम महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता l मातुः पुरुं द्वितीयं च रेणुकाधिष्ठी तं l तुळजापूर तृतीयं स्यात सप्त श्रुग तथैव च ll वरील वर्णना प्रमाणे कोल्हापूरची महा लक्ष्मी हे पूर्णपीठ व आद्य शक्ती पीठ आहे दुसरे माहुरची रेणुका माता, तिसरे पीठ तुळजापूरची तुळजाभवानी तर सप्त शृंगी ची देवी हे अर्धपीठ म्हणून ओळखले जाते पद्म पुराण,स्कंद पुराण मार्कंडेय पुराण देवी भागवत इ. प्राचीन ग्रंथात महलक्ष्मीचा उल्लेख आहे. काशी क्षेत्रात शिवाचे वास्तव आहे परंतु करवीरात शिव व महलक्ष्मी दोघांचे हि वास्तव्य आहे त्या मुळे भक्ती आणि मुक्ती मिळते असा भोळ्या भक्ताचा भाव आहे.ऐतिहासिकशिलालेख ताम्रपट अशा विविध पुराव्यावरून या मंदिराच्या नोंदी नवव्या शतका पासून सापडतात (शके ७९३,इ.स. ८७१ )ठाणे जिल्ह्यातील सापडलेला ताम्रपट तसेचगोमंतक प्रदेशात फोंडा येथे हि. सापडलेल्या ताम्रपटात कदंब वंशीय राजा पहिला षष्ठ याने कोल्हापुरात येवून श्री महलक्ष्मी ची उपासना केल्याचा उल्लेख आहे.याचा काळ शके ९६० व इ.स. १०३८ असा आहे. या स्थानावर सत्ता असणारा व महलक्ष्मी वर अपार श्रद्धा असणारा राजा म्हणजे च ज्ञात राजवंश शिलाहार राजवंश होय आपल्या राज्यावर महलक्ष्मीचा च वरदहस्त आहे असा अभिमान बाळगणाऱ्या या राजाचा प्रभाव करवीरक्षेत्रावर शके ९८०(इ.स. १०५८) पासून शके १११३(इ.स. ११९१)इतका प्रदीर्घ होता याच वंशातील पहिला राजा मारसिंह याचा ताम्रपट मिरज येथे आहे याच वंशातील पहिला राजा मारसिंह यांचा ताम्रपट मिरज येथे आहे यात शिलाहार नृपती ने स्वतः च्या राजवंशाचा उल्लेख करताना "श्री महालक्ष्मी लब्ध वरप्रसादादि "असा उल्लेख केला आहे. मारसिंह,बल्लाळ,गंडरादित्य विजयादित्य व व्दितीय भोज या सर्वच शिलाहार वंशीय राजवंशातील शिलालेख व ताम्रपट करवीरच्या महालक्ष्मी चा साक्षात श्रद्धा भाव आढळून येतो. देव गिरीच्या यादव वंशातील राजा सिंघन देव याने ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार राजवंशाची सत्ता हस्तगत केली . इ.स. १२१३ ला हा सर्व प्रदेश यादवाच्या सत्तेखाली आला जरी सत्ता बदलली तरी यादव वंशानेही महाल क्ष्मीवर अपार श्रद्धा दाखवली होती खिद्रापूरच्या अमृतेश्वाराला भरभरून दान देत असताना च कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी ला ही आपल्या सेवका तर्फे तोरण बांधले अनेक जेष्ठ अभ्यासकांच्या मते हे तोरण म्हणजे महालक्ष्मी च्या मंदिरासमोरील महाव्दार होय. याची नोंद असणारा शिलालेख महाव्दाराच्या शेजारीच असणाऱ्या जोशीरावांचा गणपती अर्थात उजव्या सोंडेचा गारेचा गणपती च्या मंदिरातील खांबावर आजही पाहायला मिळतो या प्रकारे अनेक शिलालेख व ताम्रपटावरून मंदिराची प्राचीनता ८ व्या ते ९ व्या शतका