"लखुजी जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
183.87.126.74 (चर्चा)यांची आवृत्ती 1281099 परतवली.
ओळ १:
'''लखुजी जाधव''' [जन्म १५७० मृत्यू १६२९] [[विदर्भ|विदर्भातील]] [[सिंदखेड]] येथील [[मराठा]] वतनदार होते. ते [[जिजाबाई]] यांचे वडील व [[शिवाजी|शिवाजीराजे भोसले]] यांचे आजोबा होते. निजामशाहीत त्यांना पंचहजारी मनसबदारीचा हुद्दा होता. [[विदर्भ|विदर्भात]] [[सिंदखेड]] येथे त्यांचे वतन होते. सिंदखेडकर जाधवांचे घराणे ही मुळ देवगिरीच्या यादव वंशाचीच एक उपशाखा आहे. [[देवगिरी]] येथील यादवांच्या रायाचा अंत झाल्यावर यादवांची दैन्यावस्था झाली. उदरनिर्वाहासाठी ते सर्वत्र पसरले. याच घराण्यातले वारस पुढे काही पिढ्यानंतर [[बुलढाणा]] जिल्ह्यातील सिंदखेड येथे स्थायिक झाले. सिंदखेडच्या जाधव घराण्यात लखूजी हा [[कर्तृत्वान]] आणि [[विख्यात]] पुरुष उदय पावला. यादवांचे राज्य नष्ट झाल्यानंतर लखूजी जाधव यांनीच जाधव घराण्याला उर्जितावस्था प्राप्त करुन दिली. लखूजीचे नाव लक्ष्मणसिंह असेही होते तथापि तो लखूजी याच नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे.
 
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडच्या जाधवाचे घराणे प्राचीन आहे. शिवपूर्वकाळात विशिष्ट परिस्थितीत [[निजामशाही]] आणि [[आदिलशाही]] यांच्या आश्रयाने जी काही मराठी कूळे उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव, वेरुळचे भोसले, वासीमचे [[उदाराम देशमूख]] आणि फलटनचे [[नाईक,सरनाईक. निंबाळकर]] [[पवार,पोतले]] ही कूळे विख्यात होती. जाधव घराणे हे लखूजी जाधवरावांच्या यांच्यामुळे निजामशाहीतच्या आमदानीत पुढे आले. लखूजीने बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडला देशमूखी मिळवली. यादव राजांच्या राजवटीत मराठी राज्य नष्ट झाले परंतु जाधव कुळात जन्मास आलेल्या कन्येच्या [[जिजाबाई]] पोटी तिनशे वर्षांनी पुन्हा मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करणारा [[छत्रपती शिवाजी ]] हा असामान्य पुरुष जन्मास आला शिवाजी राजाला जन्म देणारी [[जिजाबाई]] लखुजी जाधवरावांची कन्या होती.