"मराठी नाट्यसंगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
 
[[चित्र:Anuj and Smriti Mishra.jpg|thumb|right|सवाई गंधर्व (२००८)]]
मराठी [[संगीत नाटक]] ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे, असे मानले जाते. [[विष्णुदास भावे]] यांनी मराठी रंगभूमीचा श्रीगणेशा केला तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थाने प्रारंभ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल (१८८०) या नाटकाने झाला. त्यानंतर सौभद्र, रामराज्यवियोग, द्रौपदी, विद्याहरण, शारदा, स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ, एकच प्याला ...अशा संगीत नाटकांची परंपराच निर्माण झाली. १८८० ते १९३० हा संगीत नाटकांच्या आणि पर्यायाने नाट्यसंगीताचा सर्व अर्थांनी सुवर्णकाळ होता. संगीत नाटकांच्या इतिहासातील काळाचे टप्पे हे समीक्षकांनी व अभ्यासकांनी पुढीलप्रमाणे मानले आहेत.
 
डिसेंबर १९१६ मध्ये संगीत स्वयंवर रंगभूमीवर आले. या नाटकात ३९ रागांचा वापर करून बांधलेली ५५ नाट्यगीते होती. या कालखंडात गाणी पुढे आणि नाटक मागे अशी परिस्थिती होती. ’संगीत [[कान्होपात्रा]]’ या नाटकाद्वारे [[मास्टर कृष्णराव]] यांनी यांनी ही परिस्थिती बदलली. त्यांनी नाट्यपदांना भावगीतांच्या चाली दिल्या होत्या. इ.स. १९६० नंतर पं [[जितेंद्र अभिषेकी]] यांनी नाट्यपदांमध्ये सुगम संगीताला प्राधान्य दिले. त्यामुळे नाटकांत ताना मारून गाणारे नट सुगम संगीत गाऊ लागले.
 
समीक्षकांनी व अभ्यासकांनी संगीत नाटकांच्या इतिहासातील काळाचे टप्पे पुढीलप्रमाणे मानले आहेत.
 
#किर्लोस्कर-देवल काळ - १८८० -१९१०
Line १४ ⟶ १८:
 
==इतिहास==
 
गायनाचार्य [[भास्करबुवा बखले]], [[गोविंदराव टेंबे]], [[मास्टर कृष्णराव]], [[राम मराठे|पं. राम मराठे]], [[जितेंद्र अभिषेकी|पं. जितेंद्र अभिषेकी]], [[छोटा गंधर्व]], [[केशवराव भोळे]] असे दिग्गज संगीतरचनाकार (संगीतकार) लाभल्याने मराठी नाट्यसंगीत समृद्ध झाले. यातील प्रत्येक संगीतरचनाकार स्वतः उत्तम गायक होते. हिंदुस्थानभर भ्रमण करून संगीताचे ज्ञान आणि संस्कार त्यांनी आत्मसात केल्याने, त्याचे प्रतिबिंब नाट्यसंगीतात पडणे स्वाभाविक होते. उदाहरणार्थ ‘[[मानापमान (नाटक)|मानापमान]]’ नाटकातील अनेक चाली बनारस, लखनौ तसेच पंजाब येथील उपशास्त्रीय गायनप्रकारांवर बेतलेल्या आहेत. तसेच ‘[[स्वयंवर (नाटक)|स्वयंवर]]’ मधील अनेक पदे मूळ बंदिशींवर आधारली आहेत.
 
Line २० ⟶ २३:
 
==विविध सांगीतिक आकृतिबंध==
 
भारतीय संगीत परंपरेतील विविध सांगीतिक आकृतिबंध नाट्यसंगीतातून प्रत्ययास येतात. ध्रुवपद - धमारापासून ते गजल -कव्वालीपर्यंत आणि भावगीतापर्यंत हे वैविध्य दिसते. ख्याल, तराणा, ठुमरी, कजरी, होरी, चैती, गजल, कव्वाली, लावणी, साकी, दिंडी, आर्या, अभंग, स्त्रीगीते असे अनेक प्रकार नाट्यसंगीतातून मुक्तपणे वापरलेले दिसतात.
 
Line ३३ ⟶ ३५:
==अन्य माहिती==
काही वेळा संगीत नाटकापेक्षा त्यातील पदांच्या ध्वनिमुद्रिकांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. उगवला चंद्र पुनवेचा (बकुळ पंडित), ऐसा महिमा प्रेमाचा (रतिलाल भावसार), काटा रुते कुणाला (अभिषेकीबुवा), गुलजार नार ही मधुबाला (वसंतराव देशपांडे), दान करी रे (रामदास कामत), मर्मबंधातली ठेव ही (प्रभाकर कारेकर), मधुमीलनात या विलोपले (आशा भोसले), मानसी राजहंस पोहतो (ज्योत्स्ना भोळे) अशा नाट्यपदांच्या ध्वनिमुद्रिका अतिशय लोकप्रिय झाल्या आणि आजही आहेत. लोकप्रिय ध्वनिमुद्रिकांची असंख्य उदाहरणे देता येतील.
 
शाकुंतल, सौभद्र या नाटकांच्या काळात नाटकांतील पदांची संख्या भरघोस होती. त्यामुळे नाटके रात्रभर चालत असत. बोलपटांच्या आगमनाने दोन-तीन तासांची कमरणूक सहज उपलब्ध झाल्याने संगीत नाटकांची गरज कमी होत गेली. तसेच या काळात संगीत नाटकाने बदलत्या काळाशी जुळवून घेणे नाकारल्याने नाट्यसंगीतही मागे पडत गेले. ‘नाट्यमन्वंतर’ या नाट्यसंस्थेच्या कुलवधू, आंधळ्यांची शाळा, भूमिकन्या सीता आदि नाटकांनी १९४० च्या दशकात काही बदल करून आटोपशीर नाट्यसंगीत रसिकांसमोर आणले. त्यांना उत्तम प्रतिसादही मिळाला.