"भारताचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६:
इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात [[अलेक्झांडर]] च्या आक्रमणानंतर बरीच राजकीय स्थित्यंतरे झाली. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते. [[चंद्रगुप्त मौर्य|चंद्रगुप्त मौर्याने]] [[मगध]]च्या मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली ज्याचा [[सम्राट अशोक|सम्राट अशोकाने]] कळस गाठला. कलिंगाच्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक = Maurya dynasty |दुवा = http://www.livius.org/man-md/mauryas/mauryas.html |लेखक = Jona Lendering |अ‍ॅक्सेसदिनांक = 2007-06-17}}</ref> भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या गुप्त साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले. हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच दीर्घकाल राहिलेला [[बौद्ध]] धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदीक धर्माची वेगळ्या स्वरुपात पुनर्बांधणी झाली. [[साहित्य]], [[गणित]], [[शास्त्र]], [[तत्त्वज्ञान]] इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली."<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://india.gov.in/knowindia/ancient_history4.php|शीर्षक=Gupta period has been described as the Golden Age of Indian history|अ‍ॅक्सेसदिनांक=2007-10-03 |प्रकाशक= ''[[National Informatics Centre]] (NIC)''}}</ref><ref>Heitzman, James. (2007). "[http://encarta.msn.com/encyclopedia_761571624/Gupta_Dynasty.html#s3 Gupta Dynasty,]" Microsoft® Encarta® Online Encyclopedia 2007</ref> भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. दक्षिण भारतात अनेक साम्राज्ये उदयास आली. तमिळनाडूतील [[चोल साम्राज्य]], [[विजयनगर साम्राज्य|विजयनगरचे साम्राज्य]]. महाराष्ट्रातील [[सातवाहन]], या काळातील कला, स्थापत्यशास्त्रातील प्रगती आजही खूणावते. अजिंठा, वेरुळ, हंपीचे प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदीरे ही याच काळात बांधली गेली चोल साम्राज्याचा विस्तार आग्नेय अशियातील इंडोनेशिया पर्यंत पोहोचला होता.
 
११ व्या शतकात इराणमधील [[मोहम्मद बिन कासीमने]] [[सिंध]] प्रांतात आक्रमण केले व काबीज केले. यानंतर अनेक इस्लामी आक्रमणे आली व भारतातील मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट लागू झाली. भारतातील अनेक राज्ये आर्थिक दृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणात सत्ता काबीज करणे तसेच लुट करणे हे मुख्य उद्देश्य असत. गझनी येथील एका राज्यकर्त्याने भारतात लूटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. तैमूरलंगने केलेले [[दिल्लीतील शिरकाण(तैमूरलंग)|दिल्लीतील शिरकाण]] मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे इतिहासकार नमूद करतात. दिल्ली सल्तनत ते मोघलांपर्यंत अनेक इस्लामी राज्ये उदयास आली. यातील मुघलांचे राज्य सर्वाधिक विस्ताराचे होते. मुघल राजवटीत शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली,ज्याचा मुख्य उदेश्य भारतात एतद्देशीयांचे राज्य पुन‍प्रस्थापन करणे हा होता. मराठा साम्राज्याच्या विस्ताराबरोबरच मुघल साम्राज्य क्षीण होत गेले. पानिपतच्या युद्धात दारुण पराभवानंतर मराठ्यांचे पतन सुरू झाले ज्याचा सर्वाधिक फायदा युरोपीयन साम्राज्यवाद्यांना झाला. सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून वसाहती स्थापल्या होत्या व ते आपले साम्राज्यवादी धोरण पुढे रेटत होते. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सदेगीरी, फुटीचे राजकारण करून हळूहळू भारतातील सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. बंगालपासून् सुरुवात करत, म्हैसूरचा टिपू, १८१८ मध्ये मराठा साम्राज्य, १८५० च्या सुमारास पंजाबमधील शिख व जाट असे एक एक हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी इस्ट इंडीया कंपनीच्या कारभाराखाली गुलाम बनवले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://india.gov.in/knowindia/history_freedom_struggle.php|शीर्षक=History : Indian Freedom Struggle (1857-1947)|अ‍ॅक्सेसदिनांक=2007-10-03 |प्रकाशक= [[National Informatics Centre|National Informatics Centre (NIC)]] |अवतरण=And by 1856, the British conquest and its authority were firmly established.}}</ref>. १८५७ मध्ये ब्रिटीश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पाहता पाहता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटीशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटीशांविरुद्ध स्वातंत्र मिळवण्याची ऊर्मी भारतीयांच्यात जागृत झाली. उठावानंतर इस्ट इंडिया कंपनी कडून कारभार ब्रिटीश सरकार कडे गेला.
 
[[चित्र:Nehru Gandhi 1937 touchup.jpg|thumb|left|[[Mohandas Karamchand Gandhi|Mahatma Gandhi]] (right) with [[Jawaharlal Nehru]], 1937. Nehru would go on to become India's first prime minister in 1947.]]