पर्यंत नक्कीच घेऊन जाते हे स्पष्ट होते. आत्ताचे मंदिर हे तारका कृती असून या मध्ये प्रामुख्याने मुख्य मंदिर महाकाली ,महासरस्वती ,गणेश मंडप व शेवटी गरुड मंडप अशा क्रमाने बांधकाम झाले असे जाणकारचे मत आहे मुख्य मंदिराच्या गर्भगृहात उंच दगडी चबुतऱ्या वर दहा खांब असणाऱ्या लाकडी मेघडंबरीत साक्षात करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात जगदंबेची मूर्ती स्थित आहे मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यातील प्राधानिक रहस्यात तिचे वर्णन खालील प्रमाणे केले आहे मातृलिंग गदा खेट पानपात्रचं विभ्रती l नागलिंग च योनि बिभ्रती नृप मुर्धनी ll त्याच प्रमाणे नित्य कर्म संग्रहात तिचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे. धृत्वा श्री मातुः लिंगं तदुपरी च गदा खेटकं पानपात्रम l नागलिंग च योनी शिरसी धृतवती राजते हेमवर्णा ll महालक्ष्मी मूर्ती उंची २ फुट ९ इंच इतकी आहे. हि मूर्ती चतुर्भुज असून वरच्या उजव्या हातात उभी गदा व डाव्या हातात खेटक (ढाल ) आहे. खालच्या दोन हाता पैकी डाव्या हातात पानपात्र व उजव्या हातात मातुलुंग (म्हाळुग) आहे. श्री च्या मस्तकावर साडेतीन वेटोळ्या चा नाग असून त्याचा फणा समोर आहे या फण्याच्या मागे लिंग व योनी ही प्रकृती तत्व व पुरुष तत्व यांची यांची प्रतीके आहेत मूर्तीच्या पाठीमागे सिंह उभा आहे. इ.स. १०९ मध्ये कर्णदेव राजा कोकणातून आला त्या वेळी अरण्यातील झाडे झुडपे तोडून हि मूर्ती उजेडात आणली असे म्हटले जाते आठव्या शतकात मंदिर भूकंपाने खचले. राजा गंडरदित्य याने मंदिराचा विस्तार केला . त्याने महाकाली मंदिर तर ११७८ ते १२०९ या काळात राजा जयसिंग व राजा सिंघण देव यांच्या कारकिर्दीत दक्षिण दरवाजा व अतिबलेश्वर मंदिर बांधल्याचे म्हटले जाते . ज्या प्रमाणे श्री यंत्राच्या १६ काटकोना तील मध्यभागी सर्वोच्च बिंदू स्थान असते त्याच प्रमाणे श्री महा लक्ष्मी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा प्रदक्षिणेचा मार्ग हा श्री यंत्रा प्रमाणे १६ काटकोनात विभागाला आहे या मार्गाच्या मध्य भागी म्हणजे च सर्वोच्च बिंदू स्थानावर तिची मूर्ती उभी आहे संपूर्ण भारतातील अशी रचना असणारे उत्कृष्ट शिल्प वैभव व हेमाड पंथी असे एकमेव दोन मजली मंदिर असावे महालक्ष्मी मूर्तीच्या बरोबर वरच्या मजल्यावर दगडी शिवलिंग आहे. यालाच मातुः लिंग असे म्हणतात महा लक्ष्मीच्या मस्तकावर याचे स्थान असून मातृरुपातील हे शिवलिंग असलेने याला अपवादा त्मक पूर्ण प्रदक्षिणा घातली तरी चालते. महालक्ष्मीच्या प्रदक्षिणामार्गाप्रमाणे वरच्या मजल्या वरील या शिवलिंगालाही प्रदक्षिणा मार्ग आहे . त्यास वायू विजनासाठी दगडी झरोके व खिडक्या आहेत.
 
[[वर्ग:हिंदू दैवते]]