"हडप्पा संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
No edit summary
ओळ १:
[[File:Sculptures in Rani ki vav 03Dancing_Girl_of_Mohenjo-daro.jpg|इवलेसे|उजवे|200px|हडप्पा संस्कृतीकालीन शिल्पकला]]
'''हडप्पा संस्कृती''' ही जगातील सर्वात प्राचीन [[संस्कृती|संस्कृतींपैकी]] एक आहे. हीचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार [[इ.स.पूर्व. २७००]] ते इ.स.पूर्व. १५०० असा संबोधला जातो. [[इ.स. १९२०]] च्या सुमारास [[लाहोर]]-[[मुलतान]] [[रेल्वे]] मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी [[सर जॉन मार्शल]] यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली. या संस्कृतीचे प्रथम अवशेष [[हडप्पा]] येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला 'हडप्पा संस्कृती' असे म्हणतात. ही संस्कृती प्रामुख्याने [[सिंधू नदी]]च्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला 'सिंधू संस्कृती' असेही म्हणतात.
 
उत्खननात [[हडप्पा]] व [[मोहनजोदडो]] या दोन्ही नगरांच्या ठिकाणी एकाच प्रकारच्या मुद्रा आढळून आल्या. अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष [[पश्चिम]] [[भारत]]ात [[कालीबंगन]], [[धोलविरा]], [[सुरकोटडा]], [[लोथल]], [[दायमाबाद]] इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले.