"राष्ट्रीय महामार्ग ६६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४३:
हा महामार्ग [[रत्‍नागिरी]] जिल्ह्यातून जातो...कशेडी घाट ते सावंतवाडी हे तीनशे किलोमीटरचे अंतर आहे.. या महामार्गावर कशेडी घाटात परशुराम, भोस्ते, कामथे, ओणी, इन्सुली या ठिकाणी अत्यंत धोकादायक घाटवळणाचा रस्ता आहे..तसेच काही ठिकाणी अरुंद पूल आहेत.
 
मुंबई-गोवा महामार्गावरील बहादुरशेख नाका सोडल्यानंतर पुढे कळंबस्ते फाटा येतो. तेथून पुढे रेल्वे मार्गापासून काही अंतरावर आंबडसकडे फाटा फुटतो. तो लोटे येथे बाहेर पडतो.
[[परशुराम घाट]]रस्त्याला आंबडस मार्गे रस्त्याचा पर्याय आहे; मात्र त्याचा उपयोग केला जात नसल्याने त्याची नियमित डागडुजी होत नसल्याने या रस्त्याचा फारसा उपयोग होत नाही. शिवाय या रस्त्याचे अंतर ८० किमी असल्याने तसेच हा रस्ता जंगलातून जातो. कामथे घाटाला टेरवमार्गे खेर्डी रस्त्याचा पर्याय आहे. कुंभार्ली घाटाला नवजा मार्गाचा पर्याय आहे.
 
मुंबई-गोवा महामार्गावरून एका मिनिटाला पाच गाड्या ये-जा करीत असतात. त्यामुळे रस्त्यावर रात्रंदिवस रहदारी असते. कशेडी किंवा भोस्ते घाटात एखादा अपघात झाला किंवा दरड कोसळली, तर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबते. अशीच अवस्था परशुराम घाटाची आहे.
 
खेड तालुक्‍यातील लोटेपासून पुढे भरणे नाक्‍यापर्यंतचा रस्ता एखाद्या दुर्घटनेमुळे रोखला गेला, तर कोतवली मार्गे जाणार्‍या रस्त्याचा पर्याय उपलब्ध आहे. खाडीपट्ट्यातील गावांमधून जाणार्‍या या पर्यायी रस्त्याचा उपयोग काही प्रमाणावर केला जातो. लोटे येथून सुरू होणारा हा ३५ किमी लांबीचा रस्ता खेड शहरात बाहेर पडतो.
 
==राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना==