"वासोटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १३:
साहसाची अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला [[जावळीचे जंगल|जावळीच्या जंगलामधील]] एक अनोखे दुर्गरत्‍न आहे.
 
[[सह्याद्री]]ची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा [[दातेगड|दातेगडाची]] रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग [[महाबळेश्वर]]पासून [[दातेगड|दातेगडापर्यंत]] जाते. या दोन रांगाच्या मधून [[कोयना नदी]] वाहते. या जावळी खोर्‍यामधून वाहणार्‍या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. या जलाशयाला [[शिवसागर]] म्हणतात. या शिवसागराचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. शिवसागराचे पाणी [[तापोळे|तापोळापर्यंत]] पसरलेले आहे.
 
सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/वासोटा" पासून हुडकले